सुंदर दिसायचंय? या अत्यंत सहज करता येण्यासारख्या ब्युटी टिप्स ट्राय कराच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

सुंदर आणि नितळ त्वचा असणे हे सगळ्यांचेच स्वप्न असते. स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असेच वाटते. चेहरा फार सुंदर नसेल तर त्वचा तरी सुंदर ठेवण्याकडे सगळ्यांचा कल असतो.

कोणी ब्युटी पार्लरला जाऊन चेहरा उजळवून घेतो तर, कोणी सर्जरी करून त्वचेवर तजेला आणतो. हे सगळे करण्यासाठी भरपूर खर्चही येतो.

आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही सोप्या क्लृप्त्या ज्या तुम्हाला सतेज, नितळ त्वचा राखण्यास नक्कीच मदत करतील. ह्या क्लृप्त्या घरगुती तर आहेतच आणि खिशाला परवडतील अशाच आहेत. बघुयात आपण काय काय करू शकतो.

१. सकस आहार

सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे आपण घेतो तो आहार सकस असला पाहिजे. बाहेर बनवलेले, तेलकट आणि तिखट पदार्थ जर रोजच खात असू तर त्याने चेहऱ्यावर फोड येणे, त्वचा तेलकट होणे असे परिणाम दिसून येतात.

त्यापेक्षा फळे, प्रोटिनयुक्त आहार, भाज्या, मासे ह्यांचे सेवन करावे. हे पदार्थ आपल्या त्वचेला सतेज बनवतात.

 

good food-inmarathi05
carbonrally.com

२. चेहऱ्याला बर्फाचा मसाज करणे

बर्फाचा थंडावा चेहऱ्याला तरतरी देतो. एवढेच नाही तर चेहऱ्याचा तरुणपणा राखण्यात बर्फ उपयोगी पडतो आणि खरोखरीच ताजा तवाना करतो. चेहऱ्याला बर्फाच्या तुकड्याने घासून मसाज करणे हे त्वचेचे उपचार करणारे कॉस्मेटोलॉजिस्ट सुद्धा सुचवतात.

ह्या मसाजमुळे रक्त प्रवाह वाढतो. बर्फाचा जणू शॉक बसतो आणि आतील हालचालींना वेग मिळाल्याने रक्त प्रवाह वाढतो. लिंफॅटीक ड्रेनेज होण्यास मदत होते. कोलॅजन आणि इलास्टीनची त्वचेखाली वाढ होते.

ह्या सगळ्याचा फायदा त्वचा सतेज होण्याकरता होतो.

 

ice-cube-massage-inmarathi
stylecraze.com

३. हॉट आणि कोल्ड फेस पॅक नियमित वापरणे

चेहऱ्याला उजळ रंग देणे. त्वचेकडे रक्त प्रवाह वाढवणे. त्वचेचा पोत सुधारणे. त्वचेचा ओलावा राखणे. अशी सगळीच कामे ह्या हॉट आणि कोल्ड फेसपॅकने साध्य होतात.

हा पॅक करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. टर्किश टॉवेल गरम पाण्यात बुडवून त्यातील पाणी पिळून तो चेहऱ्यावर काही वेळ ठेवावा. नंतर तो बाजूला सारून दुसरा बर्फाच्या पाण्यात बुडवलेला टॉवेल चेहऱ्यावर काही काळ ठेवावा. हे आलटून पालटून करत राहावे.

 

towel-for-face-inmarathi
royalhouse.itag.pw

४. लाल द्राक्षांचा फेस पॅक

लाल द्राक्षातील अँटीऑक्सिडेंटस त्वचेला नितळ पण देतात असे “चिली’ देशातील बायका मानतात. ह्या द्राक्षांचा गर मैद्यात भिजवून त्याची मऊ पेस्ट बनवून घ्यायची. ही पेस्ट चेहऱ्यावर पॅक प्रमाणे लावायची. हा पॅक वाळला की चेहरा धुवून घ्यायचा.

चमकदार चेहरा हवा असल्यास हा प्रयोग करून पाहण्यास हरकत नाही.

 

grapes-Face-Mask-inmarathi
foodin5minutes.com

५. घरच्या घरी नियमितपणे चेहऱ्याचे मालिश करणे

एखादे तेल खास करून बदामाचे असल्यास ते चेहऱ्याला लावायचे आणि हलक्या बोटांनी ते चोळायचे. ते तेल आत मुरेपर्यंत बोटांनी मालिश करत राहायचे.

तेल नसल्यास नुसत्या बोटाने चेहऱ्यावर मसाज केल्यास चालते. ह्या मालिशने चेहऱ्याची लवचिकता वाढेल. चेहऱ्याला लागणारा ऑक्सिजन अशा मालिशमुळे चेहऱ्याच्या आत काम करेल. हा मसाज रोज ५-७ मिनिटे केल्यास उत्तम.

 

oil-massage-inmarathi
promofarma.com

६. गाजराचा रस

गाजराचा रस बऱ्याच कारणांसाठी शरीरास उपयुक्त आहे. त्यात असणाऱ्या बीटा कॅरोटीनमुळे चेहऱ्यासाठी गाजराचा रस हे उत्तम टॉनिक ठरते. हे बीटा कॅरोटीन फोड बरे करण्यास अत्यंत उपयुक्त आहे.

गाजराचा रस नियमित प्यायल्याने पिंपल्स म्हणजेच फोड येण्याची समस्या खूप कमी होते.

 

carrot-facepack-inmarathi
eyeni.biz

७. चेहऱ्याचा तेल मसाज

तेल चेहऱ्याचा ओलावा कायम राखते. अर्गन किंवा खोबऱ्याच्या तेलाने चेहऱ्याला लेप द्यावा. त्या आधी त्याच तेलाने मालिशही करावे. चेहरा मऊसूद राखण्यास तेल मालिशचा खूप उपयोग होतो. एखाद्या मॉइस्चरायझर सारखे हे काम करते.

त्यामुळे महागडे मॉइस्चरायझर आणण्यापेक्षा घरातील तेल कोणत्याही ऋतूत त्वचेसाठी वापरणे उत्तम

८. एकाच ब्रँडच्या ब्युटी प्रोडक्टसना सतत वापरू नका

हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटले असेल. कारण आपण वर्षानुवर्षे एकाच ब्रँडचे कॉस्मेटिक्स वापरण्याला प्राधान्य देतो. खरे तर एकच ब्रँड वापरल्याने चेहऱ्याला त्याची सवय होते आणि परिणाम कमी दिसायला लागतो.

त्यापेक्षा तुमचे फेस वॉश, क्रिम, फेशिअलचा ब्रँड बदलत राहिल्यास फायद्याचे आहे. त्याहूनही घरगुती प्रसाधने वापरल्यास उत्तम.

 

facewash-brands-inmarathi
youmeandtrends.com

९. फेस स्क्रब म्हणून सी सॉल्ट वापरून पहा

चेहऱ्याचा स्क्रब नाकावरील ब्लॅक हेड्स काढतो, चेहऱ्यावरील काळेपणा दूर करतो, मृत त्वचा काढून टाकतो. बाजारात उपलब्ध असलेले किमती स्क्रब वापरण्यापेक्षा सरळ समुद्री भरडे मीठ आणावे आणि त्याने चेहरा स्क्रब करावा.

ह्याचे अनेक फायदे आहेत. सी सॉल्टच्या अंघोळीने आपल्या शरीराला आराम मिळतो, मेंदूतील मज्जासंस्थेचे काम सुरळीत चालते, ताणतणाव दूर होतो. लठ्ठपणा घालवण्यासही सी सॉल्टचा उपयोग होतो.

ह्याचा वापर चेहऱ्यासाठी स्क्रब म्हणून तर होतोच. पण पोटातून घेतल्यास हे अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करते. परिणामी केस, नखे, शरीराची त्वचा नि चेहरा सगळेच सुदृढ राखतो.

 

seasalt-facepack-inmarathi
providr.com

१०. आहारामध्ये ओट मिलचा वापर वाढवा

ओट्स सगळ्यांनाच आवडतात असे नाही. पण जर ह्या ओट्सचा शरीरावर होणार चांगला परिणाम आपण जाणून घेतला तर, नक्कीच ओट्सला पसंती देऊ.

ओट्स मध्ये भरपूर कर्बोदके आणि फायबर असते. जे शरीरासाठी चांगले असते. बऱ्याचश्या ब्युटी प्रॉडक्ट्स मध्ये देखील ओट्सचा वापर होतो. चेहऱ्यावरील फोड घालवण्यासाठी ओट्स वापरले जाऊ शकतात. ओट्सचे पाणी चेहऱ्यास लावल्यास पिंपल्स कमी होतात.

 

oatmeal-facepack-inmarathi
nari.punjabkesari.in

ह्या ब्युटी टिप्स तुम्हाला नक्कीच फायद्याच्या ठरतील. ह्यांचा कोणताही साईड इफेक्ट नाही. पण अशा टिप्स अमलात आणताना व्यवस्थित आणि वेळेत आहार घेणे, व्यायाम करणे आणि किमान ८ ग्लास पाणी पिणे असे रुटीन पाळावयास लागते.

कारण जर शरीर आतून सुदृढ असेल तरच चेहऱ्यावरती उत्तम परिणाम करेल. पोटाच्या किंवा इतर तक्रारी उद्भवत असल्यास ते चेहऱ्यावर लगेच दिसते. आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि पचन शक्ती उत्तम राखल्यास तुम्हाला नैसर्गिकरित्या कोमल, मुलायम आणि नितळ त्वचा मिळेल..!

 

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?