' पुरुषी वर्चस्वाला झुगारून देणाऱ्या ५ कर्तृत्ववान स्त्रिया! – InMarathi

पुरुषी वर्चस्वाला झुगारून देणाऱ्या ५ कर्तृत्ववान स्त्रिया!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

स्त्री ही कधी काय करेल, याचा नेम कधीही लावल्या जाऊ शकत नाही. ती जेवढी प्रेमळ आहे, तेवढीच आपल्या ध्येयासाठी झटणारी देखील आहे. तिने एकदा ठरवले की तिला काही तरी करुन दाखवायचे आहे, तर ती ते करून दाखवणारच. जगामध्ये अश्या कितीतरी स्त्रिया आहेत, ज्यांनी स्वकर्तुत्वावर आपली स्वप्न पूर्ण केली आहेत. त्यामुळे स्त्रियांना कधीही कमी आखू नये. राजकारण, समाजकारण आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये त्यांनी नाविन्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांच्या यशाचे कौतुक सगळीकडेच केले जाते. आज आपण अश्याच काही स्त्रियांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर जग जिंकले.

चला तर जाणून घेऊया अश्या काही स्त्रियांबद्दल ज्यांनी पुरुषी समजल्या जाणाऱ्या क्षेत्रांमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं…

1. मॅरिसा मेयर : सीईओ याहू

successful Womens.inmarathi
thechronicleherald.ca

– मॅरिस 2012 मध्‍ये याहूच्या सीईओ बनल्या. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.
– मॅरिस यांनी यापूर्वी गुगलमध्‍ये काम केलेले आहे. गुगल मॅप्स, गुगल अर्थ यासह अनेक प्रकल्पात त्या सहभागी होत्या.
– 2014 साली फॉर्च्युन अंडर 40 च्या यादीत त्या ६ व्या क्रमांकावर होत्या.
– इतकेच नाही तर 2015 मध्‍ये फोर्ब्सने त्यांची जगातील 22 वी सर्वात शक्त‍िशाली महिला म्हणून निवड केली होती.
– गेल्या 5 वर्षांत मॅरिसचा पगार 117 मिलियन डॉलर म्हणजे 746 कोटी 81 लाख झाला आहे.

2. केटी जॅकॉब स्टेनटॉन : माजी उपाध्‍यक्ष, ट्विटर

successful Womens.inmarathi1
twimg.com

– केटी जॅकॉब स्टेनस्टॉन 2010 ते जानेवारी 2016 पर्यंत ट्विटरच्या उपाध्‍यक्ष होत्या.
– या व्यतिरिक्त वर्ष 2010 मध्‍ये केटी या अमेरिकेच्या संरक्षण विभागात इनोव्हेशनच्या विशेष सल्लागार होत्या.
– स्टेनटॉनने गुगल आणि याहूमध्‍येही काम केले आहे.
– गुगलमध्‍ये त्या गुगल मॉडरेटर प्रोजेक्टवर काम करत होत्या.
– फोर्ब्सच्या 100 सर्वात शक्त‍िशाली महिलांच्या यादीत कॅटी 60 व्या क्रमांकावर होत्या.
– स्टेनटॉनने कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.

3. शेरील सँडबर्ग : सीओओ फेसबुक

Successful womens.inmarathi2
thedailybeast.com

– शेरील सँडबर्गला 2008 मध्‍ये फेसबुकच्या चीफ ऑपरेट ऑफीसर बनल्या.
– यापूर्वी शेरील यांनी गुगलच्या ग्लोबल सेल्स टीमच्या उपाध्‍यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
– शेरील यांनी गुगलच्या गुगल डॉट ओरजी प्रोजेक्टमध्‍ये महत्त्वाची भूमिका पार पाडली.
– 2012 मध्‍ये शेरील यांचा टाईम्स मासिकाच्या शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत समावेश झाला होता.
– या व्यतिरिक्त 2015 मध्‍ये फोर्ब्सच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत त्या ८ व्या क्रमांकावर होत्या.

4. इंद्रा नुयी : सीईओ पेप्सिको

successful Womens.inmarathi3
mshcdn.com

– पेप्सिकोच्या भारतीय वंशाच्या सीईओ इंदिरा नुयी यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक रिसेप्शनिस्ट म्हणून केली होती.
– इंदिरा नुयीने मद्रास ख्रिश्‍चन कॉलेजमधून विज्ञानशाखेची पदवी घेतली आणि आयआयएम कोलकातामधून एमबीए केले.
– पेप्सिकोत काम करण्‍यापूर्वी 1994 पर्यंत इंदिरा नुयी या मोटोरोलामध्‍ये कॉर्पोरेट स्ट्रॅटजीच्या उपाध्‍यक्ष होत्या.
– 2001 मध्‍ये इंदिरा नुयी कंपनीच्या सीईओ बनल्या.
– नुयींची एकूण मालमत्ता 1 हजार 279 कोटी रुपये असून त्या टॉप सीईओंच्या यादीत 19 व्या स्थानी आहे.
– वर्ष 2015 मध्‍ये फोर्ब्सने सर्वाधिक शक्तिशाली महिलांच्या यादीत त्यांचा 15 व्या स्थानी समावेश केला होता.
– वर्ष 2014 मध्‍ये फॉर्च्युनच्या सर्वाधिक शक्तिशाली महिलांच्या यादीत इंद्रा नुयी या ४ थ्‍या क्रमांकावर होत्या.

5. स्वाती भार्गव : कॅशबॅक साइट कॅशकरोच्या ओनर

successful Womens.inmarathi4
yourstory.com

– कॅशबॅक साइट कॅशकरो डॉट कॉमच्या संस्थापक स्वाती भार्गवने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून गणित आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.
– पदवीचे शिक्षण घेत असताना स्वातीने गोल्डमॅन सॅक्समध्‍ये उन्हाळ्यात इंटर्नशिप जॉइन केले. या इंटर्नशिपच्या काळात कंपनीने तिला नोकरीची संधी दिली.
– 2011 मध्‍ये तिने आपल्या पतीसह स्वत: ची पहिली वेबसाइट पोरिंग पाउंड्स सुरु केली.
– आपल्या वेबसाइटच्या यशानंतर 2013 मध्‍ये भारतात तिने कॅशबॅक वेबसाइट कॅशकरो डॉट कॉम सुरु केली.
– 30 मिलियन डॉलरच्या महसूलासह कॅशकरो सर्व प्रकारच्या सूट, ऑफर्स,  वाउचर्स देणारी सर्वात मोठी वेबसाइट बनली आहे.

अश्या ह्या आणि ह्यांच्यासारख्या इतर अनेक स्त्रियांनी स्वबळावर व्यावसायिक क्षेत्रांत आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे, जे खरच वाखाणण्याजोगे आहे.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?