कितीही प्रेमळ “वाटला” तरी हे १० “गुण” असलेला पुरूष कधीच योग्य जोडीदार होऊ शकत नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपला जोडीदार कसा असावा ह्याच्या सगळ्यांच्या मनस्वी कल्पना असतात. कोणी पैसा बघतो तर कोणी रूप. त्याहून पुढे जाऊन काही जणांना स्वभाव आणि कौटुंबिक पार्श्वभूमी महत्वाची वाटते. बैठका, बोलाचाली अंती जोडीदार निवडला जातो आणि कुटुंबाने त्यांना हिरवा सिग्नल दाखवला की लग्नकार्य ठरते.

तरीही आपण काही विवाह मोडताना पाहतो. काही क्षुल्लक कारणांनी एकमेकांत ही दरी बनते. नाते तुटते.

काही गोष्टी आधीच कळल्या असत्या तर किती बरे झाले असते असे वाटते. पण काही वेळेला पत्रिका जुळल्या, माणसे आवडली की काही बाबींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि नेमक्या त्याच पुढे अडचणी उभ्या करतात.

 

Kundali-Matching-inmarathi
starstell.com

आपण जर कोणाच्या प्रेमात असू तर त्या व्यक्तीचे दुर्गुण आपण कायमच दुर्लक्षित करतो. अशा वेळी तर खास काळजी घ्यायला हवी.

त्यामुळे तुम्ही जर लवकरच वधू बनायची स्वप्न पहात असाल तर वर निवडताना मदत होईल असे काही मुद्दे आम्ही तुमच्या साठी आणले आहेत. ह्या पैकी कोणत्याही प्रकारे समोरील व्यक्ती वर्तणूक करत असेल तर त्यावर तुम्ही डोळे झाकून त्या व्यक्तीच्या नावावर काट मारायला मोकळे.

१. जर तो तुम्हाला बरोबरीचे मानत नसेल

 

dominating-bf-inmarathi
newwomanindia.com

मी होणारा नवरा आहे. मीच ह्या गोष्टी करेन तू राहुदेत. अशा पद्धतीने वागणारा मुलगा असेल तर सावधान. लग्न ही अशी संस्था आहे जिथे स्त्री पुरुष भेद नसावा. पुरुषा इतकेच स्त्रीचे स्थानही महत्वाचे असावे.

परंतु तुमचा होणारा जोडीदार जर तुम्हाला लग्नाच्या आधी पासून बरोबरीने वागवत नसेल तर लग्नानंतरही त्याचा नेम नसणार.

नंतर बायको म्हणजे आपल्यापेक्षा कमी पातळीची समजून तशी वागणूक मिळू शकते. लग्न मोडायच्या अनेक कारणातील हे महत्त्वाचे कारण आहे.

२. तुमच्याशी निगडित व्यक्तींचा अनादर करत असणारा

लग्न म्हणजे २ कुटुंबांचे मिलन. त्यामुळे एकमेकांकडील नातेवाईक, मित्र मंडळी ह्यांचा आदर करणे हे ओघाने आलेच.

 

2-states_inmarathi

पण तो जर फक्त त्याच्या माणसांच्या आदराबद्दल आग्रही असेल पण बदल्यात तुमचे नातेवाईक किंवा मित्रमंडळींना कमी लेखत असेल तर हा भविष्यात नक्कीच चांगला जोडीदार होणार नाही.

कदाचित तुमच्या माणसांचा अपमानही करू शकेल. अशा मुळापासून लांबच असलेले बरे.

३. विश्वासार्हता कमी वाटत असल्यास

 

holding-hands-inmarathi
shutterstock.com

सांसारिक आयुष्यात खाचखळगे असतातच. जेव्हा कधी तुमच्यावर अडचणीचे काळे मळभ दाटतील तेव्हा तुमचा जोडीदार खंबीर हवा. तुमच्या बाजूने उभा राहणारा हवा.

पण अशी विश्वासार्हताच तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल वाटत नसेल तर त्याला आयुष्याचा जोडीदार म्हणूच शकत नाही.

४. तुमचे कसलेच कौतुक नसलेला

 

dil-dhadkane-do-inmarathi

 

काही जण खूप खुल्या दिलाने समोरच्याचे कौतुक करतात. कौतुक होत असेल तर कोणतीही व्यक्ती ठरवलेल्या कामापेक्षा काही गोष्टी जास्ती करून जाते. लग्न संबंधातही हे लागू होतेच.

लग्नाआधी तुम्ही केलेल्या छोट्या छोट्या प्रेमाने केलेल्या गोष्टी जर तुमच्या जोडीदाराकडून दुर्लक्षित होत असेल तर ही धोक्याची घंटा आहे.

एखाद्याला फक्त स्वतःच्या व्यतिरिक्त जगात काहीच दिसत नसेल तर अशा माणसासाठी तुम्ही डोंगर जरी हलवलेत तरीही तुमचे कौतुक कधी होणार नाही अशी खूणगाठ मनाशी बांधा.

५. मोठमोठ्या निर्णयांबाबतीत तुम्हाला अंधारात ठेवत असल्यास

 

Arguing-couple-inmarathi
sessualitafelice.it

लग्न दोघांचे असे आपण म्हणतो. त्यामुळे सांसारिक आयुष्याचे छोटे मोठे निर्णय हे दोघांनी मिळून घ्यायचे असतात.

लग्नाआधीपासूनच जर तुम्हाला असे जाणवू लागले की काही निर्णयांमध्ये तुम्हाला ग्राह्य धरले जात नाहीये, काही गोष्टी परस्पर केल्या जात आहेत तर लग्नानंतर तुम्हाला हीच वागणूक मिळेल हे नक्की.

तुमच्याही आयुष्यातले निर्णय तुमच्या जोडीदाराकडून घेतले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल काय वाटते आणि तुम्ही काय केले पाहिजे ह्या बद्दल तुम्हाला न विचारताच तो निर्णय घेईल आणि तुम्ही अंधारात राहाल. म्हणून असा जोडीदार नकोच.

६. गुप्तता पाळणारा

मोबाईलला पासवर्ड असणे, पगार, पैशाची लपवाछपव, मित्र मैत्रिणींपासून अलिप्त ठेवणे अशा पद्धतीने तुम्हाला स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातून लांब ठेवणारा माणूस हा नंतरही तुम्हाला कशाचा थांग पत्ता लागून देणार नाही.

 

cheater-inmarathi
huffingtonpost.ca

बायको ही अर्धांगिनी असते आणि तिच्या पासून काहीही लपवणे हे लग्नाच्या पवित्र बांधनाच्या आड येणारे असते. एकमेकांना स्पेस देणे म्हणजे एकमेकांपासून बऱ्याच गोष्टी लपवणे असे वागणेच चुकीचे आहे. असा गुप्तता पाळणारा पुरुष न वरलेला बरा.

७. तुमच्या करियरला कायम दुय्यम मानणारा

स्त्रियांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या स्वावलंबी होण्यापर्यंत सगळे खूप झगडून मिळवले गेले आहे. आई वडील मुलीला शिकवून तिच्या पायावर उभी राहण्यास तिला मदत करतात.

पण लग्नानंतर सुनेने काम केलेले आवडणार नाही असा पवित्रा घेणारे मात्र कशाचाच विचार करत नाहीत.

Balance-Work-Home-inmarathi01
all4women.co.za

तुमचा प्रियकर जर लग्नाआधीच तुम्हाला करियर करण्याबाबत अटी घालत असेल तर सावध राहा. तुम्ही त्याच्या पेक्षा मोठ्या पदावर जाऊ शकत असाल तर नोकरीच करू न देणे इथे पर्यंत मजल जाऊ शकते. त्यामुळे अशा मुलाशी लग्न करण्याचा इच्छेचा विचारच करा.

८. भांडणे वाढवणारा किंवा तुमच्याच कडून कायम माफीची अपेक्षा ठेवणारा

काधी भांडण झाले तर ते काही क्षणात मिटवले तरच नाते संबंध दृढ होऊ शकतात. चूक कोणाची ह्या पेक्षा ह्यापुढे कसे वाद वाढू नयेत ह्याची काळजी घेणारा जोडीदार उत्तम.

 

sorry-inmarathi
expertnoamor.com.br

पण स्वतःच्या चुका नजरेआड करून बायको म्हणून तिनेच नवऱ्याची माफी मागितली पाहीजे असा पवित्रा घेणार मुलगा चांगला नवरा बनू शकेल का ह्याचा विचारच करा.

९. नात्यामध्ये कोणतीच जबाबदारी न उचलणारा

पैसे कमावणे हेच ध्येय असणे आणि बाकी घराबद्दल, घरातल्या माणसांबद्दल काहीच आस्था न बाळगणे हे लग्न मोडण्यासाठी पुरेसे आहे.
लग्न झाल्यानंतर दोघांनी मिळून आपले घर सावरायचे असते.

 

husband housework-inmarathi03
omaha.com

जबाबदाऱ्या जाणून पूर्ण करायच्या असतात. काही कामे वाटून घ्यायची असतात. पण काही जणांना जबाबदाऱ्या उचलण्याची सवय नसते किंवा इच्छाही नसते त्यामुळे जबाबदाऱ्या टाळणाऱ्याशी नाते न जोडणे उत्तम.

१०. तुम्हाला कोणतीच मोकळीक आणि महत्व न देणारा

तू हे करू नकोस, लग्नानंतर चालणार नाही किंवा काही गोष्टी आमच्याकडे करण्याची मुभा मिळणार नाही अशा पद्धतीच्या आज्ञा मिळायला लागल्यास अशा घरात लग्न न करणे हा चांगला निर्णय ठरू शकतो.

 

scoldingbf-inmarathi
huffingtonpost.ca

लग्नानंतर तुम्हाला विचारांची, क्रियांची वागण्याची अशी कोणतीच मोकळीक मिळणार नसेल तर त्या घरात तुम्हाला किती महत्व असेल?

किती किंमत राहील? तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणार नसेल तर अश्या मुलाशी लग्नास कधीही उभे राहू नये.

अशा वागणुकीकडे बारकाईने पहा. तुम्हाला असा मुलगा नवरा म्हणून खरच चालेल का ह्याचा विचार दहा वेळा करा. लग्न झाल्यावर संसार मोडून एकाकी पडण्यापेक्षा आधीच खबरदारी घेतलेली बरी..!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “कितीही प्रेमळ “वाटला” तरी हे १० “गुण” असलेला पुरूष कधीच योग्य जोडीदार होऊ शकत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?