भारतातील अशी काही मंदिरे जिथे ब्राह्मण नाही तर दलित पुजारी आहेत!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपल्या भारतात पूर्वी कर्मावरून वर्णव्यवस्था निर्माण झाली. ज्याचे जे काम होते त्यावून त्याचा वर्ण ठरत असे. क्षत्रिय समाजाचे रक्षण करण्याचे कार्य करीत असत. वैश्य व्यवसाय /व्यापार करीत असत तसेच ब्राह्मणांना पूजा करण्याचे, सांगण्याचे तसेच अध्यापनाचे काम दिलेले होते. काळ बदलला तसे लोकांचे व्यवसाय सुद्धा बदलले. आता पूर्वी सारख्या लोकांना अमुक एकच व्यवसाय करावा अशी मर्यादा नाही. आता प्रत्येकाला आवडेल ते काम करण्याची मुभा आहे. तरीही आजही बऱ्याचशा देवळांमध्ये पूजेचे काम ब्राह्मणाकडे दिलेले असते.

पण भारतात अशीही काही मंदिरे आहेत जिथे ब्राह्मण पुजारी नसून दुसऱ्या समाजाचे पुजारी आहेत.

 

temple-marathipizza02
mapsofindia.com

असं म्हणतात कि देवावर कोणा एकाचाच अधिकार नाही. देव सगळ्यांचा आहे. म्हणूनच देवाची पूजा करण्याच्या अधिकार प्रत्येक माणसाला आहे. परंतु देशात अजूनही अशा घटना ऐकायला मिळतात की एखाद्या व्यक्तीला देवळात पूजेचा हक्क नाही किंवा देवळात प्रवेश नाही. आपल्या संतमंडळींनी पूर्वीपासूनच अशी शिकवण दिली आहे की माणसाने माणसाशी कुठल्याही प्रकारचा भेदभाव करू नये. प्रत्येकाशी प्रेमाने व माणूसकीनेच वागावे. काही लोक आजही हे मानत नाहीत व दुसऱ्याला कनिष्ठ समजून वाईट वागणूक देतात.

परंतु हळू हळू हे प्रमाण कमी होते आहे. लोक हे स्वीकारत आहेत की प्रत्येकाला देवाशी जोडल्या जाण्याचा व देवाची पूजा करण्याचा समान अधिकार आहे. म्हणूनच भारतात अशीही काही मंदिरे आहेत जिथे पुजारी हे ब्राह्मण समाजाचे नसून दुसऱ्या समाजाचे आहेत.

 

temple-marathipizza01
jagran.com

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण देवभूमी उत्तराखंड मध्ये एक मंदिर असे आहे जिथे पुजारी ब्राह्मण किंवा क्षत्रिय नसून अनुसूचित जातीचे आहेत. हे देऊळ चार धामांपैकी एक बद्रीनाथ–कर्णप्रयाग पासून फक्त ३ किलोमीटरच्या अंतरावर आहे. हे देऊळ ‘कालेश्वर भैरव मंदिर’ म्हणून प्रसिद्ध आहे. पण स्थानिक ह्या मंदिराला ‘काल्दू भैरव मंदिर’ असे म्हणतात.

आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे बद्रीनाथ धाम इथे जी रोज आरती गायली जाते ती कुणा हिंदू भक्ताने रचलेली नसून प्रयाग येथील बदरुद्दीन ह्यांनी लिहिली आहे. बदरुद्दीन हे मुस्लीम धर्माचे आहेत. त्यांनी हि आरती रचली जी आजही बद्रीनाथ येथे नित्यनेमाने भक्तिभावाने गायली जाते. (समाजात तेढ पसरवणारे लोक अशी उदाहरणे का लक्षात घेत नाहीत?)

 

temple-marathipizza02
dharmikraj.blogspot.in

असेच एक देऊळ झारखंड येथे सुद्धा आहे जिथले पुजारी ब्राह्मण किंवा क्षत्रिय नसून दलित समाजाचे आहेत. हे मंदिर खरसावा जिल्ह्याच्या कुम्हारसाही येथे आहे. हे मंदिर तिथल्या राजांनी प्राचीन काळी बांधलेले आहे व सुरुवातीपासूनच ह्या देवळात देवीच्या पूजेचा मान दलित समाजाच्या पुजाऱ्यांना आहे. हे देऊळ अत्यंत जागृत देवस्थान आहे.

स्थानिकांच्या मते तिथे माता पाउडी देवी विराजमान आहे व तिचा महिमा अपरंपार आहे. म्हणूनच पाउडी देवीचे दर्शन घेण्यासाठी लांबून लांबून लोक येतात. सामान्य लोक तर येतातच परंतु सत्तेवर असणारे ‘सिरमौर’ सुद्धा तिथे न चुकता देवीचे दर्शन घ्यायला येतात. माता पाउडीला भगवती देवीचे रूप मानतात. आणि ह्या शक्ती पीठाचे पुजारी देऊरी दलित समाजाचे लोक आहेत.

 

temple-marathipizza03
hindi.indiasamvad.co.in

आपल्या महाराष्ट्रात सुद्धा पंढरपूर आणि तुळजापूर येथील देवळांमध्ये ब्राह्मण पुजारी नसून इतर समाजाचे लोक पुजारी आहेत. आणि लोकांनीही हे आनंदाने स्वीकारलेले आहे. कारण देवाची भक्ती करण्याचा हक्क सर्वांनाच आहे. मग त्याची पूजा करण्याचा हक्क सर्वांनाच का मिळू नये?

 

tuljapur-aai-tulja-bhavani-marathipizza
trekbook.in

सर्वात महत्चाचे म्हणजे केवळ पूजा अर्चा, कर्मकांड ह्याने देव प्रसन्न होत नाही. सर्व संत सांगतात कि ज्याच्या मनात सच्चा भाव असतो त्याला देव पावतो कारण देवासाठी त्याची सर्व लेकरे सारखीच आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

One thought on “भारतातील अशी काही मंदिरे जिथे ब्राह्मण नाही तर दलित पुजारी आहेत!

 • April 12, 2017 at 5:39 pm
  Permalink

  हे पुजारी दलित असूच शकत नाहीत.
  १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेवर आधारित धर्मातून बाहेर पडण्यासाठी, जातिव्यवस्थेत सगळ्यात खालचा दर्जा दिला गेलेल्या दलितांना केलेल्या धर्मांतराच्या चळवळी पासून वंचित असतील.
  १४ ऑक्टोम्बर १९५६ पासून सर्व दलित समाज बोद्ध धम्मा मध्ये विलीन झाला आहे, त्यामुळे दलित नावाचा कोणताही समाज आता असू शकत नाही

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?