भारताच्या “पोखरण” यशाचं, ह्या भारतीय नेत्यांना दुःख झालं होतं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

१३ मे १९९८ ला अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भारतानेे राजस्थानच्या पोखरण येथे दुसरी अणु चाचणी केली. या दिनाला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरे करण्यात येते. ‘पोखरण २’ चे टोपणनाव होते ‘ऑपरेशन शक्ती’, जो पाच डेटोनेशन्सने बनलेला होता आणि बाकी चार फ्युजन डिव्हाईस होते.

या चाचणी बरोबरच भारत जगातील सहावी आण्विक शक्ती बनला होता. ही भारतीय वैज्ञानिकांची खूप मोठी कामगिरी होती आणि यामुळे भारताची सुरक्षितता काहीपटीने वाढली होती.

या चाचणीबरोबरच अनेक देशांनी भारतावर आर्थिक निर्बंध लादले, अनेक देशांनी याची निंदा केली. डाव्या विचारसरणीच्या भारतीय मीडियाने याविरोधात बातम्या दिल्या.

भारताच्या या यशाला मीडियाने अक्षरशः नावं ठेवली, एवढंच काय तर देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्वपुर्ण असलेल्या या चाचणीचा निषेध नोंदवला!

 

pokhran 2-inmarathi
indiatoday.in

अणूबॉम्ब ला “हिंदू बॉम्ब” ही उपाधी भारताच्या मिडियाकडून देण्यात आली. पश्चिम बंगालचे कम्युनिस्ट मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी या चाचणीला “उग्र राष्ट्रवाद” ही उपमा दिली.

एवढ्यावरच न थांबता त्यांनी याला “विखार” देखील म्हटले होते. सोनिया गांधी यांनी देखील अणू चाचणीचा निषेध केला होता. त्यांनी म्हटले होते की खरी ताकद शांतीत आहे, शक्तीप्रदर्शनात नाही.

द हिंदूंचे चेअरमन एन. राम यांनी म्हटले,

“अणूचाचणी घेणं आणि भारताला अण्वस्त्रसज्ज घोषित करणं हे मूर्खपणाचं आहे, वाघाच्या पाठीवर स्वारी करण्यासारखं ते आहे”

वादग्रस्त पत्रकार सागरिका घोस यांनी सर्वात वर मजल मारत भारताचे तत्कालीन राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ ऐ पी जे अब्दुल कलाम यांना “बॉम्ब डॅडी” अशी घृणास्पद उपमा दिली होती कारण अब्दुल कलामांनी DRDO चे प्रमुख म्हणून ‘पोखरण २’ च्या चाचणीचं निरीक्षण केलं होतं.

स्वघोषित बुद्धिजिवी लोकांनी केलेल्या या आरोप व निंदे नंतरदेखील भारतीयांनी पोखरणचं यश साजरं केलं होतं. डॉ ऐ पी जे अब्दुल कलाम आणि अटल बिहारी वाजपेयी यांना प्रचंड लोकप्रियता यानंतर प्राप्त झाली होती. पोखरण चाचणी अटल बिहारी वाजपेयींसाठी खूप महत्त्वाची होती. एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की,

“या चाचणीचं सर्वात मोठं यश हे आहे की यातून भारताला शक्ती मिळाली असून यामुळे देशाचा स्वाभिमान जागृत झाला आहे”.

वाजपेयींसाठी आण्विक शस्त्र सुरक्षा हे ताकद आणि अभिमानाचे प्रतीक होते. त्यातून त्यांना हिंदूत्व व उग्र राष्ट्रवाद यांपैकी कशाचेच दर्शन करायचे नव्हते.

 

vajpeyee-kalam-inmarathi
thequint.com

आज २० वर्षांनंतर आपल्याला वाजपेयींच्या ‘पोखरण २’ चाचणीचे महत्व समजले आहे. ती काळाची गरज होती आणि ती चाचणी अगदी योग्यवेळी झाली होती. १९९८ साली पाकिस्तान त्याची आण्विक ताकद वाढवत होता आणि अनेक आतंकवादी कारवायांना प्रोत्साहित करत होता.

भारताच्या चाचणीच्या नंतर बरोबर १७ दिवसांनी पाकिस्तानने चाजगी येथे अणु चाचणी केली.

भारताच्या यशस्वी चाचणीचे भारताला आसपासच्या प्रदेशावर नियोजनात्मक पकड व वर्चस्व निर्माण करणं सोपं गेलं. परंतु तज्ञांच्या मतानुसार पोखरण चाचणीचे लक्ष पाकिस्तान नाही तर चीन होते.

तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी पाकिस्तान नव्हे तर चीनला प्रथम शत्रू घोषित केले होता आणि ही अणूचाचणी चीन सोबत बरोबरीने उभं राहण्यासाठी गरजेची होती.

होमी भाभा, जे भारतीय अणूतंत्रज्ञानाचे जनक आहेत ते भारताच्या अणू धोरणाबाबत एकदम स्पष्ट भूमिका बाळगून होते. त्यांनी सार्वजनिकरित्या विधान केले होते की –

“आण्विक शस्त्रे त्यांचा योग्य लौंचिग मशिनरी सोबत एखाद्या देशाला आपल्या पेक्षा शक्तिशाली दुसऱ्या देशाचा शहरांवर, उद्योगांवर आणि महत्वाच्या निशाण्यावर हल्ला करण्यासाठी पुरेशी मोकळीक देतात.

हे म्हणणं संपूर्णतः चुकीचं आहे की ज्या देशावर आपण हल्ला करतोय त्याच्याकडे जास्त ताकद आहे म्हणून आपण हल्ला करू नये. एखाद्या देशाला जागतिक पातळीवर सन्मानाचे स्थान तेव्हाच प्राप्त होते जेव्हा त्याच्याहून अधिक शक्तिशाली विध्वंसक शक्ती त्याचा नियंत्रणात राहते”.

 

pokhran-2-inmarathi
m.dailyhunt.in

‘पोखरण २’ चाचणीच्या वीस वर्षानंतर, आज पोखरण चाचणीचे निंदक सर्व पातळीवर चुकीचे सिद्ध झाले आहेत. त्यावेळी या टीकाकारांनी “या स्फोटासोबत भारत डुंबणार” अशी विधानं केली होती.

पण भारताच्या वाढलेल्या आंतरराष्ट्रीय ताकदीमुळे आणि प्रस्थापित आण्विक शक्तींमध्ये झालेल्या समावेशामुळे या बुद्धिवाद्यांचे प्रतिवाद फोल ठरले आहेत.

पोखरण २ च्या चाचणीने भारत अजून जास्त वेगाने शस्त्रसज्ज व बलवान आहे. आज भारताचे अमेरिका, फ्रान्स व रशिया या देशांसोबत अणू करार आहेत.

आज भारत International Thermonuclear Experimental Reactor ( ITER) चा पूर्णवेळ सदस्य आहे.

हे १९९८ साली करण्यात आलेल्या बुद्धिजीवी भाकितांच्या पूर्णपणे उलट आहे. या चाचणीमुळे भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव वाढला आहे आणि देशाला अपेक्षित सन्मान मिळाला आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?