भारतीय वैज्ञानिकांनी बनवली अनोखी चहायुक्त दारू अर्थात ‘टी वाइन’

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

चहा… सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळ पर्यंत आपल्या दिवसात जर सर्वात जास्त कशाला महत्व असेल तर ते चहा आहे. झोपेतून उठल्यावर आणखी काही नको बस एक कप गरमागरम चहा हवा. मग ऑफिसला गेल्यावर चहा हवा, आळस येतोय म्हणून चहा हवा, संध्याकाळचा चहा हवा, ऑफिसमधून आल्यावर चहा हवा. जसे काही हा चहा नसेल तर आपलं जीवनच अपूर्ण… चहा पिल्याने ताजेतवाने वाटते, घरी पाहुणे आले की आपण त्यांना एक कप चहा नक्की पाजतो, टपरीवर मित्रांसोबत गप्पा करत चहाचा आस्वाद घेतो. एवढचं काय तर आपल्या राजकारणातही चहाला महत्त्व देतात, ‘चाय पे चर्चा’ हे त्यातलच एक… आपल्या भारतीयांसाठी तर चहाचे एक वेगळेच महत्व आहे.

tea-marathipizza
drinkpreneur.com

चहावरील आपल्या याच प्रेमापायी काही वैज्ञानिकांनी मिळून या चहाला एक वेगळे स्वरूप प्राप्त करवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ५ वैज्ञानिकांच्या एका टीमने मिळून या चहापासून चक्क वाइन बनविली आहे. आसामची राजधानी जोरहाट येथे असणाऱ्या टोकलाई चहा अनुसंधान संस्थानाच्या या वैज्ञानिकांनी खूप दिवसांच्या संशोधनातून ‘Tea Wine’ म्हणजेच चहा पासून बनणारी वाइन तयार केली आहे.

tea wine-marathipizza
glenstubbephotography.com

या संस्थांनच्या माईकोलॉजी आणि माइक्रो-बायोलॉजी विभागाच्या या वैज्ञानिकांनी टी वाइन च्या तीन वेरायटी तयार केल्या आहेत, ज्यात सीटीसी वाइन, ऑर्थोडॉक्स वाइन आणि ग्रीन टी वाइन यांचा समावेश आहे. हे युनिक फ्लेवर्स ऑरगैनिक, पेस्टिसाइड फ्री ग्रीन टी यांपासून बनविण्यात आले आहेत.

wine-marathipizza
corkbuzz.com

वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, चहा ने बनलेली ही वाइन ब्लड प्रेशर, हृदया संबंधी बिमारी, ब्लड शुगर च्या रोग्यांसाठी खूप गुणकारी असेल. सोबतच सर्दी, खोकला, शरीरात रक्ताची कमतरता, डोळे, दात इत्यादी आरोग्या संबंधित रोगांवर देखील ही वाइन उपायकारक असेल.

या शोधात समाविष्ट असलेल्या एका वैज्ञानिकाने सांगितले की, इतर वाइन लिवर ला नुकसान पोहोचवतात पण या वाइनला पिल्याने लिवरवर कुठल्याही प्रकारच नुकसान होत नाही. कारण यात अल्कोहोल ची मात्र खूप कमी ठेवण्यात आली आहे.

tea wine01-marathipizza
punchdrink.com

जर ही ‘टी वाइन’ लोकप्रिय झाली तर आसामचा चहा व्यापाराचा चेहरा मोहराच बदलून जाईल…

जर तुम्हालाही वाइन आवडत असेल तर या स्वदेशी टी वाइनचे फ्लेवर्स नक्की ट्राय करा…

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?