फक्त निरव मोदीच नव्हे, देशाला लुबाडून फरार होणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
नियमांना धाब्यावर बसवत प्रसिद्ध हिरा व्यापारी निरव मोदी ह्याने पंजाब नॅशनल बँकेला चांगलाच गंडा लावला आहे. पण हा काही एकटाच असा नाही ज्याने आपल्या देशाल लुबाडलं आहे.
असे अनेक आहेत ज्यांनी मोठ-मोठे घोटाळे करून आपल्याला चुना लावला आहे. ह्यापैकी काही तर पकडले गेले पण अजूनही काही असे आहेत जे हे घोटाळे करून विदेशात ऐषोआरामात जगत आहेत.
निरव मोदी :
जग प्रसिद्ध हिरा व्यापारी आणि सध्या बँकिंग सेक्टरमधील सर्वात मोठ्या घोटाळ्यामुळे प्रकाशझोतात आलेला निरव मोदी. ह्याचं तर ह्या लिस्ट मध्ये सर्वात पहिलं नाव आहे.
ह्याने पंजाब नॅशनल बँकेला तब्बल ११ हजार ४०० कोटी रुपयांचा गंडा लावला आहे. आणि आता तो देशातून फरार झाला आहे.

सध्या अंमलबजावणी संचालनालयाने निरव मोदीच्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. ज्याची किंमत ५१०० कोटी रुपये आहेत.
विजय माल्या :
विजय माल्या… हे नाव तर आज देशातील प्रत्येकाला माहित आहे. बीजेपी सरकार ह्याच्या आणि काळा पैसा परत आणण्याच्या नावावर जिंकून आली होती.
विजय माल्या ह्याने देखील आपल्या देशाला खूप मोठा चुना लावला आणि थेट विदेशाची वाट धरली. ग्लॅमरस लाईफ जगणाऱ्या विजय माल्याने १७ बँकेतून जवळजवळ ९ हजार कोटींच लोन घेतलं आहे.

एवढचं नाही तर त्याने किंगफिशर एयरलाईन कडून देखील ९०० कोटीचं लोन घेतलं होत. ह्या सर्व बँकांनी न्यायालयात पिटीशन दाखल करून विजय माल्या ह्याला देश सोडण्याची परवानगी न देण्याची विनंती केली होती, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही.
माल्या याने देशाला एवढा मोठा चुना लावला आणि सध्या तो इंग्लंड मध्ये शानने राहतो आहे.तिथेही त्याला अटक करण्यात आली होती, पण त्यानंतर त्याला लगेच जामीन मिळाला.
ललित मोदी :
आयपीएल म्हटलं की, आठवतो तो ललित मोदी. तो आयपीएलचा पहिला चेअरमन आणि कमिश्नर होता. ललित मोदी ह्याला गैरवर्तनाच्या आरोपाखाली बीसीसीआयने निलंबित केले होते. त्यानंतर २०१३ साली मध्ये झालेल्या तपासात त्याला दोषी ठरविण्यात आले.

त्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंध लावण्यात आले. जेव्हा ललित मोदी लंडनला गेला तेव्हा देखील त्यांच्या आर्थिक उलाढालीबाबत अंमलबजावणी संचलनालयाने त्यांची विचारपूस केली होती.
दाउद इब्राहिम :
भारताचा मोस्ट वॉन्टेड आरोपी दाऊद इब्राहीम हा अनेक वर्षांपासून विदेशात लपलेला आहे. डी कंपनी चा मालक दाऊद विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. ज्यात ड्रग ट्रॅफिकिंग, हत्या तसेच आतंकवाद पसरविल्याचे आरोप आहेत.

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट ह्यात देखील दाऊदचा हात असल्याचं म्हटलं जाते. असेही म्हटल्या जाते सध्या दाऊद पाकिस्तानात लपलेला आहे.
टाइगर हनीफ :
टायगर हनीफ देखील एक वॉन्टेड आरोपी आहे. त्याचं नाव १९९३ साली गुजरात आणि सुरत येथे झालेल्या ग्रेनेड हमल्यात तो सहभागी होता. ह्या अपघातात एका शाळेतील मुलीचा मृत्यू झाला होता. हनीफ हा रेल्वे स्टेशन येथे झालेल्या एका हल्ल्यासाठी देखील जबाबदार आहे.

या हल्ल्यात १२ लोकांचा मृत्यू झाला होता. तपासाअंती कळले की हनीफ याने मुस्लीम रेफ्युजी कॅम्प साठी मिळालेल्या निधीचा वापर ह्या हल्ल्यांसाठी केला होता. हल्ला केल्या नंतर तो पाकिस्तानात पळाला आणि त्यानंतर ब्रिटन येथे गेला.
नदीम अख्तर सैफी :
९० च्या दशकात नदीम-श्रवण ह्यांची जोडी ही हिंदी सिनेमातील एक प्रसिद्ध जोडी होती. मग १९९७ मध्ये गुलशन कुमार च्या हत्ये नंतर त्यांच्या हत्येचा संशय नदीम ह्यांच्यावर आला. ह्या तपासात गुलशन ह्यांच्या हत्येत नदीम अख्तर ह्यांचा हात असलेचे समोर आले.

सांगण्यात येते की, गुलशन कुमार ह्यांची हत्या करण्यासाठी नदीम ह्यांनी हत्या करणाऱ्यांना हायर केले होते. ह्यानंतर नदीम इंग्लंडला निघून गेला आणि परतलाच नाही.
शीतल मफतलाल :
शीतल मफतलाल ही अतुल्य मफतलाल ह्याच्याशी लग्न झाल्यानंतर चर्चेत आली. लग्नानंतर ती आपली सासू आणि पती ह्यांच्यासोबत कायद्याच्या कचाट्यात सापडली.
शीतल हिची सासू माधुरी ह्यांनी तिच्यावर आरोप लावला होता की, त्यांच्या घरातील ४० दुर्मिळ पेंटिंग्ज गायब झाल्या आहेत.

ह्यानंतर अतुल्यने १० कोटीचे दागिने घरातून गहाळ झाल्याची तक्रार केली होती. ह्या सर्व चोरीमध्ये शीतलचा हात असल्याचे सांगितले गेले. ह्यानंतर शीतल लंडनला गेली आणि तिथलीच झाली.
आपल्या देशाला फक्त निरव मोदी किंवा विजय माल्या ह्यांनीच नाही तर अनेकांनी लुटलं आहे. आणि त्यांना थांबविण्यात आपली सरकार आणि न्यायव्यवस्था दोन्ही कुचकामी ठरल्या आहेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.