या महाशिवरात्रीला जाणून घ्या, ज्योतिर्लिंग आणि शिवलिंग यांच्यामधील फरक

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आज महाशिवरात्र आहे. शिवरात्री वर्षभरातील प्रत्येक महिन्यात येत असते, परंतु माघ महिन्यातील महाशिवरात्री ही महत्त्वाची मानली जाते. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी शैव पंथीय उपवासाचे व्रत करतात. भगवान शंकराची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात साजरा केला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस बहुधा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो.

 

shankar-marathipizza
guruprasad.net

शिवपुराणच्या एका कथेनुसार, एकदा ब्रम्हा आणि विष्णू ही या गोष्टीवर वाद करत होते की, या दोघांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे. अशावेळी या दोघांचा हा भ्रम संपवण्यासाठी भगवान शंकर हे महान ज्योतीस्तंभाच्या स्वरूपात प्रकट झाले, ज्याचा दाह ब्रह्मा आणि विष्णू सहन करू शकले नाही. यालाच ज्योतिर्लिंग म्हटले जाते.

तिथेच, लिंगाचा अर्थ आहे, प्रतीक म्हणजेच शंकराचे ज्योती रूपाने प्रकट होणे आणि सृष्टीचे निर्माण करण्याचे प्रतीक. ज्योतिर्लिंग हे कधीही स्वयंभू असतात. पण शिवलिंग हे मनुष्याकडून स्थापित करण्यात आलेले आणि स्वयंभू दोन्ही असू शकतात.

 

Difference between shiva linga and jyotirlinga.Inmarathi4
holidify.com

हिंदू धर्म ग्रंथांमध्ये भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगाचा उल्लेख असल्याचे दिसून येते. जिथे – जिथे ही शिव ज्योतिर्लिंग स्थापित आहेत. तिथे आज भव्य शिव मंदिर बनलेली आहेत. सध्या भारताच्या प्रमुख तीर्थस्थान आणि धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या १२ ज्योतिर्लिंगाचे वर्णन शिव पुराणाच्या ‘रुद्रसंहिता’ याच्यामध्ये मिळते.

 

Difference between shiva linga and jyotirlinga.Inmarathi0

 

१. सोमेश्वर म्हणजेच सोमनाथ :

ह्या ज्योतिर्लिंगाला प्रथम ज्योतिर्लिंग मानले जाते. जे गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशात अस्तित्वात आहे. याला प्रभास तीर्थ असे देखील म्हटले जाते.

 

somnath-mandir-inmarathi
www.webgujarat.com

 

२. श्रीशैलम मल्लिकार्जुन :

हे ज्योतिर्लिंग आंध्रप्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यामध्ये श्रीशैल नावाच्या पर्वतावर स्थित आहे. याला दक्षिणेचा कैलास देखील मानले गेले आहे.

 

Difference between shiva linga and jyotirlinga.Inmarathi
amazonaws.com

 

३. महाकालेश्वर :

हे ज्योतिर्लिंग मध्यप्रदेशच्या उज्जेनमध्ये स्थित आहे. याला प्राचीन काळामध्ये अवंतिका किंवा अवंती म्हटले जात होते.

 

mahakaleshvar-inmarathi
ghumakkar.com

 

४. ओकांरेश्वर :

हे ज्योतिर्लिंग देखील मध्य प्रदेशमध्ये आहे. या राज्याच्या मालवा क्षेत्रामध्ये स्थित असलेले हे ज्योतिर्लिंग नर्मदा नदीच्या तटावर स्थित आहे.

 

shri-omkareshwar-jyotirlinga-inmarathi
media-cdn.tripadvisor.com

 

५. केदारेश्वर :

हे शिव ज्योतिर्लिंग उत्तराखंडामध्ये हिमालयाच्या सुळक्यावर विराजमान श्री केदारनाथजी किंवा केदारेश्वरच्या नावाने प्रसिद्ध आहे. श्री केदार पर्वत शिखराच्या पूर्वेला अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर भगवान बद्रीनाथाचे मंदिर आहे.

 

Difference between shiva linga and jyotirlinga.Inmarathi1
firstpost.com

 

६. भीमाशंकर :

महाराष्ट्रामध्ये स्थित असलेले हे ज्योतिर्लिंग भीमा नदीच्या किनाऱ्यावर सह्याद्री पर्वतावर आहे. भीमा नदी याच पर्वतावरून निघते.

 

bhimashankar-inmarathi
jagranimages.com

 

७. विश्वेश्वर :

वाराणसी किंवा काशीमध्ये विराजमान भूतभावन भगवान श्री विशवनाथ म्हणेजच विश्वेश्वर महादेवाला सातवे ज्योतिर्लिंग मानले जाते.

 

kashi-Vishwanath-Temple-Varanasi-inmarathi
www.shivji.in

 

८. त्र्यंबकेश्वर :

भगवान शंकराचे आठवे ज्योतिर्लिंग महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रम्हगिरीच्या जवळ गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर स्थित आहे.

 

Difference between shiva linga and jyotirlinga.Inmarathi2
outlookindia.com

 

९. वैजनाथ महादेव :

महाराष्ट्रात परळी वैजनाथ या गावी स्थित असलेले वैजनाथ किंवा बैद्यनाथ हे महादेवाचे मंदिर नववे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रात “परल्याम् वैजनाथम् च” असा उल्लेख या मंदिराबद्दल आला आहे.

 

Parli_Vaijnath_Temple_inmarathi
en.wikipedia.org

 

१०. नागेश्वर महादेव :

भगवान शंकराचे हे दहावे ज्योतिर्लिंग बडोदा क्षेत्रामध्ये गोमटी द्वारकेच्या जवळ आहे. या ठिकाणाला दारुकावन  देखील म्हटले जाते. या ज्योतिर्लिंगाशी निगडित काही वाद देखील आहेत. खूप लोक महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात असलेल्या औंढा गावामध्ये स्थित शिवलिंगाला नागेश्वर ज्योतिर्लिंग मानतात.

 

Nageshwar_Temple-inmarathi
upload.wikimedia.org

 

११. रामेश्वरम :

श्री रामेश्वर हे अकरावे ज्योतिर्लिंग आहे. या तीर्थाला सेतुबंध तीर्थ म्हटले गेले आहे. हे ज्योतिर्लिंग तामिळनाडूच्या समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे.

 

Difference between shiva linga and jyotirlinga.Inmarathi3
tirthyatraindia.com

१२. घुष्मेश्वर :

घुष्मेश्वर या बाराव्या ज्योतिर्लिंगाला घृष्णेश्वर या घुसृणेश्वर नावाने देखील ओळखले जाते. हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यामधील दौलताबादपासून १८ किलोमीटर लांब बेरुलठ गावाच्या जवळ स्थित आहे.

 

ghrushneshvar-inmarathi
ghumakkar.com

असे हे बारा ज्योतिर्लिंग भगवान शिवच्या आराधनेसाठी खूप महत्त्वाची मानली जातात. ही सर्व शंकराची जागृत देवस्थाने आहेत. महाशिवरात्रीला या सर्व ज्योतिर्लिंगामध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved

One thought on “या महाशिवरात्रीला जाणून घ्या, ज्योतिर्लिंग आणि शिवलिंग यांच्यामधील फरक

  • February 13, 2018 at 8:44 pm
    Permalink

    Vaidyanaath is in Maharashtra, At Parli in Beed District

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?