“चोराला धडा शिकवण्याचं ट्रेनिंग” घेऊन “जगातील सर्वश्रेष्ठ बॉक्सर” बनलेला अवलिया

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

मोहम्मद अलीची जीवनगाथा ही आधुनिक युगातील अतिशय प्रेरणादायी जीवनगाथांपैकी एक आहे. ते तरुण पिढीचं नेतृत्व करणारे एक अस्सल बॉक्सर आणि कवी होते. म्हणूनच की काय तरुणांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ होती.

नेल्सन मंडेला प्रमाणे मोहम्मद अली देखील हटवाद आणि वर्णद्वेषाशी लढले. समाजातील या घातक प्रवृत्तींशी लढत असतानाच रिंग मध्ये ते सनी लिस्टो, जॉर्ज फोरमॅन आणि फ्रेझीयर सारख्या महान बॉक्सरशी लढले आणि त्या सर्वाना त्यांनी चीतपट केले हे विशेष!

त्यांनी बॉक्सिंगमध्ये ऑलम्पिक गोल्ड मेडल मिळवून आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं होतं.

 

moahmmad-ali-marathipizza01

स्रोत

बॉक्सिंगमधून निवृत्त झाल्यानंतर मोहम्मद अली यांनी समाजसेवेचा आणि जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कार्य करण्याचा मार्ग अवलंबला.

१७ जानेवारी १९४२ रोजी अमेरिकेमध्ये जन्मलेल्या मोहम्मद आली यांनी जीवनात संघर्ष करत प्रसिद्धी मिळवली. जगभर त्यांचे नाव झाले. लोकांच्या गळ्यातील ते ताईत बनले. लोकांनी त्यांच्यावर जितकी माया केली तितकीच माया मोहम्मद अलींनी आपल्या चाहत्यांवर देखील केली.

या “The People’s Champion“ ने वयाच्या ७४ व्या वर्षी ३ जून २०१६ रोजी अखेरचा श्वास घेतला आणि अख्खे बॉक्सिंग विश्व हळहळले. अश्या या लढाऊ व्यक्तिमत्वाबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

 

moahmmad-ali-marathipizza02

स्रोत

१९५४ सालची गोष्ट आहे. १२ वर्षांच्या लहानग्या मोहम्मद अलीची सायकल कोलंबिया ऑडीटोरीयम बाहेरून कोणीतरी लंपास केली. ही सायकल म्हणजे मोहम्मद अलींचा जीव की प्राण होती.

मोहम्मद अलीने पोलीसाला गाठले आणि त्याला म्हणाला की –

जर तुम्हाला चोर सापडला तर त्याला माझ्या हवाली करा. मी त्याला सरळ करतो.

जॉय मार्टिन नावाच्या त्या पोलिसाला लहानग्या मोहम्मद अलीचे कौतुक वाटले. हा पोलीस स्वत: बॉक्सिंग ट्रेनर होता. त्याने लहानग्या मोहम्मद अलीला बॉक्सिंग शिकण्याचे आमंत्रण दिले.

चोराला मारण्याच्या उद्देशाने बॉक्सिंग शिकण्यासाठी गेलेल्या मोहम्मद अलींनी पुढे काय इतिहास घडवला हे वेगळं सांगायची गरज नाही.

 

moahmmad-ali-marathipizza03

स्रोत

हे ऐकून आश्चर्य वाटेल पण मोहम्मद अली दगडांच्या सहाय्याने बॉक्सिंगचा सराव करायचे. म्हणजे आपल्या सहकाऱ्याला ते स्वत:च्या दिशेने दगड फेकायला सांगायचे आणि समोरून येणाऱ्या दगडाला आपल्या हाताने अडवायचे.

आजवर जगातील कोणत्याही बॉक्सरने अश्या प्रकारे बॉक्सिंगचा सराव केल्याचे ऐकिवात नाही.

 

moahmmad-ali-marathipizza04

स्रोत

२९ ओक्टोंबर १९६० या दिवशी मोहम्मद अलींनी टनी हन्स्केरला हरवून आपली पहिली प्रोफेशनल फाईट जिंकली होती आणि विशेष म्हणजे हा टनी हन्स्केर वेस्ट वर्जिनियाचा पोलीस प्रमुख होता.

अश्याप्रकारे मोहम्मद अलींनी एका पोलिस अधिकाऱ्याला बेदम धुवून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

 

moahmmad-ali-marathipizza05

स्रोत

ही गोष्ट बऱ्याच जणांना माहित नाही पण मोहम्मद अलींमध्ये एक कवी, गायक आणि नट लपलेला होता.

१९६३ साली मोहमद अलींनी त्यांचा गाजलेला “I AM The Greatest” हा अल्बम रिलीज केला होता आणि त्या पुढील सहा महिन्यातच चॅम्पियन सनी लिस्टोनला हरवत त्यांनी World Heavyweight Title वर आपले नाव कोरले आणि आपण Greatest असल्याचे सिद्ध केले.

 

moahmmad-ali-marathipizza06

स्रोत

मोहम्मद अलींना विमानाची फार भीती वाटायची. ही गोष्ट १९६० च्या काळात रोम ऑलम्पिकसाठी युरोपला निघताना त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आली. त्या वेळी ते इतके घाबरले होते की विमानात पॅराशूट परिधान करून ते बसले होते.

 

moahmmad-ali-marathipizza07

स्रोत

मोहम्मद अलींनी देशासाठी बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून आणल्यानंतरही त्यांना स्वत:च्याच देशात वर्णद्वेषाचा सामना करावं लागला. जेव्हा मोहम्मद अली सुवर्णपदक जिंकून परतले तेव्हा केंटुकी मध्ये एक पार्टी आयोजित केली होती.

गळ्यात सुवर्णपदक घालून मोहम्मद अली आत शिरले आणि तेथल्या एका वेटरने त्यांना अडवून सांगितले,

आम्ही निग्रोंना सर्व्ह करत नाही

मोहम्मद अलींनी देखील जास्त वाद न घालता उत्तर दिले की,

ते सर्व ठीक आहे. पण आम्हाला खाऊ नको, आम्ही जातो.

यावरून लक्षात येते की त्याकाळी अमेरिकेत वर्णद्वेष किती प्रमाणात माजला होता.

 

moahmmad-ali-marathipizza08

स्रोत

१९६४ साली आपल्या पहिल्या वर्ल्ड टायटल फाईट मध्ये मोहम्मद अलींना पुन्हा सनी लिस्टोनचा सामना करावा लागला. सनी लिस्टोनने आधीच्या लढतीत फॉर्मर चॅम्पियन फ्ल्योयड पॅटरसन याला हरवले होते.

त्यामुळे मोहम्मद अली सनी लिस्टोन समोर टिकणार नाही याची सर्वांना खात्री होती.

परंतु अवघ्या २२ वर्षाच्या मोहम्मद अलींनी चॅम्पियन सनी लिस्टोनचा ७-१ असा धुव्वा उडवत वर्ल्ड टायटल स्वत:कडे खेचून घेतले.

 

moahmmad-ali-marathipizza09

स्रोत

मोहम्मद अली हे मुळचे आयरिश होते ही गोष्ट देखील सहसा कोणाला ठावूक नाही. १८०० मध्ये त्यांचे पूर्वज आयर्लंड वरून अमेरिकेमध्ये स्थायिक झाले होते.

१९७१ मध्ये जोए फ्रेझीयर बरोबर व्हियेतनाम मध्ये फाईट करण्यास मोहम्मद अलींनी नकार दिला म्हणून त्यांच्यावर साडेतीन वर्षांसाठी बॉक्सिंग खेळण्यासाठी बंदी घालण्यात आली.

पण साडेतीन वर्षाननंतर जेव्हा मोहम्मद अली रिंगमध्ये परतले तेव्हा मात्र ती या शतकातील सर्वात मोठी फाईट ठरली. या फाईटची डिमांड इतकी होती की भल्या भल्या श्रीमंत माणसांना या फाईटची तिकीट मिळाली नाहीत.

 

moahmmad-ali-marathipizza00

स्रोत

क्रूरकर्मा सद्दाम हुसेन याने १९९० साली कुवेत मध्ये २००० परदेशी नागरिकांना ओलीस ठेवले होते. त्यामध्ये काही अमेरिकन नागरिक देखील होते. मोहम्मद अली यांना ही गोष्ट पटली नाही. ते स्वत:हून सद्दाम हुसेनला भेटायला गेले आणि बंदींना सोडून देण्याची विनंती केली.

सद्दाम हुसेन याने मोहम्मद अलींची विनंती मान्य केली नाही. परंतु जगातील सर्वात प्रसिद्ध मुस्लीम व्यक्ती आपल्याला विनंती करतोय हे पाहून सद्दाम हुसेन याने पुढच्या ५० मिनिटांत सर्व १५ अमेरिकन नागरिकांना सोडून दिले.

ही गोष्ट मोहम्मद अलींच्या आयुष्यातील खूप मोठी परिणामकारक गोष्ट ठरली आणि अमेरिकन नागरिकांच्या मनात त्यांनी कायमचे घर केले.

 

moahmmad-ali-marathipizza11

स्रोत

मोहम्मद अली हे व्यक्तिमत्त्व समजणे तसे फारच कठीण! त्यांच्या जीवनात विसंगत प्रसंगांची इतकी सरमिसळ आहे की मोहम्मद अली हे नेमक्या कोणत्या प्रकारातेल होते हे कळतच नाही.

बहुधा स्वत:चा हाच दुसऱ्यांना न कळू देण्याचा गुण त्यांनी बॉक्सिंग रिंग मध्ये वापरला आणि त्याच्याच जोरावर आजवरचा सर्वोत्तम बॉक्सर म्हणून नाव कमावले…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?