भारतातील ‘या’ वकिलांची एका खटल्याची फी, नुसती ऐकूनच डोळे पांढरे होतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

न्यायालयामध्ये कोणताही खटला लढण्यासाठी एका वकिलाची गरज असते. जो आपली बाजू न्यायालयात न्यायाधीशांच्या समोर मांडू शकतो आणि आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतो. आपल्या हक्काकरिता लढण्यासाठी किंवा एखाद्याच्या खोट्या आरोपांना चुकीचे ठरवण्यासाठी वकील हा खूप महत्त्वाचा असतो.

lawyer-marathipizza02
newseastwest.com

वकील हे हुशार असतात आणि कायद्याविषयीच्या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान त्यांच्याकडे असते. याच कायद्याविषयी असलेल्या ज्ञानाच्या जोरावर ते लोकांना न्याय मिळवून देतात. त्याच्या बदल्यात आपल्याला त्यांना त्यांचे ठरलेले मानधन द्यावे लागते.

आज आम्ही तुम्हाला आपल्या देशातील अशा काही वकीलांबद्दल सांगणार आहोत जे सर्वात जास्त मानधन घेतात.

१. राम जेठमलानी

 

Expensive Lawyers.Inmarathi
rapidleaks.com

या यादीमध्ये सर्वात पहिले नाव येते, ते म्हणजे राम जेठमलानी यांचे. राम जेठमलानी हे एका खटल्याचे सुमारे २५ लाख रुपये घेत असत.

राम जेठमलानी यांचा खूप मोठमोठ्या खटल्यांमध्ये सहभाग होता.

पण त्यांचा मुख्य खटला इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या गुन्हेगारांना शिक्षा देणे आहे, तसेच ते जेसिका मर्डर केसमध्ये दोषी असलेल्या मनू शर्माचे वकील म्हणून ओळखले जात.

राम जेठमलानी यांचे संपूर्ण नाव राम भूलचंद जेठमलानी आहे. त्यांचा जन्म १४ सप्टेंबर १९२३ मध्ये सिंधी ब्रिटीश भारताच्या शिकारपूर शहरात झाला होता. जेठमलानी हे सुप्रसिद्ध भारतीय वकील आणि राजनीती तज्ञ होते. ८ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांचं निधन झालं.

२. फली नरीमन

 

Expensive Lawyers.Inmarathi1
kohraam.com

या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर फली सॅम नरीमन येतात. फली नरीमन हे एका खटल्याचे ८ ते १५ लाख रुपये घेतात. फली नरीमन यांच्या मुख्य केसमध्ये तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यामध्ये चाललेला कावेरी नदीचा वाद याचा समावेश आहे.

३. के. के. वेणुगोपाल

 

Expensive Lawyers.Inmarathi2.
moneycontrol.com

के. के. वेणुगोपाल यांना पद्म भूषण आणि पद्म विभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांचे पूर्ण नाव कोट्टयन कटंकोट वेणुगोपाल आहे. के. के. वेणुगोपाल हे एका खटल्याचे ५ ते १५ लाख रुपये घेतात.

त्यांच्या प्रमुख केसमध्ये आधारकार्ड अनिवार्य करणे प्रकरण, सबरीमालामधील जेंडर भेदभाव प्रकरण यांचा समावेश आहे.

के. के. वेणुगोपाल हे भारताचे १५ वे अटर्नी जनरल (महान्यायवादी) आहेत. अटर्नी जनरल हा सर्वोच्च न्यायालयात आणि राज्याच्या उच्च न्यायालयात भारत सरकारचे पक्ष मांडतो. अटर्नी जनरलला संसदेच्या दोन्ही सदनांच्या कार्यवाहीमध्ये भाग घेण्याचा आणि बोलण्याचा अधिकार दिलेला असतो, पण मत देण्याचा अधिकार नसतो.

४. गोपाल सुब्रमण्यम

 

Expensive Lawyers.Inmarathi3
ndtvimg.com

गोपाल सुब्रमण्यम हे प्रत्येक खटल्याचे ५ ते १६ लाख रुपये घेतात. यांच्या मुख्य केसमध्ये ग्राहम स्टेंस मर्डर केस, जेसिका लाल मर्डर केस आणि पार्लमेंटवरील आतंकवाद्यांनी केलेला हल्ला ह्या आहेत.

५. पी. चिदंबरम

 

Expensive Lawyers.Inmarathi4
newindianexpress.com

नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर वादांमध्ये अडकलेल्या शिवराज पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे चिदंबरम यांना भारताचे गृहमंत्री आणि केंद्रीय वित्तमंत्री बनवण्यात आले होते. या यादीमध्ये ते पाचव्या स्थानावर आहेत.

पी. चिदंबरम प्रत्येक खटल्याचे ६ ते १५ लाख रुपये घेतात.

६. हरीश साळवे

 

Expensive Lawyers.Inmarathi5
livelaw.in

हरीश साल्वे हे या यादीमध्ये सहाव्या स्थानावर येतात. ते प्रत्येक खटल्याचे ६ ते १५ लाख रुपये घेतात. हरीश साल्वे हेच ते वकील आहेत, ज्यांनी सलमान खानला हिट अँड रन केसमधून सोडवले होते. याव्यतिरिक्त अंबानी बंधूंमध्ये असलेल्या कृष्णा गोदावरी गॅस बेसिन केसमध्ये हरेश साल्वे मुकेश अंबानीकडून लढले होते.

टाटा ग्रुप, ITC लिमिटेड, तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जय ललिता यांच्यासारख्या हायप्रोफाईल केस साल्वे लढले आहेत.

७. अभिषेक मनु सिंघवी

 

Expensive Lawyers.Inmarathi6
indiatimes.com

अभिषेक मनु सिंघवी हे प्रत्येक खटल्याचे ६ ते १५ लाख रुपये घेतात आणि ते काँग्रेसचे नेता देखील आहेत. सिंघवी यांनी केरळ उच्च न्यायालयामध्ये लॉटरी माफियाचे प्रतिनिधित्व केले. जे खूप वादग्रस्त ठरले होते.

८. सी. ए. सुंदरम

 

Expensive Lawyers.Inmarathi7
twimg.com

सी. ए. सुंदरम हे प्रत्येक खटल्याचे ६ ते १५ लाख रुपये घेतात. त्यांच्या प्रमुख खटल्यांमध्ये बीसीसीआयकडून वकिली करणे आणि एस. रंगराजनवाले केस निकालात काढणे यांचा समावेश आहे.

९. सलमान खुर्शीद

 

Expensive Lawyers.Inmarathi8
financialexpress.com

नामवंत वरिष्ठ वकील, प्रख्यात लेखक आणि कायदेपंडित, विदेशी मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री सलमान खुर्शीद हे प्रत्येक खटल्याचे ५ ते ११ लाख रुपये घेतात आणि ते कॉंग्रेसचे नेते देखील आहेत.

१०. पराग त्रिपाठी

 

Expensive Lawyers.Inmarathi9
wp.com

पराग त्रिपाठी हे प्रत्येक खटल्याचे ५ ते ११ लाख रुपये घेतात आणि ते प्रसिद्ध वकीलांपैकी एक वकील आहेत.

असे हे आणि यांच्यासारखे इतर प्रसिद्ध वकील त्यांच्या जास्त मानधनामुळे आणि चातुर्यामुळे नेहमीच चर्चेत असल्या

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “भारतातील ‘या’ वकिलांची एका खटल्याची फी, नुसती ऐकूनच डोळे पांढरे होतात!

  • January 18, 2019 at 8:21 pm
    Permalink

    very

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?