' तुमच्या जीवनातील सर्वात महत्वाचा दिवस अविस्मरणीय करणारं, महाराष्ट्रातील हे ठिकाण तुम्हाला माहितीये का?! – InMarathi

तुमच्या जीवनातील सर्वात महत्वाचा दिवस अविस्मरणीय करणारं, महाराष्ट्रातील हे ठिकाण तुम्हाला माहितीये का?!

लग्नसोहळा म्हणजे दोन मनांचं मिलन तर आहेच, पण सोबतच या आधुनिक युगात लग्न म्हटलं की ओघानेच आली कामाची मोठी यादी आणि स्वप्नांच्या कॅनव्हासवर रंगवली जाणारी चित्रे..! त्यात डेस्टीनेशन वेडिंग म्हटलं की खूपच काम! हा डेस्टीनेशन वेडिंग प्रकार तसा नवा आणि नव्या पिढीच्या मनाला अगदीच भावलेला, त्यामुळे नव्या पिढीतील प्रत्येक जोडप्याच्या मनात एक स्तुत इच्छा असतेच की आपलं लग्न म्हणजे एक अविस्मरणीय डेस्टीनेशन वेडिंग असावं. डेस्टीनेशन वेडिंग मधील सगळ्यात पहिलं पाउल म्हणजे- लग्न सोहळ्याची थीम ठरवणे, इथून सुरुवात झाली की दुसरं पाउल असतं व्हेन्यूची सजावट ठरवणे त्यानंतर पुन्हा अतिथींचा विशेष पाहुणचार तर दुर्लक्षित न करता येण्याजोगी गोष्ट! एकीकडे ही सगळी तयारी सुरु असताना आपला विवाहसोहळा हा न भूती न भविष्यति असावा अशी देखील वधू-वराची इच्छा असते.

 

Beginning of Tanvi's special journey captured beautifully at the AmphitheatreLR

 

तर मंडळी, तुम्हाला देखील या सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे एका ठिकाणी जुळवून आणून, तुमचा विवाह सोहळा म्हणजे एक फेअरी-टेल वेडिंग स्टोरी बनवायची असेल, तर आम्ही खात्रीशीर सांगतो की सुला विनयार्ड्स हा एक सर्वोत्तम पर्याय आहे!

सुला विनयार्ड्स म्हणजे एक असे सर्वोत्तम ठिकाण आहे जे एखाद्या परीकथेत दाखवतात त्याप्रमाणे डोंगर-टेकड्यांनी वेढलेले आणि विनयार्ड्स मध्येच वसलेले अॅम्फीथिएटर आहे. विशेष गोष्ट म्हणजे येथून प्रसिद्ध गंगापूर धरणाचा रमणीय देखावा देखील आपल्या डोळ्यांना सुखावतो.

अगदी “बिग-फॅट इंडिअन वेडिंग” असो किंवा एखादा साधा-सुंदर सप्तपदी सोहळा असो सुलाचे अॅम्फीथिएटर ह्या सर्व थीम्स करता अत्यंत परिपूर्ण असेच ठिकाण आहे.

A wedding so colourful, the guests will never stop bragging about itLR

तुम्ही धमाल बॅचलर पार्टी करा किंवा लग्नाचं रिसेप्शन ठेवा, सुला विनयार्ड यांपैकी तुमचा कुठलाही सोहळा सुंदर सादरीकरणासह अविस्मरणीय करेल यात शंकाच नाही. मंडळी तुमचा विश्वास बसणार नाही पण सुलाच्या निसर्गरम्य परिसरातील वाईन द्राक्षांचे विनयार्ड्स कुठल्याही प्री किंवा पोस्ट वेडिंग शूट करता एक परफेक्ट चॉईस आहेत. सुलाच्या विनयार्ड टूर आणि वाईन टेस्टिंग सोबत तुम्ही आणि तुमची मित्र मंडळी तुमची बॅचलर पार्टी अगदी धमाल एन्जॉय करू शकता.

ग्रीक पद्धतीने बनवलेल्या अर्ध वर्तुळाकार बैठकीच्या मध्यभागी असलेले स्टेज, कुठल्याही संगीत सोहळ्याची शान वाढवण्यास पुरेसे आहेच.

हिरव्यागार निसर्गाची देणगी लाभलेला असा व्हेन्यू तुम्हाला क्वचितच पाहायला मिळेल. याच वैशिष्ट्यामुळे हा व्हेन्यू आपल्या कार्यक्रमांकरता एक सुंदर बॅकड्रॉप तर आहेच, त्यासोबत त्यांना ग्लॅमरस लूक देखील देतो. तुम्ही इथे तुम्हाला हवी तशी फॅन्सी सजावट करा किंवा अगदी काहीही नं करता या चित्तवेधक व्हेन्यूलाच सजावट माना! दोन्हीही पर्यायांमध्ये येणारे नातेवाईक आणि मित्रमंडळी तुमची वाहवा केल्याशिवाय राहणार नाहीत..!

4LR

 

सुलामध्ये आपला लग्न सोहळा प्लॅन करण्याचा आणखी एक फायदा आहे बरं का! तुमचा लग्न सोहळा साजरा करण्यासोबतच तुम्ही नकळतपणे इथे तुमच्या पाहुण्यांना एक छोटासा रमणीय हॉलीडे देखील गिफ्ट करता! सुलाची दोन रमणीय रिसॉर्टस् बियॉंड आणि द सोर्स आपल्या पाहुण्यांच्या सेवेकरता सदैव सज्ज आहेत. गंगापूर धरणाच्या सान्निध्यात वसलेले बियॉंड आपल्याला निसर्गाच्या कुशीत अगदी सुखावून टाकते आणि येथील स्काय व्हिला आणि सात लक्झरिअस रूम्स आपल्याला रीलॅक्स व्हायला मदत करतात.

सुलामध्ये नुकतेच सुरु झालेले रिसॉर्ट, द सोर्स हे भारतातले पहिले वायनरी रिसॉर्ट आहे हे विशेष! जगप्रसिद्ध टस्कन शैलीच्या डिझाईनने नटलेले हे रिसॉर्ट विनयार्ड्समध्ये असून आपल्या डोळ्यांना आणि मनाला भुरळ पाडल्याशिवाय राहत नाही. सोबतच येथील १९ लक्झरी रूम्स, चार ट्री हाऊसेस आणि एक टॉवर स्वीट आपल्याला विनयार्ड्समध्ये राहण्याचा न अनुभवलेला अनुभव देऊन जाईल. येथून दिसणारे विनयार्ड्स, गंगापूर धरणाचे पाणी आणि डोंगरांनी वेढलेला परिसर पाहतांना स्वर्ग म्हणजे नक्की काय, याचा प्रत्यय तुम्हाला आवर्जून येईल. येथे आल्यावर येथील विनयार्ड्स आणि हिरव्या गालिचाने सजलेला निसर्ग पाहून प्रफुल्लीत झालेला तुमचे पाहुणे अवती-भवती भिरभिरणाऱ्या पक्षी आणि फुलपाखरांना पाहून तर खूपच खुश होतील, याची खात्री आहेच.

Amphitheatre all geared up for a pleasant morning weddingLR

सुलाची टीम तुम्हाला फोटोग्राफर्स, डेकोरेटर्स आदी इव्हेंट करता लागणाऱ्या व्यवस्थांची देखील सेवा प्रदान करते. त्याकरिता तुम्हाला कुठेही फिरावे लागत नाही. सुलाफेस्ट सारखा जगप्रसिद्ध महोत्सव जी टीम आयोजित करते तीच टीम तुमचे लग्न सुद्धा हातोहात कोणत्याही अडचणीशिवाय सुंदरपणे सांभाळेल याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा.

जर तुमच्या नातेवाईक वा मित्रमंडळींमध्ये कोणी अस्सल खवय्ये असतील तर त्यांना देखील खुश करण्याची सोय इथे आहे. अस्सल खवय्यांकरिता विविध कुझीन्सच्या मेंन्युंची मोठी यादी यांच्याकडे उपलब्ध आहे. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या मेन्युंची यादी तुमच्या आवडीप्रमाणे कस्टमाइज देखील करू शकता. ह्या सगळ्यात बजेट कोलमडून पडेल असं वाटतंय? फिकर नॉट! तुमची डेस्टिनेशन वेडिंग अगदी तीन लाखाच्या बजेटपासून होऊ शकते.

A fairy lights entrance for a fairytale weddingLR

अॅम्फीथिएटर मध्येच जगप्रसिद्ध सुलाफेस्ट साजरा होतो आणि दर वर्षी हजारो संगीत प्रेमी आणि खवय्ये इथे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या विकएंडला भेट देतात. ह्या अॅम्फीथिएटरमध्ये, न्यू इअर इव्ह देखील श्रवणीय संगीत आणि खाद्यपदार्थांच्या रेलचेलीत साजरी केली जाऊ शकते.

सुलामध्ये कॉर्पोरेट इव्हेंट्स देखील होस्ट केले जातात. कॉर्पोरेट्सना इथली टीम्स कंपनी ब्रॅंड आणि इम्प्लॉयी किंवा क्लायंट रिलेशनशिप बिल्ड करण्यासाठी आवश्यक इव्हेंट्स ऑर्गनाईज करण्यासाठी सर्व प्रकारे मदत करतात.

IMG_7939LR

 

तर मंडळी आता जास्त वेळ दवडू नका आणि तुमच्या मनाजोगता कोणताही इव्हेंट प्लान करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी अमित कुलकर्णी यांच्याशी ९९७०० ९००१९ या नंबरवर वैयक्तिक संपर्क साधा किंवा त्यांना amit.kulkarni@sulawines.com या इमेल आयडीवर मेल करा आणि अगदी निश्चिंत होऊन सज्ज व्हा एका अविस्मरणीय सोहळ्यासाठी…!

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?