हातात गन घेऊन फिरायचंय? हे १० देश तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

२०१५ मध्ये अमेरिकेच्या ओरेगन प्रांतातल्या रोजबर्ग शहरातल्या ‘Umpqua Community College’ च्या स्टुडंट हॉल मध्ये ख्रिस्तोफर हार्फर- मर्सर या २६ वर्षीय तरुणाने अंदाधुंद गोळीबार करत ९ विद्यार्थ्यांचा जीव घेतला होता.

InMarathi Android App

पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तो नंतर ठार झाला असला तरी, अमेरिकेत मात्र बंदूक बाळगण्याच्या कायद्यावरून राजकारण पेटले होते.

या कायद्याच्या समर्थनात आणि विरोधात असणाऱ्या गटांमध्ये त्या दरम्यान प्रचंड वाद विवाद झाले.

 

umpqua-community-college-inmarathi
vicenews.com

१९२० च्या दशकात अमेरिकेत दारूबंदीचा कायदा पारित केला गेला. ज्यानंतर गुंडगिरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली. १९२९ मध्ये झालेल्या ‘Saint Valentine’s Day Massacre’ मध्ये ७ जणांचा खून करण्यात आल्याने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला.

गुन्हेगारांकडून शॉट गन आणि थॉमसन सबमशीन गनच्या सर्रास वापरामुळे तो काळ बराच गाजला होता. समाजात वाढत चाललेल्या गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी ‘National Firearms Act’ १९३४ पारित करण्यात आला.

या कायद्यानुसार अमेरिकन नागरिकांना स्वतःच्या सुरक्षेसाठी काही ठराविक बंदुका बाळगण्याचा हक्क प्रदान करण्यात आला.

मात्र गेल्या काही दशकांमध्ये अमेरिकेतल्या विविध राज्यांमध्ये वाढत जाणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांनी अमेरिकन राज्यकर्त्यांना या कायद्यावर पुन्हा विचार करण्यास भाग पाडले आहे.

सद्यस्थितीत अमेरिकेच्या ३८.४% इतक्या लोकसंख्येकडे स्वतःच्या बंदुका आहेत. हे प्रमाण प्रचंड असून गेल्या काही दशकांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटना बघता ही नक्कीच चिंतेची बाब आहे.

मात्र अमेरिका हा एकमेव देश नाही ज्या देशात सहजपणे बंदुका बाळगण्याची मुभा आहे. अमेरिकेकडून प्रेरणा घेत काही देशांनी देखील आपल्या नागरिकांना बंदुका बाळगण्याचा अधिकार प्राप्त करून दिलेला आहे.

चला तर मग माहिती घेऊया अशाच काही देशांची..!

१. फिनलँड

स्थानिक पोलीस प्रशासनाच्या परवानगीने फिनलँडच्या नागरिकांना बंदूक बाळगण्यासंबंधीचे अधिकार मिळतात. एक व्यक्ती लायसन्स वर एका पेक्षा जास्त बंदुका मिळवू शकतो.

बंदुकांच्या खेळांचे कारण देऊन असे लायसन्स सहज मिळवता येऊ शकते.

कारण तुम्ही तो खेळ खेळत असल्याचे कुठलेही पुरावे स्थानिक पोलिसांना देण्याची गरज नसते. फक्त तुम्हाला तुमची बंदूक सार्वजनिक ठिकाणी बाळगायची असेल तर त्यासाठी मात्र विशेष परवान्याची गरज पडते.

 

BestGuns-inmarathi
wideinfo.com

२. थायलँड

पर्यटकांना नेहमीच स्वतःकडे आकर्षित करणाऱ्या या छोट्याश्या देशामध्ये सुद्धा नागरिकांना बंदुका बाळगण्याचा अधिकार आहे. स्व-संरक्षण आणि त्या संबंधित इतर कारणांसाठी नागरिकांना शस्त्र बाळगण्याची परवानगी मिळते.

मात्र थायलँड सरकारनुसार दुसऱ्यांना अथवा स्वतःस हानी पोहोचवू शकणाऱ्या व्यक्तींना लायसन्स नाकारण्याचा अधिकार थाय सुरक्षा यंत्रणांना आहे. तसेच नागरिकांनी कुठल्या प्रकारची बंदूक हाताळावी यासंबंधी थायलँड मधले कायदे कडक आहेत.

३. रशिया

रशियात बंदुका बाळगणे हे इतर देशांच्या तुलनेत अगदी सोपे आहे. तुम्ही रशियन नागरिक असावे आणि कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी एवढीच काय ती पात्रता असते.

मग लायसन्स मिळवण्यासाठी तुम्ही कुठलंही कारण नाही दिलं तरी, लायसन्स मिळवण्यात काही अडचण होत नाही. मात्र त्यासाठी तुम्ही बंदुका हाताळण्याचे शिक्षण घेणे अनिवार्य असते.

दोन किंवा त्यापेक्षा जास्त गोळ्या झाडणाऱ्या बंदुकांवर कठोर मर्यादा घातल्या जात असल्या तरी एका व्यक्तीला कमीत कमी १० बंदुका घेता येत असल्याने रशिया बंदूक शौकिनांसाठी उत्तम देश ठरतो.

४. सौदी अरेबिया

बंदूक बाळगण्याचा कायद्याचा विचार करायचा झाल्यास सौदी अरेबियाच्या कायद्यात बराच गोंधळ दिसून येतो. सौदी मध्ये मालकी परवाना मिळवणे सोपे आहे. पण सार्वजनिक ठिकाणी बंदुक बाळगायची असेल तर त्यासाठी वेगळ्या परवान्याची गरज भासते.

याहूनही अधिक म्हणजे सौदी मध्ये कायदेशीररित्या बंदूक विकत घेण्याची प्रक्रिया महाकठीण असते. त्यामुळे बरेच नागरिक ‘ब्लॅक मार्केट’ कडे वळतात.

मार्केट मधून बेकायदेशीररित्या बंदूक घेतात आणि त्यानंतर त्या बंदुकीचा कायदेशीररित्या परवाना मिळवतात.

तुम्हाला जाणून नक्कीच आश्चर्य होईल की सौदी मध्ये AK-47 सारखी बंदूक सहजरित्या बाळगली जाते.

५. इस्राईल

इस्राईल मध्ये २ वर्षांपेक्षा जास्त काळासाठी वास्तव्यास असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षेच्या कारणावरून बंदूक मिळवता येते. जर तुम्ही इस्रायली सुरक्षा यंत्रणांमध्ये काम करत असाल वा तिथून निवृत्त झाला असाल तर, तुम्हाला परवाना मिळवणे अत्याधिक सोपे जाते.

 

israelis-with-rifles-inmarathi
arizonajewishpost.com

इस्राईलमध्ये साधारणतः ६० टक्क्यांपेक्षा जास्त बंदुकीच्या परवान्यासाठी केलेले अर्ज स्वीकारले जातात.

६. झेक प्रजासत्ताक

वयाची १८ वर्ष पूर्ण केलेल्या आणि उत्तम मानसिक व शारीरिक आरोग्य असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सहजपणे बंदूक बाळगता येऊ शकते. त्यासाठी योग्य असे कारण देण्याची तेवढी गरज असते.

झेक प्रजासत्ताकची शस्त्र संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. म्हणूनच काय तर शूटिंग हा झेक प्रजासत्ताक मधल्या लोकांचा तिसरा सर्वात जास्त आवडता खेळ आहे.

७. सर्बिया

प्रति व्यक्ती बंदूक खरेदीच्या बाबतीत सर्बिया जगात दुसरा देश ठरतो. शस्त्र बाळगणे हे सर्बियाच्या राष्ट्रीय संस्कृती पैकी एक आहे.

तुम्ही जर मानसिक रोगी किंवा गुन्हेगार नसाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची बंदूक विकत घेऊ शकता. फक्त गोळ्या घेतांना काही मर्यादा पाळाव्या लागतात एवढेच. सर्बियन लोकांचे बंदुकांवर खूप प्रेम आहे.

serbia-inmarathi
dw.com

इतके की इतर अनेक देश बंदुकांवर प्रतिबंध घालण्यासाठी आग्रही असतांना सर्बियन नागरिक मात्र कमीत कमी प्रतिबंधासाठी आग्रही असतात.

८. कॅनडा

गेल्या काही काळात कॅनडा मध्ये बंदुका बाळगण्यावर प्रतिबंध घालण्यात आले. तरी विशेष परवान्यामार्फत हँडगन आणि सेमी ऑटोमॅटिक गन मिळवता येऊ शकतात.

बंदूक परवाना मिळवण्यासाठीच्या अटींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने काही वर्षांमध्ये कॅनडा मधून ‘गन संस्कृती’ नामशेष होऊ शकते.

९. स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंडच्या जवळपास २५ टक्के लोकसंख्येकडे स्वतःच्या बंदुका आहेत. त्यातले बरेच लोक सैनिक आणि भूतपूर्व सैनिक आहेत. २००७ पर्यंत तर सामान्य नागरिकांना सुद्धा सैन्याचे हत्यार पुरवले जायचे.

परकीय आक्रमण झाल्यास स्वित्झर्लंडचे नागरिक त्यासाठी तयार असावेत ही त्याच्या मागची भावना असायची.

मात्र ती पद्धत बंद झाली असली तरी, स्वित्झर्लंडच्या नागरिकांना आताही बंदुका विकत घेता येऊ शकतात.

१०. अमेरिका

संविधानात तरतूद करून नागरिकांना बंदुका बाळगण्याचा अधिकार प्राप्त करून देणारा अमेरिका पहिलाच देश आहे. अमेरिकेत प्रत्येक राज्यासाठी वेगळे वेगळे कायदे असले तरी, ‘Gun Free Zones’ वगळता संपूर्ण अमेरिकेत कुठेही बंदूक बाळगण्याची मुभा आहे.

गेल्या काही काळात Gun Politics सुरू झाली असली तरी, अमेरिकन संविधानात बदल करण्याची गुंतागुंतीची प्रक्रिया बघता हा कायदा इतक्या सहजा सहजी रद्द होणार नाही इतके निश्चित आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *