या शहरात म्हणे मरण्यास मनाई आहे!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

मरणं काही सांगून येतं का? प्रत्येकाच्या नशिबी जो मृत्यू दिवस असेल त्या दिवशी तो माणूस मरणारच! मरणाला आपण तर काही थांबवू शकत नाही. पण समजा कोणी मरणावर बंदी घातली तर?? तुम्ही म्हणालं, इतर गोष्टींवर ठीक आहे , पण जी गोष्ट आपल्या नियंत्रणात नाही ती गोष्ट घडायची तेव्हाच घडणार. खरतरं मरणावर बंदी वगैरे हा आपल्या लोकांना निव्वळ मूर्खपणा वाटेल. पण जगामध्ये एक असं ठिकाण आहे जेथे मरणावर बंदी आहे. बंदी म्हणजे असं समजा की इथे नियमचं लागू आहे की कोणी या प्रदेशात मरायचं नाही. काय म्हणता? अजून विश्वास बसतं नाही? मग हे चित्रविचित्र गौडबंगाल तुम्ही जाणून घ्यायलाचं हवं !

InMarathi Android App

longyearbyen-marathipizza00

स्रोत

नॉर्वे देशामधील लाँगेयरबेन या शहरामध्ये असा विचित्र नियम असून येथील लोकांना चक्क मरण्यास मनाई आहे. १९०६ साली खाणकामासाठी वसवण्यात आलेले लाँगेयरबेन हे शहर आता पर्यटन केंद्र बनले आहे.

longyearbyen-marathipizza01

स्रोत

उत्तर ध्रुवावर वसलेले हे शहर आपल्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. कडाक्याची थंडी आणि अवघी दोन हजार लोकवस्ती असलेल्या या शहरात ध्रुवीय अस्वलांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे येथे प्रत्येकाने बंदुक बाळगणे अनिवार्य मानले जाते.

longyearbyen-marathipizza02स्रोत

ध्रुवीय प्रदेश असल्याने येथे चार महिने सूर्यही उगवत नाही. अशी खासियत असलेल्या या शहरात मरण्यास मात्र मनाई आहे.
येथे कुणी गंभीर आजारी असेल किंवा मरणपंथाला लागले असेल. तर त्याला शेवटच्या दिवसांमध्ये विमानाने किंवा जहाजातून नॉर्वेच्या अन्य भागात हलवले जाते.

longyearbyen-marathipizza03

स्रोत

याचे कारण असे सांगितले जाते की या शहरातील दफनभूमी खूपच लहान असून, गेल्या ७० वर्षांपासून येथे कुणालाही दफन करण्यात आलेले नाही. तसेच अतिथंड वातावरणामुळे येथे दफन करण्यात आलेल्या मृतदेहांचे विघटन होत नाही. शास्त्रज्ञांना अशा विघटन न झालेल्या मृतदेहांमध्ये इन्फ्लुएंझाचे विषाणू आढऴल्यापासून येथे नो डेथ पॉलिसी लागू करण्यात आली आहे.

longyearbyen-marathipizza04

स्रोत

हे एक जागतिक आश्चर्य म्हणून घोषित करण्यास हरकत नाही !

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *