सूर्याचं मंदिर, जिथे सुर्याचीच पूजा करण्यास मनाई आहे!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारतात तीन महत्वाची सूर्य मंदिर आहेत, पहिलं ओडीसा येथील कोणार्क मंदिर, दुसरं जम्मू येथील मार्तंड मंदिर आणि तिसरं म्हणजे गुजरातच्या मोढेरा येथील सूर्य मंदिर. या सूर्य मंदिराचे स्वतःचे एक ऐतिहासिक महत्व देखील आहे.

 

modhera_sun_temple-inmarathi
jagran.com

गुजरात राज्यातील पाटना येथून दक्षिण दिशेने ३० किलोमीटरच्या अंतरावर वसलेले मोढेरा हे गावं येथील पुष्पावती नदीच्या तीरावर असलेल्या सूर्य मंदिराकरिता जगप्रसिद्ध आहे. हे सूर्य मंदिर विलक्षण वास्तुकला आणि शिल्पकलेच एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या मंदिराच्या बांधकामात कुठेही चुन्याचा उपयोग केलेला आढळत नाही. इराणी शैलीचा वापर करून बनविण्यात आलेल्या या मंदिराला सोलंकी वंशाच्या राजा भीमदेव पहिला यांनी इ.स. १०२६ मध्ये बनविले होते.

 

modhera_sun_temple-inmarathi04
discoverindiabyroad.blogspot.in

हे मंदिर दोन भागांत बनविण्यात आले होते. ज्यात पहिला भाग गर्भगृहाचा तर दुसरा सभामंडपाचा होता. गर्भगृहाची आतील लांबी ही ५१ फुट,९ इंच आणि रुंदी २५ फुट, ८ इंच आहे.

 

modhera_sun_temple-inmarathi02
wikimapia.org

तर मंडपाच्या सभामंडपात ५२ स्तंभ आहेत. या स्तंभांवर वेगवेगळ्या देवी-देवतांचे चित्र आहेत, त्याव्यतिरिक्त रामायण आणि महाभारतातील प्रसंगांना देखील उत्कृष्ट कारीगिरी करून दर्शविण्यात आले आहे.या स्तंभांना खालच्या दिशने बघितल्यास ते अष्टकोनी दिसतात तर वरच्या बाजूने बघितल्यास ते गोलाकार दिसतात. या मंदिराला या पद्धतीने बनविण्यात आले होते की, सूर्योदय झाल्यावर सूर्याची पहिली किरण ही गर्भगृहाला प्रकाशमान करेल. सभामंडपाच्या समोर एक विशाल कुंड आहे जे सूर्यकुंड किंवा रामकुंडया नावाने प्रसिद्ध आहे.

 

modhera_sun_temple-inmarathi06
wikimapia.org

सोलंकी राजा सुर्ववंशी होते आणि ते सूर्य देवाला कुलदेवता म्हणून पुजत असत. म्हणून त्यांनी त्यांच्या आराध्य देवाच्या पूजेसाठी या भव्य सूर्य मंदिर निर्माण करण्याचा विचार केला आणि त्यातून मोढेराचे हे सूर्य मंदिर साकारण्यात आले.

 

Sultan-Allahudeen-inmarathi
wikipedia.org

पण, परकीय आक्रमणकर्त्यांच्या आक्रमणानंतर, अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाने मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यांनी मंदिरातील मुर्त्या देखील तोडल्या, म्हणून आता या मंदिरात पूजा करणे निषिद्ध आहे. अल्लाउद्दिन खिलजीच्या आक्रमणाने या मंदिराला खंडित केले असे मानल्या जाते. सध्या हे मंदिर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली आहे.

 

modhera_sun_temple-inmarathi05
wikipedia.org

या सूर्य मंदिराचा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये देखील करण्यात आला आहे. जसे स्कंद पुराण आणि ब्रह्म पुराण, ज्यात सांगितल्या गेले आहे की, प्राचीन काळात मोढेराच्या आसपासचे संपूर्ण क्षेत्र हे धर्मरण्य नावाने ओळखल्या जायचं. पौराणिक कथांनुसार हे देखील सांगितल्या गेले आह की, जेव्हा भगवान श्री राम यांनी रावणाचा वध केल्यानंतर त्यांचे गुरु वशिष्ठ यांना एक असे स्थान विचारले जिथे जाऊन ते आत्मशुद्धी करू शकतील आणि ब्रह्म हत्येच्या पापातून मुक्ती मिळवू शकतील, तेव्हा वशिष्ठ मुनींनी त्यांना येथे येण्याचे सुचवले होते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

One thought on “सूर्याचं मंदिर, जिथे सुर्याचीच पूजा करण्यास मनाई आहे!

  • June 13, 2019 at 8:55 am
    Permalink

    नारायण चिंचोली येथेही सूर्यमंदिर आहे

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?