कम्युनिस्ट-ISIS संबंध आणि त्यांचे हिंसक व देशविघातक कृत्य

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

कोळिकोड मधील नादपूरम संघ कार्यालयावर बॉम्ब हल्ला करण्यात आलाय. ३ स्वयंसेवक जखमी झाले आहेत. त्या वरून अनेक प्रश्न मनात उठत आहेत. ह्यांना बॉम्ब मिळाला कुठून? स्थानिक मदतीशिवाय हे शक्य नाही, मग बॉम्बस्फोट करणारे स्थानिक लोक आहेत का? असतील तर कोण आहेत? कम्युनिस्ट, की मुस्लिम लीग की सरळ इसिस? हे प्रश्न वरपांगी वाटू शकतात…पण ते तसे नाहीत. ज्यांना केरळ मधल्या भीषण परिस्थितीची कल्पना नाहीय त्यांना ती कळावी म्हणुन हा लेखन प्रपंच.

स्रोत

 

नादपूरम हे गाव मलापूरम जिल्ह्यात येतं. मलापूरम हा तोच जिल्हा आहे जिथे जवळ जवळ १००% मुस्लिम वस्ती आहे. मलापूरम बद्दल main stream media मध्ये फारसं येत नाही, पण ह्या जिल्ह्याने उघडपणे पंचायत मध्ये ठराव पास करून शरिया कायदा जिल्ह्यापुरता अस्तित्वात आणायचा प्रयत्न काही वर्षांपूर्वी केला होता. इसिस ह्या दहशतवादी संघटनेचे धागेदोरे मलापूरम मधल्या शाळेतील, मदरसातील शिक्षकांपर्यंत पोहचले आहेत.

प्रायमरी शाळेत शिक्षिका असलेली एक महिला काही महिन्यांपूर्वी इसिस संबंधित कृत्यात सापडली होती. ह्यावरून लक्षात घ्या की कोवळ्या जिवांवर ह्या जिल्ह्यांमध्ये कसले संस्कार होताहेत. ह्या उपर राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचा एक अहवाल देखील मागे प्रसिद्ध झाला होता ज्यात स्पष्टपणे उल्लेख होता तो म्हणजे मलापूरम आणि कोळीकोड ह्या दोन जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या देशविघातक नेटवर्क चा. हे नेटवर्क इतकं पक्कं आहे की भारतातून जे तरुण इसिस मध्ये सहभागी व्हायला देश सोडून पळाले त्यात केरळ चा (म्हणजेच ह्या दोन जिल्ह्यांचा) वाटा लक्षणीय आहे.

डॉ. झाकीर नाईक ह्यांच्या इस्लामिक रिसर्च इंस्टिट्यूट ह्या वादग्रस्त संस्थेचे धागेदोरे देखील मलापूरम आणि कोळीकोड ह्या दोन जिल्ह्यांशी मिळतात.

 

ह्या संस्थेच्या अनेक देणग्या आणि काही आर्थिक उत्पन्नाचे स्रोत हे मलापूरम किंवा कोळीकोड ह्यांच्या द्वारेच मुंबईत नाईक च्या ऑफिस पर्यंत आले आहेत. इस्लामिक रिसर्च इंस्टिट्यूट च्या खजिनदाराकडून जी काही बातमी येते आहे ती फार भयंकर आहे. नाईक ह्याच्या संस्थेला येणारा पैसा असो किंवा अजुन इतर देशविघातक संस्थेला येणारा पैसे असो ह्यातला बराच पैसा हा सौदी अरब आणि इतर आखाती देशांमधून येतो. डॉ.नाईक ह्यांना तर २०१५ मध्ये किंग फैजल पुरस्कार सौदीच्या राजाकडून प्रदान करण्यात आला होता आणि त्यात मिळालेली बक्षिसाची सर्व रक्कम नाईक ह्यांनी त्याच दरम्यान स्वतःच्या संस्थेला दान केली होती, किती आहे माहितीय ती रक्कम ७.५० लाख रियाल म्हणजे भारतीय चलनात १ करोड ३४ लाख रुपये…!

(वाचा: हिंसाचाराविरोधात डाव्या संघटनांनी मोर्चा काढणे हास्यास्पद का आहे – वाचा )

वरील रक्कम फार थोडी आहे, केरळ मध्ये चालणाऱ्या मीडिया हाऊसेस ला जवळ जवळ ८०० कोटी रुपयांची देणगी अरब राष्ट्रांमधून दरवर्षी येत होती. नाईक हे हिमनगाचे एक टोक आहे, अशा अनेक संस्था केरळ मध्ये कार्यरत आहेत ज्यांना विदेशातून पैसे पुरविले जात आहेत आणि तो पैसा आपल्या देशातल्या मुस्लिम तरुणांची माथी भडकविण्यासाठी वापरला जातोय. पिन्नाराई विजयन ह्यांच्या सरकारला ह्या सगळ्याची माहिती आहे, आणि आतून उघड समर्थन सुद्धा. पिन्नाराई हे कट्टर कम्युनिस्ट आहेत, ते स्वतः २८ एप्रिल १९६९ ला झालेल्या रामकृष्णन ह्या एका संघ शाखेच्या मुख्यशिक्षकाच्या खुनाच्या संदर्भातले पहिले संशयित होते. हा खुन केरळ मधला संघ कार्यकर्त्याचा पहिला खुन समजला जातो, आणि त्यावेळी पिन्नाराई ह्यांचं वय होतं १९-२० वर्ष…! पुराव्या अभावी विजयन सुटले हा भाग अलाहिदा.

तसं पाहिलं तर CPM आणि IMUL (मुस्लिम लीग) ह्यांचं हाडवैर बरं का! पण संघ कार्यकर्त्यांच्या बाबतीत मात्र ह्या दोघांचंही एकमत आहे, ते म्हणजे त्यांना संपविणे…! मागच्या वर्षी एका आयेशा नावाच्या युवतीचा विडिओ युट्युबवर बराच ट्रेंडमध्ये होता तिचं मुळ नाव होतं सोनिया सेबस्तियन, बेंगळुरूच्या christ कॉलेज ची विद्यार्थिनी. तिने काय म्हणावं त्या व्हिडियो मध्ये –

This whole life is a test… I had to break my mother’s heart, my father’s heart… But what matters most is Allah.

त्यानंतर एक सिरीज आली व्हिडिओची त्यात अनेक हिंदू आणि ख्रिश्चन युवतींचा तत्सम हाच सूर असलेला ‘संदेश’ होता. हा प्रकार वाटतो तितका सोपा आणि सरळ नाहीय. अनेक उच्च शिक्षित मुस्लिम तरुणांचं सुद्धा ब्रेन वॉशिंग होतंय. मुलं हातची गेली की माय बापांना समजतंय, आणि हे ज्यांनी थांबवायला हवं त्या सरकारी यंत्रणा CPM सत्तेत आल्यापासुन डोळे मिटून बसल्या आहेत. नुकताच एक अहवाल येऊन गेला त्यात म्हटलं होतं की कोचीन हे भारतातल सगळ्यात असुरक्षित शहर बनलंय, दिल्ली पेक्षा ही काकणभर अधिक…!

communist violence in india marathipizza

ह्या सगळ्या प्रकारच्या मागे माझ्या वैयक्तिक रिसर्च संदर्भात म्हणुन असेल किंवा आवड, इच्छा म्हणून देखील असेल मी केरळ च्या ह्या मुस्लिम बहुल भागात फिरलोय, बऱ्याच स्थानिक रहिवाश्यांशी ह्या सगळ्या संदर्भात बोललोय. कासरगोडच्या नक्षल प्रभावित दुर्गम भागात देखील गेलोय, आणि कोळीकोड शहराच्या मध्यभागी असलेल्या युनिव्हर्सिटी आणि कॉलेज मध्ये सुद्धा वावरलोय. स्वानुभवावरून सांगतो की परिस्थिती खरंच गंभीर आहे.

(वाचा : फाळणीच्या निर्वासितांची कत्तल – डाव्या सरकारच्या क्रौर्याचा इतिहास )

भारतातच काय अगदी केरळ मध्ये इतरत्र ह्या सगळ्या बातम्या पोहचत नाहीत, किंबहुना पोहचू दिल्या जात नाहीत. त्यामुळे सामान्य लोकांना त्याची माहिती मिळत नाही, अनेक गोष्टी दाबल्या जातात, काही लोकांचे आवाज बंद केल्या जातात. पण खरंच भारतात राहून सौदीच्या शरिया कायद्याचा अनुभव घ्यायचा असेल तर मलापूरम ला भेट देऊन पहा…! मी सौदीत देखील राहिलोय बरेच महिने. त्यामुळे ह्या सगळ्यांची उठबस नेमकी कशी होते ह्यावर नंतर कधीतरी लिहीन. तूर्तास एकच विनंती की केरळ, बंगाल, पूर्वोत्तर, खलिस्तान ह्या सगळ्या प्रश्नांकडे आपण उघड्या डोळ्यांनी पाहून शिकुयात.

कारण मुंबईत महापौर कुणाचाही बनेल हो, पण देशाच्या स्थैर्याशी काय खेळ सुरूय ह्याकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे नाही का?

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

3 thoughts on “कम्युनिस्ट-ISIS संबंध आणि त्यांचे हिंसक व देशविघातक कृत्य

 • January 21, 2018 at 6:47 pm
  Permalink

  After all what we learned is that muslims wherever goes to any territory , their sole motive is to distroy civilisation and mankind.

  Reply
 • March 31, 2019 at 12:02 pm
  Permalink

  उत्तम लेख

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?