कामाला कधी लाजू नका, हेच खरं “सिक्रेट”- दरमहा १२ लाख कमावणारा हा चहावाला…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

हिम्मत आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर माणूस यशाचे ते शिखर गाठू शकतो ज्याचा कुणी विचारही केला नसेल. अनेकांना वाटत की यश हे केवळ नशिबाने मिळते, पण असं नसतं.

यश हे मेहनत करणाऱ्याला मिळते आणि ते मेहनतीनेच मिळवावे लागते.

 

Yewale-Tea-House-inmarathi04
trendsmap.com

अशीच एक कहाणी आहे मेहनतीच्या जोरावर यश मिळविलेल्या नवनाथ येवले यांची.

महाराष्ट्रातील पुणे येथे राहणारे नवनाथ येवले जे चहाच्या दुकानातून आपली उपजीविका भागवतात, आज ते महिन्याला १२ लाख कमवत आहेत.

एवढा पगार तर कुठल्या आईटी प्रोफेशनलचा देखील नसतो.

 

Yewale-Tea-House-inmarathi
sakshi.com

२०११ साली सुरु करण्यात आलेला हा चहाचा स्टॉल आज येवले टी हाउस ह्या नावाने प्रसिद्ध आहे.

हा टी स्टॉल पुण्याच्या लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. हिवाळा असो व उन्हाळा, पुण्यातील लोकांची ह्या चहाच्या दुकानावर नेहमीच गर्दी दिसेल. सकाळ ते सायंकाळ होऊन जाते पण लोक चहा प्यायला येतच असतात.

 

 

पुण्यात नवनाथ येवले यांची दोन चहाची दुकानं आहेत. प्रत्येक दुकानावर १०-१२ लोकं काम करतात. येवले अमृततुल्य नावानी प्रसिद्ध असलेल्या ह्या टी हाउसचे एकूण ५ मालक आहेत, ज्यापैकी येवले हे देखील एक आहेत.

येवले टी हाउसचे सह-संस्थापक नवनाथ येवले यांनी सांगितलं की,

“आम्ही २०११ साली ह्या कामाला सुरवात केली. ४ वर्ष अभ्यासून आम्ही चहाची एक फायनल क्वालिटी सेट केली. ह्या २ सेंटर मधून आम्ही १०-१२ लाख रुपये कमवतो.”

 

Yewale-Tea-House-inmarathi03
thesocialmonk.com

“एका सेंटरवर एका दिवसात ३-४ हजार कप चहा विकला जातो. आम्ही लवकरच १०० च्या जवळपास सेंटर उघडून एक आंतरराष्ट्रीय ब्रान्ड बनण्याच्या तयारीत आहोत.

आम्ही चहा विकून जास्तीत जास्त लोकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. आणि मी आनंदी आहे आमचं हे काम निरंतर वाढत आहे.”

कामाला कधी लाजू नये, कुठलच काम हे लहान नसतं. आणि जर आपण हा विचार करत बसलो की मी हे काम केलं तर लोकं काय म्हणतील तर तुम्ही कधीच जीवनात काही करू शकणार नाही.

आपल्याला ह्यातून बाहेर निघून काहीतरी करण्याचा प्रयत्न करायला हवा. तेव्हाच आपण काहीतरी मोठ्ठ करू शकू.

नवनाथ येवले ह्यांची ही कहाणी तर आपल्याला हेच शिकवते. आणि यातून शिकवण घ्यायला काय हरकत आहे. शेवटी एक चहा विकणारा महिन्याला १२ लाख कमावतो आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “कामाला कधी लाजू नका, हेच खरं “सिक्रेट”- दरमहा १२ लाख कमावणारा हा चहावाला…

 • November 3, 2018 at 3:54 pm
  Permalink

  एक मराठी माणूस एवढ्या लोकांना कामधंदा पुरवत व्यवसायात उभा राहून याच व्यवसायात परदेशात जाऊन तेथे हा व्यवसाय करण्यासाठी आकाशाला गवसणी घालतो याचा एक मराठी माणूस म्हणून अभिमान वाटतो…धन्यवाद.

  Reply
 • November 9, 2018 at 7:25 pm
  Permalink

  Best quality

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?