पत्नी व मुलाची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या WWE स्टार ची शोकांतिका-भाग २

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

जिवंत असताना सुद्धा त्याने लाखो फॅन्स कमावले आणि त्याच्या मृत्यूने अख्खं प्रोरेसलिंग विश्व ढवळून निघालं. WWE आणि इतर मोठ्या प्रमोशन्सना आपल्या पोलिसीज मध्ये मोठे बदल करावे लागले. मृत्युनंतर सुमारे ७ वर्षे होऊन गेली तरी अगदी आजदेखील त्याच्या मृत्यूबद्दलच्या चर्चा, Conspiracy theories थांबलेल्या नाहीत. फॅन्स आजदेखील त्याला मिस करतात. WWE ने शक्य त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या कंपनीशी संबंधित असलेले त्याचे उल्लेख, त्याचे विक्रम पुसण्याचा प्रयत्न केला असला तरी एक टेक्निकल प्रोरेसलर म्हणूनही अजूनही त्याचं स्थान फॅन्स च्या मनात अढळ आहे.

कोण होता हा ख्रिस बेनवॉ? काय केलं होतं त्याने?

(पहिल्या भागाची लिंक: मृत्युनंतरही त्याची चर्चा थांबत नाही! – ख्रिस बेनवॉ ची शोकांतिका-भाग १)

Sometimes, truth is stranger than fiction असं म्हणतात आणि ते खरं देखील ठरतं.

२३ जून, २००७ (WWE Vengeance – Night of Champions च्या एक दिवस आधी) :

ह्या रात्री टेक्सासला WWE चा हाउस शो होता. दुपारी सुमारे ४ च्या आसपास बेनवॉचा मित्र आणि एडी गरेरोचा नातेवाईक चावो गरेरोला बेनवॉने फोन केला आणि कळवलं की त्याची पत्नी नॅन्सी आणि मुलगा डॅनिएल ह्या दोघांनाही Food Poisoning मुळे रक्ताच्या उलट्या होत आहेत. चावो सुद्धा त्यावेळी WWE सोबत काम करत होता. बेनवॉ त्या हाउस शो ला येऊ शकला नाही.

२४ जून, २००७ (WWE Vengeance – Night of Champions च्या काही तास आधी) :

पहाटे ४ च्या सुमारास ख्रिस बेनवॉ आणि त्याची पत्नी नॅन्सी च्या मोबाइलवरून वेगवेगळ्या क्रमांकावर टेक्स्ट messages पाठवले गेले. हयात त्यांच्या घराचा पत्ता आणि एका message मध्ये त्यांच्या कुत्र्यांचा उल्लेख होता.

नंतर बेनवॉने WWE ला फोन करून कळवलं की त्याचा मुलगा डॅनिएल ह्याला उलट्या होत असुन तो आणि त्याची पत्नी मुला सोबत हॉस्पीटलला आहेत. पुढलं विमान पकडुन WWE Vengeance – Night of Champions करता वेळेत पोहोचत असल्याचं देखील त्याने सांगितलं.

मात्र तरीदेखील बेनवॉ न पोहोचल्याने ऐनवेळी जॉनी नायट्रो ला बेनवॉ ऐवजी रिप्लेस करण्यात आलं आणि त्याने ECW टायटल जिंकलं.

मात्र, दोन दिवस आधीच म्हणजे २२ जूनला नॅन्सी बेनवॉचा खून करण्यात आला होता!

नंतर त्यांचा मुलगा डॅनिएल ह्याचाही खून झाल्याचं आढळून आलं.

(नॅन्सी ही बेनवॉची दुसरी पत्नी होती आणि तिच्यापासून त्याला डॅनिएल हा मुलगा होता. बेनवॉ हा नॅन्सीचा तिसरा पती होता.)

२५ जून, २००७ (WWE Vengeance – Night of Champions नंतरचा दुसरा दिवस) :

बेनवॉ परिवाराकडून आलेले टेक्स्ट messages, बेनवॉची अनुपस्थिति आणि फोन कॉल्सना न मिळणारा प्रतिसाद ह्यामुळे शेवटी पोलीसांना कळवण्यात आलं. दुपारी ४.१५ च्या सुमारास पोलीसांनी ३ डेड बॉडीज मिळाल्याचं जाहीर केलं. WWE ने त्या रात्रीचा Raw Live शो रद्द केला आणि त्याऐवजी बेनवॉच्या करिअरवर स्पेशल कार्यक्रम प्रसारित केला.

chris-benoit-03-marathipizzaa

 

मात्र कार्यक्रम संपेपर्यंत पोलीसांच्या प्राथमिक तपासात काही तथ्य बाहेर आली होती आणि त्यावरून निघणारे निष्कर्ष केवळ भयानक होते.

पोलीसांच्या तपासानुसार २२ तारखेला बेनवॉने स्वत: आधी नॅन्सी चा गळा आवळून खून केला. तिचं प्रेत पाय बांधलेल्या, कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत सापडलं आणि जवळ बायबलची एक प्रत ठेवलेली आढळली.

७ वर्षांच्या डॅनिएलचा मृतदेहदेखील घरातच सापडला. त्याचासुद्धा गळा आवळण्यात आला होता आणि त्याच्या देखील मृतदेहाजवळ बायबलची एक प्रत सापडली. त्याचासुद्धा खून ख्रिसनेच केला असावा असं प्राथमिक तपासात दिसत होतं. मात्र सगळ्यात भयानक काही असेल तर त्याला मारण्यासाठी वापरलेली पद्धत.

रिपोर्ट्सनुसार बेनवॉने तो रिंग मध्ये फाईट दरम्यान प्रतिस्पर्धी प्रोरेसलर्स विरुद्ध वापरल्या जाणारी Crippler Crossface ही सबमिशन मुव्ह वापरून आपल्याच मुलाचा खून केला होता.

स्वत: बेनवॉचा मृतदेह त्याच्या घरातल्या जीममध्ये आढळला. त्याने weight lifting machine ला स्वत:ला लटकावून गळफास घेतला होता. त्या मशीनवर देखील पोलिसांना बायबलची एक प्रत सापडली.

हे सगळे डीटेल्स बाहेर आल्यानंतर WWE ने बेनवॉचा उल्लेख टाळण्याचा निर्णय घेतला. मंगळवार, २६ जूनच्या WWE ECW शो पूर्वी WWE चेयरमन व्हिंस मिकमॅन ह्यांनी एक स्टेटमेंट देत आपला हा निर्णय सगळ्यांना कळवला.

(क्रमशः)

पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

व्हिंस मिकमॅन ह्यांच्या स्टेटमेंटचा व्हिडीओ इथे बघू शकता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?