' क्रांतीच्या धगधगत्या मशालीत आपले सर्वस्व अर्पण करणारा अवलिया! – InMarathi

क्रांतीच्या धगधगत्या मशालीत आपले सर्वस्व अर्पण करणारा अवलिया!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

जगप्रसिद्ध क्युबन क्रांतींचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिडेल कास्ट्रोचे व्यक्तिमत्त्व आजही कित्येकांच्या मनावर गारुड घालते.

डाव्या विचारसरणीच्या या नेत्याने अन्यायाविरुद्ध उभे राहून जो संघर्ष केला आणि देशात क्रांती घडवून आणली ती कामगिरी खरंच थक्क करणारी होती.

गरीब आणि श्रीमंत यांमधील भेदभाव नष्ट करून साम्यवादी राष्ट्राची स्थापना करण्याचे त्याने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला बऱ्याचदा अनेक तडजोडी कराव्या लागल्या, प्रसंगी कठोर व्हावे लागले. पण शेवटी त्याने आपल्या मायभूमीत एक पक्षीय समाजवादी सत्ता उभी केलीच.

आज ह्याच क्रांतिकारी चेहऱ्याच्या जीवनाबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.

 

fidel-castro-marathipizza01
politico.com

 

फिडेल कास्ट्रोचा जन्म १९२६ मध्ये क्यूबामधील फिडेल अलेजांद्रो कॅस्ट्रो परिवारात झाला, त्याचे कुटुंब हे अतिशय श्रीमंत होते.

क्रांतीपर्वात उतरण्यापूर्वी फिडेल कॅस्ट्रो वकील पेश्यात होता, तेव्हा फिडेल कास्ट्रो हे नाव कोणाच्याही ओठी नव्हते किंवा कोणी अशी कल्पना देखील केली नव्हती की पुढे जाऊन हा मनुष्य एवढे मोठे कार्य करणार आहे.

आपल्या देशातील विषमतेची आणि बेफिकीर हुकुमशाही राजवटीची जाणीव जेव्हा फिडेल कास्ट्रोला झाली, तेव्हा बदल घडलाच पाहिजे असे त्याला वाटायला लागले आणि म्हणून त्याने १९५२ च्या निवडणुकीत हुकुमशहा विरोधात निवडणूक लढवली. मात्र ही निवडणूक काही पार पडलीच नाही.

आता शांततेच्या मार्गा व्यतिरिक्त अन्य मार्ग अवलंबवयाला लागणार हे त्याच्या लक्षात आले आणि त्याने प्रभावी साम्यवादी मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीवर चालायचे ठरवले.

जनक्रांती घडवून आणण्यासाठी फिडेल कॅस्ट्रोने आपल्या जवळपास १०० सहकाऱ्यासह  सॅंटियागो डी क्यूबात सैनिकी बॅरेकवर हल्ला केला. मात्र, त्यात त्यांना अपयश आहे.

या हल्ल्यात त्याचे काही सहकारी मारले गेले मात्र फिडेल कॅस्ट्रो आणि त्याचा भाऊ ‘राउल’ मात्र बचावले. जे पकडले गेले त्यांना जेलमध्ये टाकले गेले.

 

fidel-castro-marrathipizza2
biography.com

 

त्यानंतरही फिडेल कॅस्ट्रोने बतिस्ता शासनाविरोधात आंदोलन सुरुच ठेवले. हे अभियान त्याने मेक्सिकोत भूमिगत राहून सुरु ठेवले.

येथेच त्याने ‘२६ जुलै मूव्हमेंट’ नावाने एक संघटन बनवले. त्याचा प्रभाव इतका जबरदस्त होता की त्याच्या क्रांतिकारी आंदोलनाला क्यूबात अतिशय समर्थन मिळू लागले.

क्रांतीचा हा पेटलेला वणवा इतका भडकला की, त्यात फिडेल कॅस्ट्रोच्या संघटनेने बतीस्ता सरकार उधळून लावत नव्या साम्यवादी विचारसरणीचे राष्ट्र स्थापन केले आणि क्युबाचा नवा १६ वा पंतप्रधान म्हणून फिडेल कॅस्ट्रो विराजमान झाला.

पुढे तब्बल ४७ वर्षे त्याने क्युबावर निर्विवादीत वर्चस्व गाजवले. अखेर २५ नोव्हेंबर २०१६ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी क्रांतीची ही धगधगती मशाल अनंतात विलीन पावली.

 

fidel-castro-marrathipizza03
gannett-cdn.com

 

पण अश्या ह्या कम्युनिस्ट क्यूबाच्या जनकाबद्द्दल काही वादग्रस्त आणि रंजक गोष्टी देखील ऐकिवात आहेत.

असे म्हणतात की, फिडेल कास्ट्रोने वयाच्या ८२ व्या वर्षापर्यंत अंदाजे ३५,००० महिलांशी शारीरिक संबंध ठेवले होते. ही बाब कितपत खरी यावर मात्र कोणताही प्रकाश टाकण्यात आलेला नाही.

फिडेल कॅस्ट्रोच्या नावावर सर्वात मोठे भाषण देण्याचा गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड देखील आहे. हा रेकॉर्ड त्याने २९ सप्टेंबर १९६० रोजी संयुक्त राष्ट्रात ४ तास, २९ मिनिटांचे भाषण देऊन बनवला होता. तसेच त्यापूर्वीही त्याने आपल्या देशात कम्युनिस्ट पार्टी काँग्रेस कार्यक्रमात सलग ७ तास १० मिनिटे लांब भाषण केले होते.

एवढेच काय त्याच्या गायीच्या नावावर देखील गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डची नोंद आहे. ह्या गायीचे नाव उब्रे ब्लांसा असून तिच्या नावावर एका दिवसात ११० लीटर दूध देण्याचा विक्रम आहे.

 

fidel-castro-marrathipizza04
atlasobscura.com

 

कॅस्ट्रोचे जेवढे मित्र होते, त्यापैकी कैकपटीने शत्रू देखील होते. खुद्द फिडेल कॅस्ट्रोने दावा केला होता की,

मला मारण्यासाठी किमान ६३४ वेळा षडयंत्र रचले गेले होते. मात्र दर वेळी सावधगिरी बाळगल्याने मी बचावलो. मुख्य म्हणजे ह्या सर्व षडयंत्रांमागे अमेरिकन सेंट्रल इंटेलिजेंस एजेन्सीचा हात होता, कारण त्यांचे पिल्लू असलेले बतीस्ता सरकार मी बरखास्त केले होते. मला मारण्यासाठी विषारी औषधे, विषारी सिगार, स्फोटके आणि विषारी पावडरसह अनेक पदार्थ, वस्तूंचा वापर केला गेला.

सीआईएने हत्येचे षडयंत्र रचणे, अमेरिका समर्थित निर्वासन, ४५ वर्षापेक्षाही अधिक काळ आर्थिक प्रतिबंध आणि कोठे येण्या-जाण्याची बंदी असतानाही कॅस्ट्रोने ९ अमेरिकी राष्ट्राध्यक्षांपेक्षा अधिक काळ देशावर सत्ता गाजवली.

क्यूबा देश आणि कॅस्ट्रो यांना सर्वात जास्त त्रास जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कार्यकाळात झेलावा लागला होता.

 

fidel-castro-marrathipizza05
slate.com

 

ब्रिटनची महाराणी आणि थायलंडचा राजा यांच्यापाठोपाठ फिडेल कॅस्ट्रो जगातील असा एकमेव राष्ट्राध्यक्ष आहे ज्याने सर्वाधिक काळ सत्ता उपभोगली.

कॅस्ट्रोने १९५९ ते १९७६ पर्यंत पंतप्रधान आणि १९७६ ते २००८ पर्यंत राष्ट्राध्यक्षाचे पद सांभाळले.

असा होता क्रांतिचा चेहरा फिडेल कॅस्ट्रो!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?