' विज्ञान आणि वैराग्याचा मिलाफ झाला तर..?! : स्वामी विवेकानंदांचं स्वप्न जमशेदजी टाटांनी पूर्ण केलं! – InMarathi

विज्ञान आणि वैराग्याचा मिलाफ झाला तर..?! : स्वामी विवेकानंदांचं स्वप्न जमशेदजी टाटांनी पूर्ण केलं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

स्वामी विवेकानंद ह्यांचे आयुष्य इतक्या परमोच्च साधनेने भरलेले होते की एखादा व्यक्ती त्यांच्याशी चर्चा करायचा तरी तो प्रभावित व्हायचा. स्वामीजींच्या अमोघ वाणी ऐकलेल्या प्रत्येक गोष्टींचा प्रभाव ऐकणाऱ्यावर असा पडायचा की तो त्या दिशेने कार्य करू लागायचा.

त्यांच्याशी संवाद साधून अनेक व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आले होते.

त्यांचा व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन अनेक लोकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले तर अनेक लोकांनी त्यांचं आयुष्य भक्ती मार्ग व राष्ट्र उभारणीसाठी वाहून दिले होते. अशीच एक व्यक्ती होती जमशेदजी टाटा, आजच्या भारतीय उद्योग जगताची पायाभरणी करणाऱ्या जमशेदजी टाटांवर स्वामी विवेकानंदांचा प्रभाव पडला होता.

३१ मे १८९३ ला, एक जहाज जपानच्या योकोहामा पासून कॅनडातील व्हॅनकुव्हरच्या दिशेने निघालं होतं. तेव्हा त्या जहाजावर दोन अश्या महान भारतीयांची भेट झाली ज्यांनी पुढे जाऊन इतिहास घडवला होता.

त्यांच्यातला एक खूप मोठा उद्योजक होता, ज्याचा जगभरात कारभार होता, जो पुढे जाऊन भारताचा औद्योगिक विकासाची पायाभरणी करणार होता, त्या व्यक्तीचे नाव होते जमशेदजी टाटा.

दुसरा व्यक्ती एक संन्यासी होता, जो भारताच्या संस्कृतीला पाश्चिमात्य जगासमोर मांडायला निघाला होता. त्या व्यक्तीच नाव होतं स्वामी विवेकानंद.

१८९३ साली जमशेदजी शिकागो येथे होणाऱ्या एका उद्योजगत समारोहासाठी निघाले होते. त्यासाठी ते जपान ला निवासाला होते. ते त्याच हॉटेल मध्ये थांबले होते ज्याठिकाणी विवेकानंद काही दिवसांसाठी येऊन थांबणार होते.

 

Tata-and-swami-inmarathi
vivawhatswhat.com

जपानमध्ये असलेल्या योकोहामा बंदरातून त्यांनी एकाच दिवशी कॅनडातील व्हॅनकुव्हरच्या दिशेने एस एस इम्प्रेस ऑफ इंडिया या जहाजातून प्रवास सुरु केला.

आधी जमशेदजी टाटा आणि स्वामी विवेकानंदाची भेट झाली होती. पण कधी मोकळ्या पणे चर्चा करायला वेळ भेटत नव्हता. पण जेव्हा ते जहाजावर एकमेकांना भेटले तेव्हा मात्र एकमेकांशी चर्चा करण्यासाठी बराच कालावधी भेटला होता.

विवेकानंदानी संन्यासी म्हणून जमशेदजी टाटा यांना त्यांचा भारत भ्रमणादरम्यान आलेल्या अनुभवांचे कथन केले.

त्यांनी ब्रिटिशांकडून भारतीयांच्या होणाऱ्या खच्चीकरणाबद्दल आपली भूमिका जमशेदजी टाटांसमोर मांडली. त्यांनी टाटा यांना त्यांचा ग्वानझाउ या चिनी प्रांताला दिलेल्या भेटीत मिळालेल्या बुद्धिस्ट ग्रंथातील संस्कृत आणि बंगाली रचनांची माहिती दिली.

त्यांनी पाश्चात्य समुदायाने आयोजित केलेल्या धर्म संसदेबद्दल देखील टाटा यांना माहिती दिली ज्यासाठी ते निघाले होते.

जमशेदजी टाटांसोबत त्यांची जपानच्या औद्योगिक विकासावर पण चर्चा झाली. जमशेदजीनि भारतात स्टील उद्योगाची पायाभरणी केली होती. त्यांनी विवेकानंदांना सांगितले की, ते नवीन तंत्रज्ञानाच्या शोधात आहे. त्यांचा मनात भारताचा औद्योगिक विकास घडवून आणण्याची संकल्पना आहे.

विवेकानंदांना ती कल्पना खूप आवडली. त्यांनी त्या कल्पनेबाबत प्रचंड उत्साह दाखवला.

त्यांनी सामान्य जणांच्या प्रगतीसाठी आणि उत्क्रांतीसाठी हा मार्ग योग्य आहे ही भावना योग्य आहे अशी भावना व्यक्त केली. त्यांनी जपान प्रमाणे भारतात देखील उद्योगांची पायाभरणी करण्याची मागणी जमशेदजी टाटांकडे केली. त्यामुळे गरीब भारतीयांना रोजी रोटी मिळेल असा भाव त्यांच्या मनात होता.

 

Tata-and-swami-inmarathi01
gajabkhabar.com

विवेकानंदांच्या विज्ञानविषयक विचारांनी आणि खोलवर रुजलेल्या देशभक्तीने टाटा प्रभावित झाले होते. त्यांनी ह्या कामासाठी विवेकानंदांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. तेव्हा स्मितहास्य करून विवेकानंदानी आशीर्वाद दिला.

विवेकानंद त्यांना म्हटले,

“हे किती मनमोहक असेल, जेव्हा पाश्चिमात्य विज्ञानाची व तंत्रज्ञानाची भारताच्या संस्कृतीसोबत व मानवतेच्या विचारांसोबत सांगड घातली जाईल.”

त्यानंतर कधी विवेकानंद आणि जमशेदजी टाटा यांची भेट झाली नाही. परंतु विवेकानंदांचे शब्द टाटा यांच्या मनाला भिडले. काही वर्षांनी त्यांनी विवेकानंदांना पत्र लिहले. त्यात त्यांनी स्वामीजींनी त्यांना सांगितलेल्या कल्पनेची पुनरावृत्ती केली होती.

त्यांनी स्वामीजीच्या भारतात सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापनेच्या कल्पनेवर अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया दिली.

त्यांना त्या दिवशी बोटीवर झालेल्या संवादाने प्रचंड प्रभावित केल्याचे देखील त्यांनी स्वामीजींना कळवले. त्यांना स्वामीजींनी मांडलेल्या भारतीय संस्कृतीच्या व पाश्चात्त्य तत्वज्ञानाच्या सांगडीचा विचाराने प्रभावित केलं आहे असं देखील त्यांनी सांगितलं.

त्यांना भारत भूमीच्या विकासासाठी इथल्या तत्वांची सांगड पाश्चात्य तत्वांसोबत घालायची इच्छा देखील बोलून दाखवली.

 

Tata-and-swami-inmarathi02
thebetterindia.com

यासाठीचे प्रयत्न म्हणून त्यांनी म्हैसूरच्या राजाकडून ३७२ एकर जमिन बंगळुरू मध्ये घेतली. त्याठिकाणी भारतीय प्रतिभेला साजेशा एखाद्या रिसर्च इन्स्टिट्यूटच्या निर्मितिचा ध्यास त्यांनी घेतला होता. त्यांनी अमेरिकन व ब्रिटिश मिशनरीवर टीका केली की ते फक्त धर्मप्रसार करतात, नवीन संकल्पना, विज्ञान व तंत्रज्ञान देशात रुजू देत नाही.

त्यामुळे त्यांनी अमेरिकेतुन तशी शिकवण देणारे खास प्रशिक्षित शिक्षक भारतात आणून इन्स्टिट्यूट उघडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी तशी कल्पना मांडली.

पुढे १८९८ विवेकानंदांचे निधन झाले आणि दोन वर्षांनी टाटांचे निधन झाले परंतु त्यांनी मांडलेल्या संकल्पनेतून १९०९ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससची स्थापना झाली. पुढे याचे नामकरण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स करण्यात आले. पुढे जाऊन ते जगातील प्रमुख रिसर्च इन्स्टिट्यूट पैकी एक गणले गेले.

यातूनच पुढे १९३० साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस व १९४० साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची निर्मिती करण्यात आली. याने भारतात उच्च शिक्षणाची गंगा आली .

हे सर्व होऊ शकलं कारण विवेकानंद व जमशेदजी टाटा यांच्या दरम्यान त्या बोटीवर संवाद घडला. त्या संवादातून एका नव्या भारताच्या स्वर्ण आध्यायाची सुरुवात झाली.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?