' तिथे ५ लाख लोकांचा नरसंहार झाला, पण कुणालाच त्याचं काहीच नाही! – InMarathi

तिथे ५ लाख लोकांचा नरसंहार झाला, पण कुणालाच त्याचं काहीच नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक: पुष्कर देशमुख 

===

शांततेचा हक्क त्यांना पण आहे. पण गेल्या ८ वर्षा पासून तो नेहमीच नाकारल्या जातोय. ५ लाखाच्या घरात कत्तली केव्हाच घड्ल्यात आणि आजही घडत आहेत आणि सगळं जग सुन्न होऊन पाहत आहे.

ह्याची सुरुवात झाली १७ डिसेंबर २०१० साली मोहम्मद बोऊजिजि नामक ट्यूनिशियन फळ विक्रेत्याने स्वतःला जाळून घेतल्यानंतर.

आणि मग २०११ साली हुकुमशहा तानाशहा विरुद्ध सुरू झालेलं अरब स्प्रिंग नावाचं आंदोलन केव्हा सीरियाचं गृहयुद्ध बनलं हे जगालाही कळलं नाही.

८०% सुन्नी मुस्लिम असलेल्या देशात एक शीया मुस्लिम हूकूमशहा म्हणून वावरतोय हे १९७१ सालापासून जगाच्या राजकारणाने पाहिलंय. मग अचानक असं काय घडलं की सीरीयात जी अराजकता माजली आणि आता जे घोउटा मध्ये घडतंय त्याला तोंड फुटावं? ते असं एकाएकी घडलं नाही.

 

arab-spring-inmarathi
www.cospol.ch

 

गोष्टी २०११ साली सुरू झाल्या आणि आज मृत लोकांचा आकडा कित्येक लाखाच्या घरात आहे. आणि नेहमी प्रमाणे आज पुन्हा प्रश्न विचारला जातोय – “Why world is silent on Syria???”

ट्युनिशीया मध्ये राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे यशस्वी आंदोलन झालं त्याच्या प्रेरणेतून बाकी अरब देशांना बदलाची चाहूल लागली.

 

syrian childrens
medium

 

आणि त्यापैकीच एक होता सीरिया, ज्याला बदल घडवण्याची इच्छा झाली, खरी पण ट्युनिशिया च्या बेन अली किंवा ईजिप्तच्या होसनी मुबारक सारखं राजीनामा देऊन पायउतार होण्याचा मार्ग सीरियन राष्ट्राध्यक्ष बशर- अल- असद ने निवडला नाही.

आणि लीबियाच्या गद्दाफी सोबत जे घडलं ते करण्यातही सीरियन आंदोलकाना यश आलं नाही.

पण त्यांचं तेच अपयश पुढे सीरियाचं गृहयुध्द म्हणून आज जग पाहतंय.

अरब स्प्रिंगच्या समर्थनार्थ सीरिया मधे शांततेच्या मार्गाने सुरू झालेलं आंदोलन चिरड्ण्यासाठी असद ने जवळपास शंभर आंदोलकांची कत्तल केली आणि किती तरी लोकांना तुरुंगात पाठवले.

त्यानंतर सैन्यातल्या लोकांनी पक्षपाती धोरणाचा अवलम्ब करत “Free Syrian Army” नावाचा बंडखोर गट असदची सत्ता उलथून टाकण्यासाठी स्थापन केला. आणि त्यानंतर सुरू झालं सीरियन नागरी युद्ध (Syrian Civil War).

 

civil-war-inmarathi
abbaskadhim.com

 

यादरम्यान आंदोलन दडपण्यासाठी असद ने सॅरीन नावाच्या रसायनाचा प्रयोग केला, ज्यात ७०० लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्याची जगाने तीव्र निंदा केली. सुरवातीला देशांतर्गत असलेले हे आंदोलन चिघळायला खरा हातभार लावला तो बाहेरच्या देशांनी.

आंदोलन तीव्र होऊन बशर अल असदची सत्ता जाणार वाटत असताना त्याच्या मदतीला धावून आला व्लादिमिर पुतीन चा रशिया.

मग ह्याच रशिया च्या सल्ल्याने असदने ती रसायनीक हत्यारे Organisiation for the Prohibition Of Chemical Weapons कडे सुपूर्द केली. ह्यासाठी ह्या संस्थेला २०१३ सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार देखील मिळाला.

त्याचवेळी शिया बहुसंख्य असलेल्या इराक़ आणि ईरान आणि लेबनान स्थित हेज्बोल्लाह गटाने असद ला आपला पाठिम्बा देऊ केला. पण आता गोष्ट हाताबाहेर गेली होती.

टर्की, कतार, सौदी अरेबिया आणि जॉर्डन सारख्या सुन्नी राष्ट्रानी असद विरोधात बंडखोरांना आपला पाठिम्बा द्यायला सुरवात केली होती. दुसरीकडे अमेरिकेने असद विरोधी गटाला हत्यारांची मदत करायला सुरवात केली होती.

त्याचवेळी इराक़ मधे स्थापन झालेल्या कट्टर इस्लामवादी ISIS (किंवा ISIL गट म्हणू या) आणि अल-कायदा चा भाग राहिलेले जमात-अल-नसरा तसेच जमात फतेह अल-शाम असल्या कट्टर पंथी गटांनी सीरियन नागरी युद्धात आपले पाय रोवले होते.

 

Mideast Islamic State Q&A
mei.edu

 

ह्यामधे आणखीन एक गट स्वतःच्या सामाजिक महत्वाकांक्षा घेऊन सीरियाच्या उत्तर भागात झटत होता – जो होता कुर्द लोकांचा. ज्यांचं पहिल्या महायुद्धानंतर तीन राष्ट्रांत विभाजन झालं होतं आणि ज्यांना स्वतःचा कुर्दीस्तान हवा होता. त्यांच्या विरोधात उभा ठाकला होता टर्की, ज्याचा ह्या गोष्टीला नेहमीच विरोध होता.

सर्वकाही स्वतःच्या महत्वाकांक्षा आणि सोयीसाठी सुरू झालं. आजही तसंच सुरू आहे.

 

syrian refugee
shark attack

 

रशिया आणि अमेरिका सारख्या प्रगत देशांनी स्वतःचं सामर्थ्य अन वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ह्या देशांचा, त्यांच्या धार्मिक अस्मितेचा पुरेपूर वापर केला. आजही करत आहेत. ह्यात भरडला जातोय तो सीरियाचा सामान्य समाज.

सामान्यांबद्दल आम्हांला किती कळवळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सर्व राजकारणी नेहमीच करत आलेत. पण ज्या ज्या वेळी सीरिया बद्दल काही निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळी रशिया आणि चीन ह्यांनी आपला नकाराधिकार वापरून हे सीरिया नावाचं घोंगडं भिजत ठेवण्याला प्राधान्य दिलं.

हा असला दुटप्पीपणा कदाचित त्यांच्या फायद्याचा असेलही. पण आजवर जो अत्याचार घडलाय, घडत आहे त्याला जबाबदार कोण ह्याचं उत्तर कधी मिळेल?

 

seria-inmarathi
images.jg-cdn.com

 

ज्यांनी जीव गमावले, त्यांना न्याय मिळायचा राहिलाच. पण जे जगत आहेत त्यांच्या जगण्याच्या हक्काचं कुणी बोलणार आहे का? की सगळे मूग गिळून “सीरिया मधे वाईट घडत आहे.” इतकं म्हणून शांतच बसणार आहेत?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?