‘ह्या’ निर्णयांमुळे ‘२०१७’ हे वर्ष ठरलं एक ऐतिहासिक वर्ष

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आता आपण २०१७ या सालच्या शेवटच्या आठवड्यात आहोत, येत्या २ दिवसांनी नवीन वर्ष लागणार आहे. त्यामुळे आपण अनेक पैलूंवर २०१७ हे वर्ष कसं होतं याची चाचपणी करत असू. यावर्षी काय चांगल झालं? काय वाईट झालं? कुठल्या क्षेत्रात कोण वरचढ ठरलं? इत्यादी. पण एकूणच २०१७ हे संपूर्ण वर्ष एक ऐतिहासिक वर्ष ठरलं. कारण या वर्षी भारतीय न्यायव्यवस्थेने अनेक असे निर्णय दिलेत ज्यामुळे लोकांचा न्यायावर विश्वास आणखी प्रबळ झाला आहे. आपली न्यायव्यवस्था निष्पक्ष असल्याची ग्वाहीच या निर्णयांतून मिळते.

एकीकडे जिथे आपण बोलत असतो की, ही न्यायालयीन कारवाई म्हणजे काळे केस पांढरे होत पर्यंत काही निकाल यायचा नाही, पण दुसरीकडे यावर्षी अनेक असे ऐतिहासिक निर्णय आपल्या न्यायालयाने सुनावले ज्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले… यावर्षी अनेक वादग्रस्त प्रकरणांचे निर्णय सुनावले गेले… आज आम्ही तुमच्यासाठी यावर्षी आपल्या न्यायालयाने दिलेल्या काही ऐतिहासिक निर्णयांचा एक रिकॅप घेऊन आलो आहोत… ज्यामुळे हे वर्ष नेहमीच आपल्या लक्षात राहिलं..

 

राईट टू प्रायव्हसीवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय :

judgements-of-2017-inmarathi03
indianexpress.com


राईट टू प्रायव्हसीवर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. न्यायलयाने सांगितले की, गोपनीयता हा एक मूलभूत अधिकार आहे आणि तो संविधानाच्या कलम २१ अंतर्गत येतो. न्यायालयाने १९५४ मध्ये ८ न्यायाधीशांनी संवैधानिक बेंचच्या एमपी शर्मा केस आणि १९६२ मधील ६ न्यायाधीशांच्या बेंच च्या खड्ग सिंग केसमध्ये देण्यात आलेले निर्णय बदलले आहेत.

या दोन्ही प्रकरणांत गोपनीयता हा मुलभूत अधिकार नसल्याचे मानल्या गेले होते. केंद्र सरकारने न्यायालयात सांगितले होते की, गोपनीयता हा मुलभूत अधिकार नाही. या निर्णयाचा परिणाम सरळ सरळ आधार कार्ड आणि इतर सरकारी योजनांवर देखील पडला आहे. त्यामुळे सरकारी धोरणांचा आता नव्याने आढावा घ्यावा लागेल. म्हणजे तुमच्या गोपनीय माहितीला घेतल्या जाईल पण त्या माहितीला सार्वजनिक करता येणार नाही.

आरुषी तलवार केस चा निर्णय

 

judgements-of-2017-inmarathi04
firstpost.com

नोयडा इथे घडलेल्या आरुषी मर्डर मिस्ट्रीने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. मागील दहा वर्षांपासून हे प्रकरण चालत येत होत. १३ वर्षांच्या आरुषी तलवार तिच्या खोलीत मृतावस्थेत आढळली होती. ज्यानंतर सर्वांचा संशय हेमराज वर आला पण दुसऱ्याच दिवशी हेमराजचा मृतदेह गच्चीवर सापडला. ज्यानंतर पोलिसांचा आरुषीच्या आई-वडिलांवर संशय आला आणि अनेक कारवाया आणि दाव्यांनंतर अखेर न्यायालयाने आरुषीच्या आई-वडिलांना जामीन दिला.

 

राम रहीम यांना बलात्कार प्रकरणी दोषी मानून शिक्षा सुनावण्यात आली.

 

judgements-of-2017-inmarathi05

 

डेरा सच्चा सौदा चे मुख्य गुर्मीत राम रहीम यांना २००२ च्या एका बलात्कार प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली. डेराच्या एका साध्वीने तेव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना यांनी पत्र लिहून आपल्या सोबत झालेल्या अत्याचाराबद्दल वाच्यता केली होती. यानंतर राम रहीम बाबत अनेक खुलासे झाले. त्याच्या सेक्स गुहे पासून ते त्याच्या सर्व कारनाम्यांचे पितळ उघडे पडले. त्याचे अनेक भक्त होते, यात केवळ सामान्य जनताच नाही अनेक बडे-बडे नेते आणि ख्यातनाम व्यक्ती देखील त्याच्या संपर्कात होते, त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

त्याच्या समर्थकांनी राम रहीमला अटक केल्या विरोधात दिल्ली तसेच पंचकुला येथे अनेक हिंसक आंदोलन केलीत ज्यात ३० लोकांचा मृत्यू झाला तर २५० लोकं हे जखमी झाले होते.

 

निर्भया बलात्कार प्रकरणी आरोपींची अपील रद्द केली

 

judgements-of-2017-inmarathi
gazabpost.com

देशाच्या अस्मितेवर प्रश्नचिन्ह उठवणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरण देखील यावर्षी न्यायालयाने एक मुख्य निर्णय दिला. या गुन्ह्यातील आरोपींची फाशीच्या शिक्षेत बदल करण्यात आलेला नाही. ज्योती सिंह म्हणजेच निर्भया सोबत झालेल्या बलात्कार आणि नंतर उपचारादरम्यान तिचा झालेला मृत्यू, यामुळे देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आला होता. महिलांच्या सुरक्षेबाबत आणि निर्भयाला न्याय मिळवून देण्याकरिता देशात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली होती.

या गुन्ह्यातील आरोपींनी त्यांना देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षे विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केली होती, ज्याला रद्द करत न्यायालयाने त्यांना या अमानवीय अपराधाकरिता कठोर शिक्षा व्हावी असे सांगितले होते.

 

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा निर्णय

 

judgements-of-2017-inmarathi06
financialexpress.com

१९९३ साली मुंबईत घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटातील ६ आरोपींना १६ जून २०१७ साली विशेष न्यायालयाने दोषी ठरवले. विशेष न्यायाधीश गोविंद ए. सनप यांना गॅंगस्टर अबू सलेम, मुस्तफा दोसा, ताहेर मर्चंट, फिरोज खान आणि करीमुल्लाह खान यांच्या विरोधात काही ठोस पुरावे मिळाले.

बाबरी मशीद तुटल्यानंतर मुंबईत हा बॉम्बस्फोट घडवून आणला गेला होता, ज्यात २७५ लोकांचा नाहक बळी गेला होता. या प्रकरणी ६७ वर्षीय रियाज सिद्दिकी याला कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

 

चित्रपट गृहांत राष्ट्रगीत अनिवार्य नाही

 

judgements-of-2017-inmarathi01
gazabpost.com

सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटगृहांत राष्ट्रगीतावेळी उभं राहण्याच्या आदेशावर एक महत्वपूर्ण निर्णय सुनावला आहे. न्यायालयाने सांगितले की, जर कुठली व्यक्ती राष्ट्र्गीतावेळी उभी राहिली नाही तर याचा अर्थ असा नाही होत की तिच्यात देशाप्रती कमी आदर आहे, कोणालाही आपण देशभक्त होण्यास परावृत्त करू शकत नाही.

एका वर्षाआधी दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने चित्रपट गृहांत चित्रपट सुरु होण्याआधी राष्ट्रगीत लावणे अनिवार्य केले होते आणि त्याच्या सन्मानार्थ लोकांनी उभे राहण्याचा आदेश सुनावला होता. पण या निर्णयाचा काही लोकांनी राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला तसेच या निर्णयामुळे अनेकांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला म्हणून हा निर्णय बदलण्यात आला.

 

ट्रिपल तलाक ठरले बेकायदेशीर  

 

judgements-of-2017-inmarathi07
scit.edu

यावर्षी न्यायालयाने आणखी एक ऐतिहासिक निर्णय दिला, जो मुस्लीम महिलांकरिता खरच महत्वाचा ठरला. न्यायालयाने ट्रिपल तलाक ला बेकायदेशीर जाहीर केले. न्यायलयाने सांगितले की, मुस्लीम समुदायात लग्न तोडण्याची ही एक अतिशय वाईट पद्धत आहे. हे अनावश्यक आहे. असे सांगत न्यायालयाने एक प्रश्न देखील उचलला की, जे धर्मानुसारच घृणास्पद आहे ते कायद्यानुसार वैध राहू शकते का? या प्रकरणाच्या सुनावणी वेळी हे देखील सांगितल्या गेले की, कश्या प्रकारे एखादी वाईट प्रथा श्रद्धेचा विषय होऊ शकते.

न्यायालयाने इस्लामिक देशांत ट्रिपल तलाक संपला असताना भारता सारख्या स्वतंत्र देशात असे का नाही होऊ शकत असे देखील विचारले. यावेळी न्यायालयात ३ न्यायाधीश या प्रथेला असंवैधानिक घोषित करण्याच्या पक्षात होते तर २ याच्या विरोधात होते.

१५ वर्षांच्या लग्नानंतर शायरा हिच्या पतीने तिला ट्रिपल तलाक दिला होता, ज्याच्या एका वर्षानंतर ३५ वर्षीय शायरा बानो यांनी २०१६ ला या प्रथेला न्यायालयात चॅलेंज केले होते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *