बहुतेक मराठी नव-उद्योजक फक्त ह्या एका कारणामुळे अपयशी होतो…

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

काल एका मित्राशी बोलणं झालं. आम्ही दोघांनी साधारण एकाच काळात जॉब सोडून स्टार्ट अप सुरू केलेले. पार थकून गेल्यासारखा वाटत होता.

स्टार्ट अप इको सिस्टीम मध्ये एक अलिखित नियम आहे – हसरा चेहरा बाळगत फिरण्याचं…!

 

startup-india-marathipizza

स्रोत

माझं स्टार्ट अप आहे, आम्ही एकदम रॉकिंग फेजमध्ये आहोत, आमचे आकडे धमाकेदार घोडदौड करत आहेत…

हे सतत भासवत राहवं लागतं. अर्थात, हे बहुतेक वेळा खरंच असतं. पण ते साध्य होत असताना येत असलेला तणाव दिसू देता येत नाही. हसरा चेहरा सतत मेंटेन ठेवणं गम्मत नसते. बिझनेस गोल्स साध्य करत असताना २४ तास मेंदू सतत तणावाखाली असतो, पण तो तणाव दिसू द्यायचा नसतो.

उद्योगात नव्याने मुसंडी मारणाऱ्याने ती तयारी केलेली असतेच – त्रास तेव्हा अनावर होतो जेव्हा बिझनेस प्रेशर शिवाय इतर कटकटी सुरू होतात. नोकरी सोडून बिझनेस करायचा निर्णय घेताना हा मित्र घरी व्यवस्थित बोलला होता. पुढे दोन अडीच वर्ष कठीण असतील, मुव्हीज-शॉपिंग-हॉटेलिंग-ट्रॅव्हलिंग- ही मध्यमवर्गीय हौस बाजूला ठेवावी लागेल, घरात इन्व्हॉल्व्हमेंट कमी असेल. ही सर्व कल्पना त्याने दिली होती. (मला हे माहितीये कारण आम्ही दोघांनी ही पावलं एकमेकांशी चर्चा करत करतच उचलली होती.)

तेव्हा होकार देणारी फॅमिली आज मात्र सैरभैर झाल्यासारखी वागतीये.

 

startup failed-marathipizza

स्रोत

बायकोने तेव्हा दाखवलेला सपोर्ट १२ महिन्यात उडून गेलाय. घरात सारखी किरकिर होतीये आणि हा रोज बिझनेस टार्गेट अचिव्ह करण्याच्या टेन्शनमध्ये!

त्याच्या प्रोडक्टला प्रतिसाद उत्तम आहे पण अपेक्षित होता तेवढा पैसा उभा रहात नाहीये. त्यामुळे बिझनेस प्लॅनिंग, फ्युचर अप्रोच सर्व काही बदलावं लागणार आहे. तो ती लढाई लढायला तयार आहे – मला पक्कं माहितीये – पण ही घरातली लढाई कशी लढेल?! एकाच वेळी २ फ्रंटवर कसं लढणार?! ज्या सैन्याच्या जोरावर लढायचं होतं, ते सैन्यच कुरबुरी करत असेल तर साम्राज्य कसं उभं रहाणार?

 

business-stress-marathipizza

स्रोत

हा माझा मित्र एकदम रॉकस्टार आहे. ह्या अडचणीतून तो पुढे जाईल ह्यात शंकाच नाही. पण अश्या अडचणी अनेकांना येत असणार…त्यात कितीतरी जण अडकून जात असणार ही कल्पना त्रासदायक आहे!

मराठी धंदे बंद पडतात…ते उगीच नाही…!

टीप:

१) वरील उदाहरणात “बायको” हा फॅक्टर आहे. परंतु नेहेमी पत्नीचीच चूक असते असं नाही. एकूण कुटुंबाच्या सपोर्टची गरज असते – हा मूळ मुद्दा आहे.

२) दुसरा मुद्दा असा की – नोकरी सोडून व्यवसाय सुरू करणे हा खूप मोठा निर्णय असतो. तो सर्वांनी मिळून घ्यायचा असतो. जर भक्कम समर्थन देण्याची मानसिक तयारी नसेल, तर असा निर्णय घेण्याआधीच कुटुंबाने स्पष्ट सांगायला हवं. निर्णय घेतल्यावर मग मानसिक ताण देऊ नये… त्याने अपयशाची शक्यता वाढते.

३) कौटुंबिक समर्थन, घरातील वातावरण हे व्यवसायातील यश-अपयशामागच्या अनेक कारणांपैकी एक आहे. “केवळ” ह्या मुळेच अपयश येतं, असा अर्थ अजिबात नाही!

४) एकतर स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा कमी, इच्छा असेल तर कुटुंबाचं समर्थन नाही आणि समर्थन असेल तर केवळ होकार देण्यापुरतं – पाठीशी उभं रहाणं नाही — असं सर्वसाधारण चित्र मराठी कुटुंबांत दिसतं — ह्या निरीक्षणावरून “मराठी धंदे बंद पडतात…ते उगीच नाही…!” हा निष्कर्ष आहे.

जर ही परिस्थिती आता बदलत असेल… तर सोन्याहून पिवळं! जर बदलत नसेल… तर आपण बदलायला हवी हे मात्र नक्की.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 211 posts and counting.See all posts by omkar

2 thoughts on “बहुतेक मराठी नव-उद्योजक फक्त ह्या एका कारणामुळे अपयशी होतो…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?