‘India’s space program’ चे जनक डॉ. विक्रम साराभाई…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

 

डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या अथक परिश्रमामुळेच आज आपल्या जवळ भारतीय अंतराळ अनुसंधान संघटन म्हणजेच ISRO सारखी विश्वस्तरीय संघटना आहे.

 

Dr.-Vikram-Sarabhai02-marathipizza
isro.gov.in

विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ ला अहमदाबाद येथील एका संपन्न कुटूंबात झाला. त्यांचे वडील हे एक उद्योगपती होते. त्यांचे बर्‍याच राजकीय व्यक्तिंशी संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आदी लोकांचे त्यांच्या घरी येणं-जाणं  होतं.

विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वत:ची मॉन्टेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईंचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. त्यांना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांची त्यांना आवड होती.

 

Dr.-Vikram-Sarabhai05-marathipizza
blogspot.in

आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगळूरूमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्समध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली.

 

Dr.-Vikram-Sarabhai1-marathipizza
mid-day.com

१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कॉस्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रॉपिकल लॅटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी ११ नोव्हेंबर १९४७ला अहमदाबाद येथे Physical Research Laboratory ची स्थापना केली. तेव्हा ते केवळ २८ वर्षांचे होते. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली.

डॉ. विक्रम यांनी होमी भाभा यांच्या मदतीने तिरुवनंतपुरम येथे देशातील पहिले वाहिले रॉकेट लॉन्चिंग स्टेशन बनविले. तर विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथे काही उद्योगपतींना सोबत घेऊन भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट- IIM) स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावली.

 

Dr.-Vikram-Sarabhai-marathipizza
vssc.gov.in

१९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.

 

Dr.-Vikram-Sarabhai03-marathipizza
vssc.gov.in

डॉ. विक्रम यांनी India’s space programme ला महत्व देत सांगितले होते की,

काही लोक आहेत जे विकसनशील देशांतील अंतरिक्ष हालचालींच्या प्रासंगिकतेवर प्रश्न उचलतात. आमच्या समोर उद्देशाची कोणतीही अस्पष्टता नाही. आम्ही चंद्र किंवा ग्रहांचा शोध, मानवांसहित  अंतराळ-उड्डाण यात आर्थिक दृष्ट्या उन्नत राष्ट्रांसोबत प्रतीस्पर्धेची कुठलीही कल्पना नाही करतोय. पण आम्हाला खात्री आहे की जर आपल्याला राष्ट्रीय स्तरावर आणि राष्ट्रांच्या समुदायात एक महत्वपूर्ण भूमिका निभवायची असल्यास, तर आपल्याला मानव आणि समाजाच्या वास्तविक समस्यांकरिता प्रगत तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यात कोणाच्याही मागे राहायला नको.

डॉ. विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली पद्मभूषण आणि १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण हे पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात आले. दि. ३० डिसेंबर १९७१ साली केरळ राज्यातील कोवलम येथे रात्री झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?