‘किडनी ला धर्म नसतो’ – सुषमाजींचं awesome उत्तर!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज हळूहळू सोशलमिडीयावर लोकप्रिय बनत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी शेकडोंना मदत केली आहे, देशवासियांशी संवाद साधला आहे. परंतु सध्या त्यांचे चाहते चिंतेंत आहेत. १५ नोव्हेंबर रोजी सुषमाजींनी ट्विटर माहिती दिली की त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे.

जेव्हापासून त्या इस्पितळात दाखल झाल्या आहेत, तेव्हापासून त्यांचे fans चिंताग्रस्त होते. अनेकांनी त्याच tweet ला प्रतिसाद देत प्रार्थना, सदिच्छा व्यक्त केल्या.

सुदैवाने, सुषमाजी बऱ्या होत आहेत आणि लवकरच इस्पितळातून डिस्चार्ज देखील मिळवतील अशी आशा आहे.


परंतु हे कळेपर्यंत ट्विटरवर काहींनी स्वतःची किडनी देखील देऊ केली. ज्यात काही विचित्र tweets होत्या.

एकाने स्वतःला “मुस्लीम हिंदुस्तानी” म्हणवून घेतलं :

दुसऱ्याने “BSP सपोर्टर आणि मुस्लीम” असल्याचं सांगितलं…

तिसऱ्याने “…पण मी मुस्लीम आहे”…असं म्हटलं.

तिघांच्याही भावना चांगल्याच होत्या/आहेत, पण जरा विचित्र प्रकारे व्यक्त झाल्यात.

ह्या सर्वांना सुशमाजींनी, आपल्या खास शैलीत उत्तर देतं म्हटलंय –

 

धन्यवाद भावांनो. मला खात्री आहे, किडन्यांना धार्मिक लेबलं नसतात.

नको त्या गोष्टीत धर्म खुपसणाऱ्या विचित्र tweets ला अतिशय उत्तम उत्तर सुशमाजींनी दिलयं. तसंच, अश्या अवस्थेतदेखील सुषमाजींनी आपल्या बुद्धीची धार कायम ठेवली आहे, हे कौतुकास्पद (आणि दिलासादायक देखील!) आहे!

गेट वेल सून सुषमा जी !

फिचर्ड इमेज स्रोत

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 234 posts and counting.See all posts by omkar

One thought on “‘किडनी ला धर्म नसतो’ – सुषमाजींचं awesome उत्तर!

  • November 21, 2016 at 3:00 pm
    Permalink

    Complicated message conveyed in Informative and simple manner!

    Cheer up Onkar!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *