काँग्रेस जगात दुसऱ्या क्रमांकाची भ्रष्ट पार्टी : बातमी चुकीची

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

“बीबीसी हब” या वेब वृत्तवाहिनीच्या ५ जुलै २०१८ रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार इनमराठीने एक लेख प्रसिध्द केला. या वेब पोर्टलच्या लेखात जातील सर्वात जास्त भ्रष्टाचारी असलेल्या दहा पक्षांची यादी देण्यात आली होती. जगभरातील अनेक देशात काम करणाऱ्या राजकीय पक्षांच्या या यादीत भारतातील कोन्ग्रेस पक्षाचे नाव दुसऱ्या स्थानावर घेण्यात आले होते.

हा लेख आपल्या पोर्टलवर प्रकाशित झाल्यानंतर ही बातमी आणि यादी खोटी असून त्यात कोणत्याही सर्व्हे किंवा पुरावे देण्यात आलेले नाहीत, हे आमच्या सुजाण वाचकांनी लक्षात आणून दिले.

“बीबीसी हब” ही पूर्ण वेबसाईटच फेक असल्याचे त्यावरून ध्यानात येते.

ही बातमी प्रसारित झाली तेव्हाच “इन्फोसिस”चे माजी डायरेक्टर मोहनदास पै आणि इतर अनेक महत्वाच्या व्यक्तींनी ही बातमी आपल्या सोशल मिडिया अकाउंटवरून शेअर केली होती. बीबीसी या जगप्रसिध्द वृत्तावाहीनिचे नाव जसेच्या तसे घेतल्याने त्याच्या विश्वासार्हतेबद्दल फारशी शंका न घेता त्यांनी ती बातमी शेअर केली.

इनमराठी फेसबुक पेजवर काही वाचकांनी कमेंट व मेसेज करून ही वेबसाईट फेक असल्याचे निदर्शनास आणून दिले. टीमने या बातमीची आणि वेबपोर्टलच्या सत्यतेची पडताळणी केल्यानंतर ही लिस्ट फेक असल्याची खात्री झाली.


त्यामुळे हा लेख इनमराठी पोर्टलद्वारे अधिकृतपणे मागे घेत आहे. त्याचबरोबर आधारासाठी वापरलेल्या माहितीची सत्यता न पडताळल्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करत आहे.

इनमराठी ने ह्या आधी कधीही खोट्या बातम्या, माहितीचा प्रसार केलेला नाही. ह्यापुढे अनावधानाने देखील असा प्रकार घडणार नाही ह्याची खबरदारी इनमराठी टीम तर्फे घेतली जाईल ह्याची हमी देखील देतो.

इनमराठी पोर्टलवर अनेक राजकीय पक्षांची बाजू घेण्याचे आरोप वेळोवेळी होत आले आहेत. असे आरोप होणे नवीन नाही. पण इनमराठीचे धोरण सुरुवातीपासून फेक न्यूजच्या विरोधात राहिले आहे. या धोरणाला अनुसरूनच इनमराठी सदर लेख मागे घेत आहे. या लेखातली चूक ज्या चौकस वाचकांनी हक्काने लक्षात आणून दिली त्याचप्रमाणे इथून पुढेही अनवधानाने अशा चुका झाल्यास वाचक त्या लक्षात आणून देतील ही अपेक्षा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *