नकळतपणे “असे” घडवतो आपण भावी बलात्कारी!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

एक आठ वर्षाच्या मुलीला बघून उत्तेजित होणाऱ्या, तिचा बलात्कार करून खून करणाऱयांना काय म्हणावं? नराधम? अमानुष? काहीही म्हंटल तरी ती राहणार शेवटी हाडा मासांची, हात पाय असलेली पण हृदय नसलेली आणि बुद्धी फिरलेली माणसच! तर ही माणसं अशी का वागतात? (यात त्या नराधमांबद्दल सहानुभूती वगैरे नसून अशा माणसांना ओळखून घ्यायचे आणि जमत असेल तर थांबवायचे, एवढंच, पुन्हा एक निर्भया किंवा आसिफा होऊ नये याची खबरदारी घ्यायची इतकंच )

डॉक्टर एन. जी. बेरेल (फॉरेन्सिक सायकॉलॉजिस्टस) यांच्या मते बहुतांशी सामूहिक बलात्कार करणारी टोळी ही तरुण मुलांचीच असते, आणि त्यांची मानसिकता ही एका बलात्काऱ्यापेक्षा वेगळी असते, कारण जेंव्हा व्यक्ती ‘ग्रुप’ मध्य असतो, तेंव्हा त्याला बऱ्याचश्या गोष्टी ‘ग्रुप’साठी करणं भाग पडत, आणि अपकृत्यास नकार दिला समजा तर त्याच्या पौरुषत्वावर बोटं ठेवलं जात, बऱ्याचदा या मित्रांचा प्रभाव इतका असतो की त्याला अपकृत्यापेक्षा ग्रुप सोडणं कठीण वाटत आणि तो यात सहभागी होतो.

थोडक्यात काय तर एक सडका आंबा आळी नासवतो, बऱ्याचदा ही पोर, दारू, अफू, गांजा यांच्या नशेत असतात, आणि स्वतःला ‘अल्फा मेल’ (सर्वात शक्तिमान आणि ताकतवान) सिद्ध करण्यासाठी कोणत्याही थराला उतरतात.

 

rapes-inmarathi
financialexpress.com

अशा घटनांमध्ये नंतर आपल्या कृत्याची जाणीव होऊन पश्चाताप करणारे, स्वतःच्या कृत्याची लाज वाटून आत्महत्या करणारे पण असतात. पण खरा प्रश्न आहे की ही अशी कृत्ये करण्यामध्ये मुलंच का अग्रेसर असतात? एखादा मुलगा चांगला वाटला म्हणून मुलींच्या टोळक्याने त्याला पकडून त्यावर अत्याचार केलेत, या घटनांचं प्रमाण का कमी असत? याला जैवशास्त्रीय कारण पण आहेत ( काही शास्त्रज्ञाच्या मते टेस्टोस्टेरॉन या हॉर्मोनचा स्पर्धा आणि गुन्हा याच्याशी थेट संबध आहे, काहींच्या मते प्री फ्रंटल कॉर्टेक्स,अमिगडला मुळे पुरुष जास्त आक्रमक असतात तर काही जीन्सना या साठी दोषी ठरवतात ) पण बऱ्याच ‘behavioral psychologists’ च्या मते याचा बराच दोष मुलांना ज्या प्रकारे वाढवण्यात येत त्यावर आहे. उदाहरणार्थ,

१. तुमच्या मुलांसाठी तुम्हाला खेळणी घ्यायची आहेत आणि तुमच्याकडे बंदूक, बाहुली, भातुकली,तलवार आणि बॅट असे पर्याय आहेत, तुम्ही काय निवडाल? मुलगी असेल तर बाहुली आणि भातुकली आणि मुलगा असेल तर बंदूक, बरोबर ना? का तुमच्या एक वर्षाच्या मुलाला बाहुली दिलीत तर तो काय नाही म्हणार आहे? पण आपणच त्याला वयाच्या एक वर्षापासून हिंसेचे धडे देतोय (तुम्ही फक्त खेळण्यावरच थांबता, पण बऱ्याच घरात मग या खेळण्याच्या बंदुकीच खऱ्या पिस्तुलात रूपांतर होत), मग असं बाळकडू मिळाल्यानंतर त्याला सुद्धा फक्त ढिशुम ढिशुम आणि मारामारीचे कार्टून आवडू लागतात, मग सिनेमात पण खून, चिरफाड आणि हिंसा, मग एकेदिवशी एखादा मनोरुग्ण एका पाच वर्षांच्या मुलीच्या गुप्तांगात बाटली घुसवतो. आता सगळी बंदूकीशी खेळणारी मुलं बलात्कारी होत नाहीत हे खरं पण इथं मुद्दा ‘मुलगा’ आहे म्हणून हिंसाचाराला समाजमान्यता देण्याचा आहे. (पूर्वी पण हिसाचार होता म्हणत असाल तर आपण बरीच वर्षे स्वतःला पुढारलेला समाज वगैरे जी विशेषण लावतोय हे विसरू नये)

 

sex-abuse-inmarathi
zeenews.india.com

२. आज तुम्ही तुमच्या बायकोवर विनोद करताय, उद्या आईवर खेकसताय, नंतर गम्मत म्हणून आई बहिणीच्या शिव्या देताय, कधीतरी रागाच्या भरात बायकोवर हात पण उचलताय, हे सगळं तुमचा मुलगा पाहतोय आणि स्त्री म्हणजे एक निर्बुद्ध , खालच्या दर्जाची उपभोगाची वस्तू, हे टीव्ही, सिनेमे , गाणी, जाहिराती आणि त्याचे स्वतःचे वडीलच शिकवतायत.

३. घरी जेंव्हा बलात्कार, छेडछाड या घटनांबद्दल बोललं जात तेंव्हा आजी आजोबा ‘ या मुली कशा वाह्यात, कपडे कसे वाह्यात, म्हणूनच असं होत ‘ म्हणतात तेंव्हा त्याला कळतंय की उद्या जर आपण असं काही केलं तरी दोष मुलीवरच जाणार आहे, आपण पँटची चेन वर केली की मोकळे, कारण सगळेच म्हणतात ‘पुरुष आहे चाळवणारच’ वरील ही फक्त काही उदाहरण आहेत. जी मुळात स्त्रियांपेक्षा जास्त aggressive असणाऱ्या पुरुशांना तसंच राहण्यासाठी कंडिशन करतात पण यात लहानपणी अत्याचार सहन केलेली, सुरक्षित वातावरणात न वाढलेली मुलं अशा कुकर्माणकडे वळताना दिसतात आणि बऱ्याच वेळा sexually frustrated, स्वतःच्या sexuality बद्दल गोंधळलेली मुलं पण ही कृत्य करतात.

आता यात लहान मुलांबद्दल वासना ठेवणारे पीडोफाईल वेगळे (सगळे पीडोफाईल क्रिमिनल्स नसतात) पण हा विषय पुन्हा कधीतरी
इथे मुद्दा हा आहे की अशा काही घटना झाल्या की सरकारला, समाजाला देशाला दोष देऊन या लोकांना फाशी द्या म्हणून प्रश्न सुटणार नाहीये कारण फाशी माणसांना होते, वृत्तीला नाही आणि ही वृत्ती जर बदलायची असेल तर पुढव्ह्या बलात्काराची वाट न बघता आपण समाज म्हणून बदलणे गरजेचं आहे.

तळटीप: जी चिमुकली या नराधमांच्या वासनेला बळी पडली तिच्या आत्म्याला शांती तेंव्हाच मिळेल जेंव्हा आपण आपल्या पाखरांना सांभाळून येणाऱ्या चिमण्यांचा जीव वाचवू, त्यासाठी हा प्रयत्न.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?