स्वामी विवेकानंद: जगाला हिंदू धर्माची नव्याने ओळख करून देणारे दैदिप्यमान व्यक्तिमत्व!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

स्वामी विवेकानंद म्हणजे भारतीय इतिहासातील काही मोजक्या दैदिप्यमान पुरुषांपैकी एक! त्यांची जीवनगाथा इतकी प्रेरणादायी आहे की जीवनात सर्व काही गमावून बसलेल्या व्यक्तीला देखील त्यांच्या विचारधारेने जगण्याची नवसंजीवनी मिळावी. असे हे थोर रत्न भारताच्या नशिबी आले हे आपले सौभाग्यचं! त्यांच्या शिकवणीने तरुण पिढी आजही जागृत होते. आजही त्यांचे लाखो अनुयायी त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत आहेत. अश्या या महान विचारवंताच्या जीवनातील काही मोजक्या पण महत्त्वपूर्ण घटना आपण जाणून घेऊ या!

 

swamivivekananda-marathipizza01

स्रोत

स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी झाला. स्वामी विवेकांनद यांचा खरं नाव होतं नरेंद्र नाथ दत्त!

विवेकानंदांचा जन्म उच्चभ्रू घराण्यात झाला होता. पण याचा अर्थ हा नाही की त्यांनी गरिबी कधी अनुभवलीच नाही. जेव्हा त्यांच्या वडिलांचा मृत्य झाला, त्यानंतर त्यांच्या कुटुंबाची ग्रहदशा फिरली आणि त्यांना अतिशय हलाखीचं जीवन जगावं लागलं. पण विवेकानंद यांना या गोष्टीचं कधीही वाईट वाटलं नाही. उलट ते इतरांना सांगत की, “मी गरिबी अनुभवली याचा मला अभिमान आहे.”

स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे परमशिष्य होत. १० व्या शतकातील या महान संताच्या चरणी बसून स्वामी विवेकानंद यांना जगण्याची नवी दिशा मिळाली.

 

swamivivekananda-marathipizza02

 

स्रोत

त्यांना भारताचे राष्ट्रभक्त संत म्हणून ओळखले जायचे. कारण त्यांनी हिंदू धर्माची व्याख्या नव्याने जगासमोर मांडली आणि पाश्चिमात्य देशांमध्ये योग आणि वेदाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा नव्याने प्रसार केला.

स्वामी विवेकानंद हे आपल्या वकृत्वासाठी जगभर प्रसिद्ध होते. शिकागो मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक धर्म परिषदेमध्ये हजेरी लावत स्वामी विवेकानंद यांनी आपल्या शब्दांनी सर्वांवरच छाप पडली होती. भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवण्यात स्वामी विवेकानंद यांचा मोलाचा सहभाग आहे हे नाकारता येण्यासारखे नाही.

स्वामी विवेकांनद यांनी रामकृष्ण मिशन आणि कोलकाता मधील बेलूर मठाची स्थापना केली. या दोन गोष्टी स्थापन करण्यामागे त्यांचा एकच उद्देश होता तो म्हणजे- भारतातील गरिबांना मदत करणे आणि विश्वामध्ये हिंदू संस्कृतीची डंका वाजवणे.

swamivivekananda-marathipizza

स्रोत

त्यांचे अध्यात्मिक विचार इतके प्रभावशाली होते की त्याकाळी समस्त तरुण वर्ग हा त्यांनी दाखवलेल्या समाज उभारणीच्या आणि राष्ट्रहिताच्या कार्यासाठी प्रेरित झाला होता. खरतरं त्यांच्याच अध्यात्मिक विचारसरणीमुळे जगातील धर्माभिमुख देशांच्या यादीमध्ये भारताला स्थान मिळवून दिले.

स्वामी विवेकांनद यांना चहाविषयी प्रचंड प्रेम होते. ब्रिटीश वसाहतदारांनी भारतामध्ये चहावर बंदी घातल्यानंतरही त्यांनी आपल्या आश्रमामध्ये चहा सुरूच ठेवला होता.

swamivivekananda-marathipizza03

स्रोत

स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या अंतिम अस्थमा, टायफोईड, मायग्रेन, मलेरिया सारख्या विविध व्याधींनी ग्रासले होते आणि अखेर ४ जुलै १९०२ रोजी वयाच्या ३९ व्या वर्षी त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला.

स्वामी विवेकांनद यांच्या अतुल्य योगदानामुळे आणि तरुणांवरील त्यांच्या प्रभावामुळे त्यांचा जन्मदिवस हा भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो.

swamivivekananda-marathipizza04

स्रोत

स्वामी विवेकांनद नामक अश्या या युगपुरुषास विनम्र अभिवादन

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?