अनेक हल्ले झाले, मात्र ह्या मंदिराची वीटही सरकली नाही, हे आहे १२०० वर्ष जुने तनोट देवीचे मंदिर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. त्यामुळे आपल्या येथे विविध संस्कृतीची प्रचीती आहे. धर्म जसे वेगवेगळे तसे त्यांची धार्मिक स्थळे देखील वेगवेगळी आहेत.

पण काही धार्मिक स्थळे चमत्कारिक असतात. ज्यांच्याविषयीचे गूढ सहसा माणसाला सोडवता येत नाही.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका मंदिराबद्दल सांगणार आहोत, ज्याच्यावर शेकडो – हजारो बॉम्ब पडले तरीदेखील त्या मंदिराला काहीही झाले नाही. चला तर मग आज जाणून घेऊया या अनोख्या मंदिराबद्दल..

 

Spiritual tanot mata temple.Inmarathi
travelnthrill.com

जेसलमेरपासून जवळपास १३० किलोमीटर लांब भारत – पाकिस्तान सीमेवर स्थित तनोट मातेचे जवळपास १२०० वर्ष जुने मंदिर कितीतरी हल्ल्यानंतर देखील जसेच्या तसे उभे आहे.

राजस्थानमध्ये भारत आणि पाकिस्तान सीमेवर स्थित तनोट मातेचे मंदिर तसेतर नेहमीच आस्थेचे केंद्र राहिले आहे. पण १९६५ च्या भारत – पाक युद्धानंतर हे मंदिर जगभरामध्ये आपल्या चमत्कारांसाठी प्रसिद्ध झाले आहे.

असे म्हटले जाते की, १९६५ च्या लढाईमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून जवळपास ३००० बॉम्ब टाकले गेले, पण तरीही या मंदिराची एक वीट देखील हलली नाही.

एवढेच नाही तर मंदिर परिसरामध्ये पडलेले ४५० बॉम्ब फुटले देखील नाहीत. आता त्यांना मंदिर परिसरामध्ये बनलेल्या एका संग्रहालयात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी ठेवण्यात आले आहे.

त्याचबरोबर या युद्धानंतर मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी सीमा सुरक्षा दल (BSF) यांनी घेऊन येथे आपली एक चौकी बनवली.

 

Spiritual tanot mata temple.Inmarathi1
defencelover.in

तनोट मातेचे मूळ रूप पाकिस्तानमध्ये आहे

या मंदिरामध्ये विराजमान असलेल्या तनोट मातेला आवड माता या नावाने ओळखले जाते, जी हिंगलाज मातेचे एक रूप आहे. याच हिंगलाज मातेचे शक्तीपीठ पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये स्थित आहे.

दरवर्षी अश्विन आणि चैत्र नवरात्रीला येथे एका मोठ्या जत्रेचे आयोजन केले जाते.

या मंदिराविषयी कितीतरी गोष्टी प्रचलित आहेत. त्यातीलच एक खूप जुनी गोष्ट म्हणजे, पूर्वीच्या काळामध्ये एका चारणने संतान प्राप्तीसाठी हिंगलाज शक्तीपिठापर्यंत सात वेळा पायी प्रवास केला.

तेव्हा देवीने प्रसन्न होऊन या चारणच्या स्वप्नामध्ये येऊन त्याची इच्छा विचारली. तेव्हा चारणने देवीनेच आपल्या घरी जन्म घेण्याची इच्छा दर्शवली. त्यांनतर देवीच्या कृपेने त्याला ७ मुली आणि १ मुलगा झाला.

 

Spiritual tanot mata temple.Inmarathi3
newsdayin.com

या सात मुलींपैकी एक आवड माता होती. या सातही मुलींमध्ये दैवी शक्ती होत्या. त्यांनी हुनाच्या आक्रमणापासून माड प्रदेशाचे रक्षण केले. कालांतराने माड प्रदेशमध्ये आवड देवीच्या कृपेमुळे भाटी राजपुत्रांचे सुदृढ राज्य स्थापित झाले.

राजा तानुरव भाटीने या जागेला आपली राजधानी बनवले आणि आवड मातेला सुवर्ण सिंहासन भेट केले.

असे हे प्राचीन काळापासून स्थित असलेले मंदिर खूप अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?