…आणि तिने गगनभरारी घेण्याचे स्वप्न पूर्ण करून दाखवले!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

या जगावर केवळ पुरुषी वर्चस्व आहे, असे आपण समजायचो आणि मानायचो देखील. पण अलीकडच्या काळात पुरुष आणि महिला या दोघांच्याही याविषयीचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. महिलांनी घरच्या चार भिंतींबाहेर पाउल तर टाकलेच पण त्यासोबतच त्यांनी घराच्या आर्थिक जबाबदाऱ्यांमध्ये योगदान देण्यास सुरुवात केली आहे. तसेच आज त्या देशाच्या सुरक्षा यंत्रणेत देखील मोलाची कामगिरी बजावत आहेत.

आधुनिकीकरणामुळे एका स्त्रीची खरी ताकद आज जगाला बघायला मिळते आहे.

 

avni-chaturvedi-inmarathi02
bhaskar.com

कर्तृत्ववान स्त्रियांच्या भल्यामोठ्या यादीत आणखी एका स्त्रीचा समावेश झाला आहे. जिच्यावर कालपासून कौतुकाचा वर्षाव सोशल मिडीयावर होतो आहे. होय, आम्ही आपली पहिली महिला वैमानिक अवनी चतुर्वेदी हिच्याबद्दलच बोलत आहोत.

 

avni-chaturvedi-inmarathi03
indiatoday.in

अवनी चतुर्वेदी ही फाईटर जेट एकटीने उडविणारी पहिली भारतीय महिला वैमानिक बनली आहे. तिने मिळविलेल्या या यशामुळे आज तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. काल अवनीने एकटीने ‘मिग-२१ बायसन’ हे लढाऊ विमान उडवले. ही कामगिरी करून ती फायटर एयरक्राफ्ट उडविणारी पहिली भारतीय महिला वैमानिक बनली आणि तिने इतिसाहत आपले नाव नोंदवले आहे.

 

avni-chaturvedi-inmarathi00
ibtimes.co.in

यासाठी तिने गुजरातच्या जामनगर एयर बेस वरून उड्डाण केले आणि पहिल्या संधीतच तिने हा कारनामा करून दाखवला.

एक यशस्वी फायटर वैमानिक म्हणून स्वतःला सिध्द केल्यानंतर आता अवनी युद्ध स्थितीत सुखोई सारखे विमान देखील उडवू शकते.

 

avni-chaturvedi-inmarathi05
azabgazab.com

मध्य प्रदेशच्या शहडोलची येथील अवनी चतुर्वेदीचा जन्म २७ ऑक्टोबर १९९३ रोजी दिनकर चतुर्वेदी ह्यांच्या घरी झाला. तिने तिचे प्राथमिक शिक्षण आपल्या गावीच पूर्ण केलं. १० वी आणि १२ ह्या दोन्ही बोर्डाच्या परीक्षांत अवनी आपल्या शाळेतून पहिली आली होती. यानंतर राजस्थानच्या वनस्थली विद्यापीठातून त्यांनी बीटेक पर्यंतचे शिक्षण घेतले.

जून २०१६ मध्ये भारतीय वायूदलात ज्या तीन महिला वैमानिकांचा समावेश झाला. त्यापैकीच अवनी एक होती.

त्याआधीपर्यंत भारतीय वायुसेनेत महिलांना फायटर विमान चालविण्याची परवानगी नव्हती. निवडीनंतर पहिल्यांदाच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एअरफोर्समध्ये जाण्याच्या निर्णयाबाबत खुलासा केला. अवनी सोबत ऑफिसर भावना कांत आणि ऑफिसर मोहना सिंह ह्यांची निवड करण्यात आली होती.

 

avni-chaturvedi-inmarathi01
business-standard.com

निवड झाल्याच्या एका वर्षापर्यंत ह्या तिघींनाही फायटर पायलट म्हणजेच लढाऊ वैमानिकाचे प्रशिक्षण देण्यात आले.

अवनीने गुजरातच्या जामनगरमधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने ‘मिग-21 बायसन’ या फायटर प्लेनसह आकाशात झेप घेतली.

यापूर्वी देखील अवनी महिला फायटर प्लेन चालवत असे. मात्र, त्यावेळी तिच्या मदतीला नेहेमी पुरुष कर्मचारी असायाचे. पण १९ फेब्रुवारी रोजी ‘मिग-21 बायसन’ हे विमान तिने एकटीने चालवल्याने तिने हा नवा इतिहास रचला आहे.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार अवनीच्या नंतरच्या बॅच साठी देखील वायुसेनेने तीन आणखी महिला वैमानिकांची फायटर विमान उडविण्याच्या ट्रेनिंगसाठी निवड केली आहे.

 

avni-chaturvedi-inmarathi06
oneindia.com

 

“अवनी लहानपणीपासूनच अतिशय शांत स्वभावाची आहे. तिला शिस्तीत राहायला आवडते. पण मला कधीही असे वाटले नव्हते की तिला वैमानिक व्हायचे आहे.”

असे तिचे वडील दिनकर चतुर्वेदी सांगतात.

अवनीचे वडील म्हणजेच दिनकर चतुर्वेदी हे देखील स्वतः एक इंजिनीअर आहेत. त्यांची आई गृहिणी आहे. तर मोठा भाऊ हा भारतीय सेनेत रुजू आहे.

पण भाऊ सेनेत असल्याने तिने एका सैनिकाचे जीवन जवळून अनुभवले आहे, तेव्हापासूनच तिच्यात देशभक्ती जागृत झाली असावी. कल्पना चावला ह्या तिच्यासाठी सर्वात मोठे प्रेरणास्त्रोत ठरल्या. २००३ साली जेव्हा कल्पना चावला ह्यांच्या अंतराळ यानाचा अपघात होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा अवनी खूप दुःखी झाली. पुढे चालून यालाच तिने आपल्या जीवनाचे प्रेरणास्त्रोत बनवले.

 

avni-chaturvedi-inmarathi04
bbc.com

याबद्दल ती सांगते की,

“मी तिसरीत असताना टीव्हीवर कल्पना चावलांचं स्पेसशिप क्रॅश झाल्याने त्यांची मृत्यू झाल्याची बातमी पाहिली. या बातमीमुळे माझी आई खूप अस्वस्थ झाली होती. ती टीव्हीसमोर बसून सतत रडत होती. त्यावेळी मी तिच्याजवळ गेले आणि तिला सांगितले की, मी पुढची कल्पना चावला बनेन.”

आणि आईला दिलेले हे वचन तिने पूर्णत्वास आणून दाखवले.

 

avni-chaturvedi-inmarathi07
femina.in

इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यावर अवनीने एयरफोर्सच्या टेक्निकल सर्विसमध्ये रुजू होण्यासाठी परीक्षा दिली. ती परीक्षा उत्तीर्णही झाली. ह्यासाठी तिने कठोर परिश्रम घेतले होते. त्यानंतर ती फायटर पायलट बनली. पण जर तिला वायुदलात ग्राउंड जॉब मिळाला असता तर तिने तत्काळ राजीनामा दिला असता असेही एका मुलाखतीत तिने सांगितले. कारण तिचे ध्येय हे आकाशात झेप घेण्याचे होते.

आणि तिने तिचे हे ध्येय पूर्ण करून दाखवले. जसे अवनीसाठी कल्पना चावला ह्या प्रेरणास्थान ठरल्या तश्याच आज भारतीय महिलांसाठी अवनी चतुर्वेदी ही एक प्रेरणास्थान बनली आहे.

भारताच्या ह्या साहसी कन्येला आमचा सलाम!!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?