जपानी संस्कृतिची झलक असलेल्या चित्र विचित्र इमोजी चिन्हांचे आश्चर्यकारक अर्थ!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण स्मार्टफोनचा वापर करत आहेत – आणि त्या स्मार्टफोन मध्ये वॉट्सअप, ट्विटर आणि फेसबुक नसेल तरच नवल!

या सर्व गोष्टींनी आपलं अवघं जीवनचं बदलून टाकलंय. मुखावाटे व्यक्त होणाऱ्या भावना शब्दांवाटे व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आपण येथे उपभोगू शकतो. आणि शब्द देखील वापरायचे नसतील तर आपल्या भावनांना वाट करून देतात वॉट्सअप, ट्विटर आणि फेसबुकवर चॅटसाठी उपलब्ध असणाऱ्या इमोजी…!

emojis-meaning-marathipizza10

स्त्रोत

चित्र विचित्र प्रकारच्या ढीगभर इमोजी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये दिसतील. पण त्यांचे नेमके अर्थ काय हे मात्र नं उलगडलेलं कोडचं आहे. पण आता मात्र १००० हून अधिक इमोजी कॅरेक्टरचे अर्थ emojipedia.org  या वेबसाईटने उपलब्ध करून दिले आहेत.

आज जाणून घ्या, ९ महत्वांच्या चित्र विचित्र प्रकारच्या इमोजीचे अर्थ!

या सर्व इमोजींचा उगम जपान मध्ये झाला असून त्यामागे पारंपारिक कारणे देखील आहेत.

  • कार्प स्ट्रीमर

emojis-meaning-marathipizza02

 

जपान मध्ये ‘बाल दिन’ साजरा करण्यासाठी या माश्याच्या आकाराच्या इमोजीचा उपयोग पूर्वीपासून केला जातो.

या इमोजीला युनिकोड ६.० अंतर्गत २०१० मध्ये मान्यता मिळाली होती.

 

  • जापानी बाहुली

emojis-meaning-marathipizza01

 

या दोन गोंडस जापानी बाहुल्यांना दरवर्षी ३ मार्च ला साजरा केल्या जाणाऱ्या “बाहुली दिनी’  दाखवले जाते. हे चिन्ह जपान मधील ‘गर्ल्स डे’ चे प्रतिक आहे. पूर्वी जपान मध्ये पुरुषी बाहुल्यांना उजव्या बाजूला ठवले जायचे, पण आता तसे करत नाहीत.

 

  • क्रोधाचे प्रतिक

emojis-meaning-marathipizza03

 

लाल रंग म्हणजे राग आणि हिंसेचे प्रतिक मानला जातो. अश्या इमोजी जास्त करून कॉमिक्स मध्ये पाहायला मिळतात. एखाद्याला ठोसा मारताना अथवा मारामारी करताना दाखवायाचे असेल तर या चिन्हाचा वापर केला जातो.

  • पांढरे फुल

emojis-meaning-marathipizza04

 

या पांढरं फुल असणाऱ्या इमोजी मध्ये जपानी भाषेत काहीतरी लिहिलेले आढळते. त्याचा अर्थ आहे ‘Well Done’.

जपान मधील शिक्षक मुलांना शाबासकी देताना या चिन्हाचा वापर करतात. या इमोजीला देखील २०१० मध्ये मान्यता मिळाली.

  • खेळाचे पत्ते

emojis-meaning-marathipizza05

 

या पत्त्यांवर नंबर नसतात, या पत्त्यांचा उपयोग जपान मध्ये Hanafuda  नावाचा एक आगळा वेगळा खेळ खेळताना करतात.

  • नेम बॅड्ज

emojis-meaning-marathipizza06

 

हे इमोजी खासप्रकारच्या नेम बॅड्जसाठी वापरले जातात. जपानमधील बालवाडींमध्ये याचा उपयोग केला जातो.

  • सिम्बॉल फॉर बिगीनर

emojis-meaning-marathipizza07

 

पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या या शिल्ड आकाराच्या चिन्हाला जपानमध्ये ‘शोशींशा चिन्ह’ म्हणतात. जपानमध्ये ड्राईव्हिंग लाईसन्स मिळाल्याच्या एक वर्षानंतर हे चिन्ह दाखवले जाते. त्याचप्रकारे इतर देशांमध्ये L-प्लेट्सचा प्रयोग नवीन गाडी शिकणाऱ्या ड्राईव्हर्ससाठी केला जातो.

  •    Ophiuchus

emojis-meaning-marathipizza08

 

Ophiuchus चिन्हाला राशी अथवा ज्योतिषचक्रामध्ये १३ चे चिन्ह म्हणून ओळखले जाते. हे U आकाराचे असून त्यावर तरंग असणारी रेषा असते.

   जपानी राक्षस

emojis-meaning-marathipizza09

 

जपानी लोककथांमध्ये वाकडे दात, शिंग आणि विचित्र आकाराचे केस असणाऱ्या राक्षसांना Namahage (नामहागे) असे संबोधले जाते. जपान मध्ये अशी परंपरा आहे की नवीन वर्षाच्या संध्याकाळी पुरुष या राक्षसांच्या आकाराचे मुखवटे घालून तयार होतात आणि घरातून दुष्ट शक्तींना पळवून लावतात.

 

तर असे आहेत जपानच्या चित्र विचित्र इमोजीचे आश्चर्यकारक अर्थ!

सर्व इमोजी प्रतिमा स्त्रोत: emojipedia.org

====

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 59 posts and counting.See all posts by vishal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?