मेंदू तल्लख करण्यासाठी ह्या १० सवयी तात्काळ थांबवा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपलं शरीर चालतं ते मेंदूच्या कार्यक्षमतेचा जोरावर. त्या मेंदूच्या तल्लखतेच्या जोरावर आपण बऱ्याचदा वरचढ ठरतो. अगदी चव ओळखण्यापासून समोरून येणाऱ्या गाडीची काही क्षणांनंतरची जागा ओळखेपर्यंत मेंदू मदत करतो.

 

Brain

स्रोत

आजकालच्या घाईगडबडीच्या जीवनशैलीत आपण अश्या काही गोष्टी करतो ज्याने आपल्या मेंदूला त्रास तर होतोच पण त्याची कार्यक्षमता पण कमी होते. आपल्याकडून नकळत होणाऱ्या ह्या गोष्टी आपण टाळायला हव्यात.

 

१. सकाळचा नाश्ता टाळणे

 

आपण सकाळी जेव्हा नाश्ता टाळतो तेव्हा आपल्या रक्तात शर्करेचे प्रमाण अगदीच कमी होते. त्यामुळे आवश्यक ते पोषक द्रव्य मेंदूपर्यंत पोहोचत नाही. ह्याने ब्रेन ह्यामरेज ची रिस्क वाढते.

 

morning-breakfast-marathipizza

२. जास्त जेवण करणे

 

too much food inmarathi
livemint.com

आपला आहार प्रमाणापेक्षा जास्त असेल तर आपलं पोट फुगतं. पण तेवढंच नाही तर त्याने मेंदूला रक्ताचा पुरवठा करणाऱ्या धमन्या कडक होऊन मानसिक शक्ती सुद्धा कमी करतो.

 

३. धुम्रपान करणे

 

Cortex

स्रोत

आजच्या पिढीच्या फॅशनचा भाग असणाऱ्या आणि ‘cool असण्याचं लक्षण’ समजल्या जाणाऱ्या ह्या धुरकांड्या मेंदूपर्यंत नुकसान करतात. मेंदूच्या बाह्यपटलाचा संबंध सरळ भाषा, स्मरणशक्ती, समज ह्या गोष्टींशी असतो.

धुम्रपान ह्या बाह्यपटलाची जाडी कमी करते आणि ह्याने “Multiple brain shrinkage” चा धोका पण वाढतो.

 

४. साखरेचे अतिसेवन करणे

 

sugar-marathipizza
Getty Images

साखर जास्त खाल्ल्यामुळे मेंदूपर्यंत बाकीचे पोषक द्रव्य पोहोचत नाहीत किंवा कमी पोहोचतात. त्याने मेंदूच्या विकासाची प्रक्रिया disturb होते आणि पुढे अल्झायमर्स ची रिस्क निर्माण होते.

 

५. हवा प्रदुषण

 

Oxygen food

Source

मेंदूचा मुख्य खुराक म्हणजे Oxygen. वातावरणाच्या प्रदूषणामुळे कमी Oxygen मेंदूपर्यंत पोहोचतो आणि सरळ मेंदूच्या कार्यक्षमतेला एकदम कमी करतो.

 

६. झोप कमी होणे

 

sleepingbrain

स्रोत

जास्त काम करण्याच्या धडपडीत आपण झोपेला गृहीत धरतो. पण झोपेत आपलं शरीर दिवसभरात तयार झालेल्या अपायकारक गोष्टींना संपवण्यात व्यस्त असतं.

अपुरं झोपल्याने, आपण नेमकं त्यात अडथळे निर्माण करतो. ज्याने अपायकारक द्रव्याचा निचरा होण्याची प्रोसेस थांबून टॉक्सिक वेस्ट (विषारी कचरा!) तसाच रहातो. ह्या टॉक्सिक वेस्ट मुळे ब्रेन सेल्स मरतात.

 

७. डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपणे

 

sleep inmarathi
Getty Images

आपल्यातील अनेकांना ही सवय आहे. ह्या सवयी मागची प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात. पण नुकसान मात्र सर्वांचं एकसारखंच होतं!

झोपतांना जेव्हा आपण डोक्यावरून पांघरून घेतो तेव्हा श्वासावाटे, Oxygen कमी आणि कार्बन डाय ऑक्साईड, जास्त घेतो. त्याने मेंदूचं मुख्य खाद्य – Oxygen पुरेसं पोहोचत नाही.

 

८. आजारपणाकडे दुर्लक्ष करणे

 

symptoms-inmarathi
sicklecellanemiaawareness.weebly.com

बऱ्याचदा आपण आपलं आजारपण “काही नाही होत” म्हणून अंगावर काढतो. त्याने आपण खरं तर वेळेवर कामाची efficiency वाढवत असतो पण आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर अपायकारक परिणाम करत असतो.

 

९. विचारांची कमतरता

 

Thoughts

Source

विचार करणे हे मेंदूचं खरं काम आहे. जोवर त्याला हे काम मिळतंय तोवर तो fit and fine आहे. पण जेव्हा त्याला नवनवीन कल्पना, विचार येणं, करणं बंद होतं तेव्हा मेंदू आकुंचन पावतो आणि त्याची आधीची क्षमता लोप पावते.

म्हणून – वाचन, मनन, काव्य-शस्त्र-विनोद ह्यावर थोडा वेळ द्यायलाच हवा.

 

१०. कमी बोलणे

 

Conversations

Source

आजकाल समोरच्यावर आपली authority गाजवायची असल्यास कमी बोला पण मोजकं बोला असं सांगितलं जातं. पण जेवढं जास्त बोलाल, वाद-प्रतिवाद, चर्चा कराल तेवढा मेंदू तल्लख आणि वेगवान होतो.

अर्थात, ह्याचा अर्थ वायफळ बडबड करा असा नसून – आवश्यक तेव्हा, आपलं म्हणणं योग्य शब्दात व्यक्त करायचा प्रयत्न करत रहाणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो ह्या अश्या काही गोष्टी आहेत ज्या तश्या छोट्या आहेत पण त्यांचा मेंदूरवर होणार परिणाम फार मोठा असतो.

विचार करा आणि ठरवा ह्यातल्या कोणत्या गोष्टी आपण करतोय आणि सहज टाळू शकतो.

स्रोत

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 52 posts and counting.See all posts by abhidnya

One thought on “मेंदू तल्लख करण्यासाठी ह्या १० सवयी तात्काळ थांबवा

  • October 11, 2019 at 1:58 pm
    Permalink

    नमस्कार मेदुबद्दलछानमाहिती करण कलतनकलत आपण कहि आपल्या हायुशघडत आसते खुप छान आहे शुभेच्छा दसरा च्या शुभेच्छा धन्यवाद

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?