' या कलाकाराने कचऱ्यापासून बनवलंय चंदीगढचं प्रसिद्ध ‘रॉक गार्डन’ – InMarathi

या कलाकाराने कचऱ्यापासून बनवलंय चंदीगढचं प्रसिद्ध ‘रॉक गार्डन’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्याला आराम करायचा असेल आणि काहीही करायला कंटाळा आला असेल व त्याचवेळी एखाद्याने आपल्याला काही काम सांगितले, तर आपण खूपच चिडचिड करतो. पण जगात काही असे लोक देखील आहेत, ज्यांना कोणतेही काम करण्यासाठी कधीही कंटाळा येत नाही.

ते नेहमी कोणतेही काम करण्यासाठी तयार असतात. त्यामुळे ते इतर लोकांपेक्षा खूप वेगळे असतात. परिस्थिती कशीही असो, ते नेहमी काम करण्यासाठी आणि आपल्या कलेचा उपयोग चांगल्या कामात वापरण्यासाठी नेहमी तत्पर असतात.

 

Nek chand saini.Inmarathi

 

चंदिगढच्या रॉक गार्डनला स्वतःची एक वेगळी ओळख देणारे प्रसिद्ध शिल्पकार नेकचंद देखील एक असेच होते. आपल्या स्वकर्तृत्वावर कचऱ्याच्या ढिगाला एक जगप्रसिद्ध पर्यटन स्थळामध्ये बदलणारे नेकचंदचे जीवन खूपच प्रेरणादायक आहे. दोन वर्षापूर्वी त्यांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला होता. त्यांचे जीवन लोकांसाठी उदाहरण आहे की, जर माणसाने ठरवले तर मनुष्य त्याच्या जीवनामध्ये काहीही करू शकतो.

नेकचंद सैनी यांचा जन्म १५ डिसेंबर १९२४ ला शंकरगढ नावाच्या एका शहरात झाला होता, जे आता पाकिस्तानमध्ये आहे. त्यांचे कुटुंब भाजीपाला पिकवून घरखर्च चालवत असत. देशाच्या फाळणीनंतर ते भारताच्या पंजाबमधील एका छोट्या शहरात राहण्यासाठी आले. १९९१ मध्ये त्यांना राज्य सरकारमध्ये रोड इन्स्पेक्टरची नोकरी लागली आणि लवकरच त्यांची बदली चंदिगढला झाली.

 

Nek chand saini.Inmarathi1

 

जेव्हा चंदिगढ तयार करण्याचे काम सुरू झाले होते, तेव्हा नेकचंद यांना रस्त्याचे परीक्षण करण्याचे काम देण्यात आले होते. नेकचंद आपल्या ड्युटीनंतर आपली सायकल काढत असत आणि शहर बनवण्यासाठी खाली केलेल्या आसपासच्या गावामधून किंवा PWD स्टोरमधून तुटले – फुटलेले सामान घेऊन येत असत. ते ओसाड पडलेल्या जंगलाची स्वत: साफसफाई करत असत आणि औद्योगिक कचऱ्याने याला काही क्रिएटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करत असत. ते आपल्या कामाला एवढ्या सावधानतेने करत होते की, सरकारी अधिकाऱ्यांना या कामाबद्दल १९ वर्षानंतर म्हणजेच १९७५ ला समजले. तेव्हापर्यंत त्यांनी ४ एकर जागेवर कलाकृती तयार केली होती.

जेव्हा सरकारने या कलाकृतींना तोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लोक नेकचंद यांच्या बाजूने उभे राहिले आणि शेवटी लँडस्केप अॅडव्हायजर कमिटीने या गार्डनला बांधण्याची परवानगी दिली. त्या काळामध्ये चीफ अॅडमिनीस्ट्रेटर डॉ. एमएस रंधावाने याला रॉक गार्डन नाव दिले होते. ४० एकरामध्ये बनलेल्या या रॉक गार्डनचे उद्घाटन १९७६ मध्ये करण्यात आले.

 

Nek chand saini.Inmarathi2

 

हे गार्डन तीन भागांमध्ये बनून तयार झाले होते. पहिल्या फेजमध्ये ते काम झाले, ते त्यांनी लोकांपासून लपून केले होते. दुसऱ्या फेजचे काम त्यांनी १९८३ पर्यंत पूर्ण केले. यावेळी या गार्डनमध्ये एक झरा, एक छोटेसे थेटर, बाग यांसारख्या कितीतरी वस्तूंचा समवेश होता. याव्यतिरिक्त काँक्रीटवर मातीचा लेप चढवून ५००० लहान – मोठ्या कलाकृती बनवण्यात आल्या होत्या.

===

तिसऱ्या फेजमध्ये कितीतरी मोठ्या गोष्टीं तयार करण्यात आल्या. कमानीच्या एका लिस्टचा देखील समावेश होता. या कमानींवर झोपाळे लटकवण्यात आले. याव्यतिरिक्त मूर्तींच्या प्रदर्शनासाठी एक मंडप, एक मत्सालय आणि ओपन सिंच थेटर बनवले गेले आहे आणि येथे दररोज ५००० पर्यटक येतात. त्यांनी १९९३ ते १९९५ च्यामध्ये केरळच्या पलक्कड जिल्ह्यामध्ये एक दीड एकरचे छोटे रॉक गार्डन देखील बनवले. त्यांनी चंडीगढची पहिला पक्का रस्ता बनवला होता.

 

Nek chand saini.Inmarathi3

 

तुटल्या – फुटलेल्या सामानाने आणि कचऱ्याने त्यांनी १९७५ मध्ये बनवलेल्या रॉक गार्डनसाठी त्यांना १९८४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ११ जून २०१५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. ते आपल्या समाजासाठी एक प्रेरणादायी काम करून गेले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?