' भारताला ‘गचाळ’ म्हणणाऱ्याला दिलंय या माणसाने सडेतोड उत्तर! – InMarathi

भारताला ‘गचाळ’ म्हणणाऱ्याला दिलंय या माणसाने सडेतोड उत्तर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सोशल मिडीयाचा उपयोग अनेक लोक विविध कारणांसाठी करत असतात. असलेले मित्र शोधणे, नवे मित्र जोडणे, नवनवीन माहिती वाचणे हयासह आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधणे ह्यासाठी सुद्धा सोशल मिडियाचा अनेक लोक उपयोग करतात.

ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहिती नसतात ते प्रश्न सोशल मिडीयावर अपलोड करून त्या प्रश्नांवर विविध लोकांकडून उत्तरे किंवा एखाद्या विषयावर जगभरातील लोकांची मते जाणून घेता येतात.

 

friends inmarathi 2

 

अनेक लोक ह्यात विज्ञान, इतिहासापासून तर राजकारणापर्यंत सर्वच विषयावर प्रश्न टाकत असतात. काही दिवसांपूर्वी एका खोडसाळ व्यक्तीने भारतासंदर्भात एक अत्यंत उर्मट प्रश्न टाकला होता.

त्या व्यक्तीने असे विचारले की,

भारत हा देश अत्यंत घाणेरडा आहे. ह्या देशात स्वच्छता नाही. तरीही लोक भारतासारख्या घाणेरड्या गचाळ देशात का राहतात?

हा प्रश्न वाचून आपल्या डोक्यात तिडीक न गेल्यास नवल! हा प्रश्न विचारणाऱ्याला त्याच्या माजोरड्या वृत्तीमुळे बऱ्याच नेटकऱ्यांनी धारेवर धरले.

 

facebook inmarathi

 

===

===

अनेकांनी त्या व्यक्तीला सडेतोड उत्तरे दिली. परंतु एक अशी व्यक्ती जिच्या गाठीशी अनेक देश फिरल्याचा अनुभव आहे, ह्या व्यक्तीने मात्र ह्या उर्मट प्रश्न विचारणाऱ्याला उत्कृष्ट उत्तर देऊन गप्प केले आहे.

ही व्यक्ती म्हणजे Harun Resit Aydin होय. Aydin हे Nesta creative चे फॉरेन मार्केट्सचे डायरेक्टर आहेत.

त्यांच्या कामाच्या निमित्ताने त्यांनी अनेक देश पाहिले आहेत. Aydin हे मुळचे तुर्किश आहेत तरीही त्यांनी त्या भारताकडे गलिच्छ म्हणून बोट दाखवणाऱ्या व्यक्तीला चांगलेच खडसावले आहे.

उत्तरादाखल Aydin लिहितात की,

“फक्त भारतीयच कशाला, मला सुद्धा भविष्यात भारतात स्थायिक होण्यास आवडेल.”

त्यानंतर त्यांनी दोन फोटो टाकलेत. एक आहे न्यू यॉर्क मधील एका ठिकाणचा तर दुसरा फोटो पॅरिस येथील आहे. ह्या दोन्ही फोटोत रस्त्यावर घाण आणि कचरा पडलाय असे दिसतेय.

 

new york dirty street inmarathi

 

आणि ह्या खाली एक तिसरा फोटो आहे जो आपल्या म्हैसूर शहरातील चकचकीत रस्त्याचा आहे. हा रस्ता अत्यंत चकचकीत व स्वच्छ आहे.

 

mysoreinmarathi

 

ह्या फोटोनंतर ते म्हणतात की,

“पाश्चिमात्य प्रगत देश स्वच्छ आहेत व भारतात घाण आहे असे समजणे चुकीचे आहे. ह्या जगात कुठलाच देश पूर्णपणे चांगला किंवा खराब नाही. हा! ह्या जगात राहणारी माणसं मात्र चांगल्या मनाची किंवा कोत्या मनाची असतात.

 

dirty road inmarathi

 

मला खरच कळत नाही की लोकांच्या मनात दुसऱ्याविषयी इतका राग किंवा ईर्ष्या का येते? कुठून येते? एखाद्या व्यक्तीविषयी, धर्माविषयी, वंशाविषयी, देशाविषयी, रंगाविषयी, मतांविषयी राग असण्याचे कारण काय?”

तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून कटू अनुभव आला असेल किंवा तुम्ही ज्या पक्षाला पाठींबा देता त्या पक्षाचे नेते एखाद्या व्यक्तीला किंवा देशाला तुमचा शत्रू म्हणून त्याचा राग करत असतील तरी तुम्ही त्या देशातील इतर लोकांना प्रत्यक्षात न भेटताच त्यांच्याविषयी काही मत बनवून त्यांचा राग का करता?

“People are the enemy of the unknown.”

ह्या उक्तीप्रमाणे जे आपण बघितले नाही त्याबद्दल आपण त्या अनोळखी जगाची भीती तरी बाळगतो किंवा त्याला शत्रू तरी समजतो.

ह्यापूर्वी आपण असा टोकाचा द्वेष ज्यू लोकांबाबतीत दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी बघितला. त्यानंतर युरोपमध्ये इस्लामविरुद्ध द्वेष पसरला, मुस्लीम लोक असाच इस्रायेलचा द्वेष करतात.

 

israel inmarathhi

 

असाच द्वेष टर्कीने, भारताने, पाकिस्तानने, नास्तिकांनी, कॅथलिक लोकांनी, देव मानणाऱ्यानी व इतर अनेक लोकांनी सहन केलाय व अजूनही करत आहेत. हा द्वेष अतिशय वाईट आहे. खिन्न करणारा आहे.

हा द्वेष कसा उत्पन्न होतो?

वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातम्या, लेख वाचून, तुम्ही मानत असलेल्या विचारधारेवरची पुस्तके वाचून, टीव्हीवरच्या बातम्या, त्यावर चाललेल्या निरर्थक चर्चा बघून आपण कधीही न बघितलेल्या जागेविषयी, कधीही न भेटलेल्या माणसांविषयी मनात एक ग्रह करून घेतो. द्वेष करू लागतो.

मी अनेक देश फिरलो. त्या देशात अनेकांशी मैत्री केली. परंतु न बघितलेल्या देशाविषयी किंवा न भेटलेल्या व्यक्तींविषयी न भेटता न बघता न बोलता कधीही मनात ग्रह व द्वेष बाळगला नाही.

मला कायम हाडामांसाची, मनात प्रेम असलेली, काही दु:ख असलेली, कसली तरी भीती बाळगणारी माझ्यासारखीच माणसं भेटली.

 

clean-city-india-inmarathi

 

आता भारताविषयी बोलूया. मला भारतात राहायला आवडेल कारण मला तिथे लहान मुलांच्या मनात एक आशा दिसते. त्यांच्या डोळ्यांत आनंद दिसतो. असा आनंद, प्रेम बाकी प्रगत देशातील मुलांच्या डोळ्यात मला दिसत नाही.

 

indin kids inmarathi

 

कारण जरी त्यांच्याकडे पैसा असला, टेक्नॉलॉजी असली, सर्व सुखसोयी असल्या तरी त्यांच्याकडे एका गोष्टीची कमतरता आहे, ती म्हणजे शांतता, समाधान व प्रेम!

आपण फक्त पैसा मिळवायच्या मागे लागलो की, आपल्या आयुष्यातील छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद, समाधान व प्रेम आपण गमावून बसतो.

एखाद्या यंत्रमानवाप्रमाणे आपले आयुष्य यांत्रिक होऊन जाते. परंतु ह्या देशातील लहान मुलांकडे बघितल्यास कळते की, ही खरी निरागस लहान मुले! ज्यांना कशातूनही स्वतःचा आनंद शोधून काढून आनंदी राहायला जमतं.

मला भारतात राहायला आवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे माझे अतिशय आवडीचे कुतुब मिनार व ह्यासारखीच  अनेक हेरीटेजेस, मानवाच्या प्रगत भूतकाळाची साक्ष देणारी हडप्पा संस्कृती, इथल्या भाषा, इथल्या मातीचा प्रत्येक कण जो गौरवशाली इतिहासाची गोष्ट सांगतो.

ह्या देशातील विविधतेतील एकता जी जगात अत्यंत दुर्मिळ आहे.

 

indian-heritage-inmarathi

 

ह्यापूर्वी अशी बहुरंगी बहुढंगी संस्कृती फक्त ओटोमन साम्राज्यात होती. युरोपात जिथे दुसरीकडून कुठून विस्थापित लोक आले तर तेथील शांतता भंग पावते. परंतु भारतात तर अनेक हजारो वर्षांपासून अनेक धर्माचे, पंथांचे लोक मजेत एकत्र नांदत आहेत. तसेच अनेक विस्थापितांनाही ह्या देशाने आसरा दिला आहे.

तुम्ही ह्या देशातील लोकांना भेटलात तर तुमच्या लक्षात येईल की ह्या देशातील लोक मनाने अतिशय प्रेमळ आहेत. मोठ्या मनाचे आहेत. असे असले तरीही भारत सर्व दृष्टीने परफेक्ट देश आहे का? नाही!

 

taj inmarathi

 

परंतु माझा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. ह्या जगात कोणीतरी परफेक्ट आहे का? कुणीही नाही. ह्या जगात कुठलाही देश घाणेरडा नाही. मात्र लोकांच्या मनात द्वेष आहे. भारतात अनेक समस्या आहेत. गरिबी, स्वच्छता, भ्रष्टाचार, पायाभूत सुविधांची कमतरता हे असले प्रश्न आहेत. परंतु म्हणून हा देश राहण्यासाठी नालायक ठरत नाही.

मी अनेक भारतीय बघतो जे स्वतःच्याच देशावर चिखलफेक करताना दिसतात. त्यांना मी हे सांगू इच्छितो की, जर तुम्हीच असे देशाबद्दल नकारात्मक विचार करायला सुरुवात केलीत तर देशाला बाहेरच्या शत्रूंची गरजच नाही.

ह्या देशातील लोक ज्या देशात जन्मले, वाढले, शिकले तेच ह्या देशांतर्गत समस्यांमुळे देश सोडून बाहेर चाललेत.

ते कधीही देशात परतणार नाहीत. त्यांना बाहेरचे जग खुणावते आहे. जर सगळेच सक्षम लोक देश सोडून बाहेर जाऊ लागले तर ह्या देशात जो आवश्यक बदल आहे तो कोण घडवून आणणार? तुम्हाला काय वाटते, युरोप किंवा अमेरिकेला बदल घडवून आणण्यासाठी तुमची गरज आहे? नाही!

मित्रांनो, तुमच्या स्वतःच्या देशाला, भारताला आज तुमची गरज आहे.

 

youth-inmarathi02

 

ह्या देशात येऊन काही चांगले करण्याची माझी इच्छा आहे. मी एकटा फार काही करु शकणार नाही हे मला ठावूक आहे. परंतु ह्यात खारीचा वाटा मी नक्कीच उचलू शकतो.

अनेक वर्षांपूर्वी मी आणि माझ्यासारखे अनेक तुर्की लोक आपल्या मायदेशी परत आलो कारण आम्हाला आमच्या देशाची प्रगती करायची होती. देश संपन्न बनवायचा होता. तेव्हा टर्की युरोपच्या ३० वर्ष मागे होता आणि आम्ही जर्मनीत दहा पट जास्त कमवत होतो.

परंतु जेव्हा आता मी ह्याकडे मागे वळून बघतो आणि देशाची झालेली प्रगती बघतो तेव्हा माझ्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं. मला कधीही माझ्या देशात परतण्याचा पश्चाताप झाला नाही. आणि हेच मी माझ्या सेकंड होम साठी म्हणजेच भारतासाठी करू इच्छितो.

एक दुसऱ्या देशातील अनुभवी व्यक्ती जर आपल्या देशाविषयी आत्मीयता ठेवू शकते आणि देशाच्या प्रगतीविषयी मनात कळकळ बाळगू शकते तर आपण आपल्याच देशाविषयी सकारात्मक विचार करायला का मागेपुढे बघतो?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?