गणतंत्राची “विसरलेली” व्याख्या समजून घ्या

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

१५ ऑगस्ट, २६ जानेवारी आला की आपल्याकडे उत्साहाला काही सीमा नसते. आताशा डीजेच्या जमान्यात “मेरे देश की धरती” पासुन तर “वंदे मातरम” पर्यंत जोरजोरात प्रदर्शन सुरु असतं.

सरकारी कचेरीत, शाळेत झेंडावंदन आटोपली जातात, IT कंपन्यांमध्ये खादी कपडे घालुन फुगे उडवुन साजरा होतो. बास असा संपतो आमचा उत्साह…! बाकी सेलेब्रेशन सोडलं तर खरंच आपण गणतंत्र वगैरे विचार करतो का? तसा वेळही नसतो म्हणा आपल्याला. असलाच तर आपण “संविधानाने दिलेले अधिकार” ह्यावर खुप बोलतो, पण संविधानाने दिलेल्या जवाबदाऱ्या (duties) वर कदाचित काहीच बोलत नाही.

कधी कधी शाळेत शिकलेल्या नागरिकशात्राची उजळणी करणं छान असतं नाही?

बघुयात काय म्हणतात आपल्या Art. 51A मधल्या Fundamental Duties:

===

1) To abide by the constitution and respect its ideal and institutions;

Constitution03_Preamble-marathipizza

2) To cherish and follow the noble ideals which inspired our national struggle for freedom;

3) To uphold and protect the sovereignty, unity and integrity of India;

4) To defend the country and render national service when called upon to do so;

PARTHA DALAL PHOTOGRAPHY VIA GETTY IMAGES
PARTHA DALAL PHOTOGRAPHY VIA GETTY IMAGES

5) To promote harmony and the spirit of common brotherhood amongst all the people of India transcending religious, linguistic and regional diversities, to renounce practices derogatory to the dignity of women;

6) To value and preserve the rich heritage of our composite culture;

 

7) To protect and improve the natural environment including forests, lakes, rivers, and wild-life and to have compassion for living creatures;

8) To develop the scientific temper, humanism and the spirit of inquiry and reform;

9) To safeguard public property and to abjure violence;

kashmiri-youth-violence-marathipizza04

10)To strive towards excellence in all spheres of individual and collective activity, so that the nation constantly rises to higher levels of endeavor and achievement.

11)who is a parent or guardian , to provide opportunities for education to his child, or as the case may be, ward between the age of six and fourteen years.

===

बहुतेकांनी न वाचता पेज स्क्रोल डाउन केलं असेल. 😀

साहजिक आहे म्हणा, कोण वाचेल आणि ते ही जेंव्हा आपल्या घटनाकारांनी ह्या Fundamental Duties ना non-enforceable and non-justiciable ह्या श्रेणीत टाकलंय तेंव्हा?

एकूण काय तर तुम्ही ह्या duties पाळल्या नाहीत तरी कोणी तुम्हाला जेल मध्ये टाकणार नाहीय. पण म्हणुन का आपण त्या पाळायच्याच नाहीत का?

Constitution04

ह्या सगळ्यात मला मागच्या वर्षीचा किस्सा आठवतो, दरवर्षी प्रमाणे मी सकाळी सकाळी २६ जानेवारीला झेंडा वंदनाला माझ्या कोचीन मधल्या ऑफिस मध्ये गेलो होतो. ऑफिसच्या सुरक्षारक्षकांनी छानशी परेड करून दाखविली, छोटेखानी बक्षीस वितरण सोहळा आटोपला आणि मग चहापाण्याचा कार्यक्रम सुरु झाला. ऑफिस मधल्या काही व्यक्तींनी त्यांची चिल्लीपिल्ली सुद्धा सोबत आणली होती, छानसा झब्बा, त्यावर कुर्ता, गोड दिसत होती पोरं.

चहापाणी आटोपल्यावर त्या पोरीच्या वडिलांनी चहाचा डिस्पोजेबल कप पेपर टॉस गेम सारखा दुरून मस्त पैकी style मध्ये कचरापेटीच्या दिशेने फेकला आणि नेम चुकुन तो पेटी बाहेर पडला.

त्या व्यक्तींनी तोंड वाकडं केलं आणि आपल्या मुलीचा हात पकडुन जायला लागला.

ती पोरगी मात्र अस्वस्थ होती…बापाच्या तावडीतून हात सोडवुन तिनी जी धूम ठोकली आणि तो बाहेर पडलेला चहाचा पेपर ग्लास उचलुन डब्यात टाकला आणि टाळ्या वाजवत ओरडली –

Daddy its done…! Yayyyy!

त्या ४-५ वर्षाच्या पोरीला कदाचित पेपर टॉस जास्त चांगला येत असावा….!

तिला कदाचित fundamental duties, गणतंत्र दिवस काय हे माहिती नसेल कदाचित पण काय फरक पडतोय तिला तो उमजला होता आणि तेही तिच्या आणि तिच्या पालकांच्या नकळत.

देशभक्ती, त्याची व्याख्या, अधिकार, जवाबदारी, देशभक्तीपर भाषणं, बौद्धिक ह्या सगळ्या गोष्टी गोंधळात भर घालतात फक्त, पण ह्या सगळ्या गोंधळा पेक्षा चांगला माणुस बनणं हे जास्त सोपंय नाही…!

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?