' जगातील सर्वात महागड्या १० वेबसाइट्स तुम्हाला माहित आहेत का? – InMarathi

जगातील सर्वात महागड्या १० वेबसाइट्स तुम्हाला माहित आहेत का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या कोणत्याही गोष्टीचे सोल्युशन इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. बस एक क्लिक केले, की अनेक वेबसाईट्सच्या युआरएल ओपन होतात. त्यातील महत्त्वाच्या आपल्याला शोधता येतात. त्यावर आवश्यक माहिती प्राप्त होते. त्याने आपली समस्या अगदी क्षणात दूर होते.

तुम्हाला माहीत आहे का हे  इंटेनेट चे जाळे नक्की किती पसरले आहे, या सगळ्याचा खटाटोप नेमकं कशासाठी केला जातो? या जितक्या साइट्स आहेत त्यांना हे सगळं कसं परवडत? याबद्दल आज सविस्तरपणे जाणून घेऊया!

कोणतीही वेबसाईट म्हटली, की डोमेन नेम सर्वात महत्त्वाचे असते. कोणत्याही वेबसाईटसाठी डोमेन नेम एक ओळख असते. एक चांगले आणि आकर्षक डोमेन नेम युजरला वेबसाईटवर आणत असते.

डोमेन नेम सिस्टिममध्ये (डीएनएस) नोंदवण्यात आलेल्या नावाला डोमेन नेम म्हटले जाते. उदा. इन मराठीचे डोमेन नेम  inmarathi.com आहे.

 

domain name inmarathi
YouTube

 

डोमेन नेम त्या वेबसाईटची अप्रत्यक्ष ओळखच असते. सर्च इंजिनवर वेबसाईट सर्च करताना डोमेन नेम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे हवे ते डोमेन मिळण्यासाठी सर्वांचीच प्रचंड धडपड सुरु असते.

यामुळे अब्जावधी रुपयांपर्यंत किंमत गेली असे जगात काही मोजके डोमेन नेम आहेत.

आज आम्ही सांगणार आहोत अशा डोमेन नेमबद्दल ज्यांच्यावर काही मिनिटांत अब्जावधी रुपयांची बोली लावली गेली.

 

360.COM

360.com inmarathi
value walk

 

सर्वाधिक किमतीच्या बाबतीत हे डोमेन नेम पहिल्या क्रमांकावर आहे. यासाठी २०१५ साली बोली लावण्यात आली होती. हे डोमेन तब्बल १०६ कोटी २५ लाख रुपयांना एका चायनीज कंपनीने विकत घेतले.

 

सेक्स डॉट कॉम

 

sex.com 2 inmarathi
top news

 

सध्याच्या सोशल मीडिया तसेच ऑनलाइन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म वर हा असला प्रकार तर सहज बघायला मिळतो, आणि मुळात ही गोष्ट फार आवडीने पाहणारा एक मोठा वर्ग आहे, ज्यात बहुतेक सगळेच गणले जातात!

किमतीच्या बाबतीत हे जगातील दुसरे महागडे डोमेन आहे. २०१० मध्ये या डोमेनसाठी सर्वात मोठी बोली लावण्यात आली. ह्या डोमेनची किंमत सुमारे ७९ कोटी ८३ लाख रुपये इतके होती.

 

हॉटेल्स डॉट कॉम

 

hotels.com inmarathi
amazon.com

 

आज ओयो रूम्स मेक माय ट्रीप आपण सर्रास वापरतो, पण या सगळ्याची सुरुवात या डोमेन नेम पासून सुरू झाली आणि आज बघा या डोमेन ने काय मजल गाठली आहे!

हे तिसऱ्या क्रमांकाचे महागडे डोमेन आहे. ह्या डोमेनसाठी २०११ साली सुमारे ६८ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती.

 

फंड डॉट कॉम

domain-name-marathipizza05
gazettereview.com

 

सर्वाधिक किमतीच्या बाबतीत हे डोमेन चौथ्या स्थानावर आहे. २००८ साली ह्या डोमेनसाठी तब्बल ६१ कोटी रुपयांची किंमत मोजली गेली होती.

 

पॉर्न डॉट कॉम

 

porn.com inmarathi
porn dude

 

पॉर्न साइट्स वर भारतात लागलेला बॅन तर तुम्हाला आठवत असेलच, या सगळ्या साइट्स वर इतका कंटेंट असतो की जगातली बरीचशी मंडळी पॉर्न साइट्स न एकदातरी भेट देतातच, आणि या अशा करोडो हिट्स मधूनच या साइट्स बक्कळ पैसा कमावतात!

सर्वाधिक किमतीच्या बाबतीत हे डोमेन पाचव्या क्रमांकावर आहे. २००७ साली ह्या डोमेनसाठी सुमारे ५६ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती.

 

पोर्नो डॉट कॉम

 

domain-name-marathipizza07
सर्वाधिक किमतीच्या बाबतीत हे डोमेन सहाव्या क्रमांकावर आहे. २०१५ साली तब्बल ५५ कोटी रुपयांना हे डोमेन विकले गेले.

 

एफबी डॉट कॉम

 

fb.com inmarathi
information.in

 

आज फेसबुक हे कोणाला नाही माहीत, अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात फेसबुक पोहोचलं आहे! श्रीमंत माणसापासून अगदी रस्त्यावरच्या भाजी विकणाऱ्या व्यक्तिपासून फेसबुकवर आहे! फेसबुकच्या माध्यमातून लोकं एकमेकांशी जोडली जाऊ लागली, आणि कम्युनिकेशन गॅप प्रचंड प्रमाणात भरून गेला!

आज फेसबुक ने काहीच्या काही प्रगती केली आहे, आणि आजही कित्येक लोकं अजूनही यावर अकाऊंट ओपन करून या साईटला भेट देतच आहे आणि दिवसेंदिवस यामध्ये वाढच होताना दिसेल!

सर्वाधिक किमतीच्या बाबतीत हे डोमेन सातव्या क्रमांकावर आहे. २०१० साली हे डोमेन सुमारे ५२ कोटी रुपयांना विकले गेले.

 

डायमंड डॉट कॉम

 

diamond inmarathi
newsoholic

 

सर्वाधिक किमतीच्या बाबतीत हे डोमेन आठव्या क्रमांकावर आहे. २००६ साली ह्या डोमेनसाठी सुमारे ४६ कोटी रुपयांची बोली लावली गेली होती.

 

बीयर डॉट कॉम

 

domain-name-marathipizza10
2.bp.blogspot.com

 

सर्वाधिक किमतीच्या बाबतीत हे डोमेन नवव्या क्रमांकावर आहे. १९९९ साली सुमारे ४३ कोटी रुपयांना हे डोमेन विकले गेले होते.

 

जेड डॉट कॉम

 

ged inmarathi
ged.com

 

सर्वाधिक किमतीच्या बाबतीत हे डोमेन दहाव्या क्रमांकावर आहे. २०१४ साली सुमारे ४२  कोटी रुपये इतकी ह्या डोमेनसाठी बोली लावण्यात आली होती.

कधी वाटलं होतं का वेबसाईट्सना पण एवढी किंमत असेल असं….!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?