एका वेश्येमुळे स्वामी विवेकानंदांना स्वतःच्या ‘संन्यासी’ असण्याची खात्री पटली…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

स्वामी विवेकानंद यांनी त्यांचं जीवन एक संन्यासी म्हणून व्यतीत केलं. त्यांनी नेहमी आपल्या देशासाठी आणि आपल्या समाजासाठी काम केले. ते एक असं व्यक्तिमत्व होत ज्याचं अनुसरण आजही लोक करतात.

आपल्या ज्ञानाच्या जोरावर स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगाला आपल्या पुढे नमवले होते.

 

swami-vivekanaanad-marathipizza

 

ते एक असे संन्यासी आहेत ज्यांच्या विचारांचे अनुसरण आजही लोक करतात. एवढंच नाही, तर आजच्या युवा पिढीचेही ते आवडते आयडल आहेत. म्हणूनच त्यांच्या नावाने ‘युवा दिन’ साजरा केला जातो.

स्वामी विवेकानंद एक असे संन्यासी होते ज्यांचे अनुयायी आज केवळ भारतातच नाही जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आढळतात. पण काय तुम्हाला माहिती आहे की, स्वामी विवेकांदांना ते एक संन्यासी असल्याची अनुभूती एका वेश्येने करवून दिली होती.

 

Swami_Vivekananda-marathipizza
14gaam.com

एकदा स्वामी विवेकानंद जयपूर जवळ असणाऱ्या एका छोट्या रयतेचे पाहुणे म्हणून गेले होते. काही दिवस तेथे घालविल्यानंतर जेव्हा विवेकानंद परतणार होते, तेव्हा या रयतेच्या राजाने त्यांच्यासाठी एक स्वागत समारोह आयोजित केला. त्या समारोहासाठी त्याने बनारसच्या एका प्रसिद्ध वेश्येला बोलवले होते.

 

Swami_Vivekananda02-marathipizza
youtube

जेव्हा स्वामी विवेकानंदांना याची माहिती मिळाली की त्यांच्या स्वागत सामोरहात राजाने एका वेश्येला बोलावले आहे, तेव्हा ते संभ्रमात पडले. त्यांचा कळेच ना की एका वेश्येच्या समारोहात संन्याश्याचं काय काम?

अखेर त्यांनी या समारोहात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आणि ते त्यांच्या खोलीतच बसून राहिले.

पण जेव्हा त्या वेश्येला याची माहिती मिळाली की ज्या महान व्यक्तीच्या स्वागत समारोहासाठी तिला बोलविण्यात आलं होतं, तिच्याचमुळे ते समारोहात नाही येत आहेत. यामुळे ती खूप दुखी झाली आणि तिने सुरदासाचे भजन ‘प्रभुजी मेरे अवगुण चित न धरो…’ गाण्यास सुरवात केली.

वेश्येने जे भजन गायिले त्याचा अर्थ असा होता की :

एक पारस तर लोखंडाच्या प्रत्येक तुकड्याला स्वतःच्या स्पर्शाने सोनं बनवतो – मग तो तुकडा देवघरात असो किंवा कसाईच्या दरवाज्यात असो. जर तो पारस देवघरातील आणि कसाईच्या दरवाज्यातील दगडांत फरक करत असेल म्हणजेच तो देवळातील दगडाला स्पर्श करून सोनं बनवत असेल पण कसाईच्या दरवाज्यातील दगडाला नाही तर तो पारस खरा नाही.

 

Swami_Vivekananda01-marathipizza

 

विवेकानंदांनी ते भजन एकले आणि ते वेश्या असलेल्या ठिकाणी गेले.

त्यांनी बघितले की त्या वेश्येच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. स्वामी विवेकानंदांनी आपल्या संस्मरणमध्ये या घटनेचा उल्लेख केला आहे की, त्यांनी त्यादिवशी पहिल्यांदा कुण्या वेश्येला बघितले होते.

पण तिला बघून त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारचं आकर्षण निर्माण झालं नाही. त्यादिवशी त्यांना पहिल्यांदा ही अनुभूती झाली होती की, ते पूर्णपणे संन्यासी झाले आहेत.

आपल्या संस्मारणात त्यांनी हे देखील लिहिले आहे की, याआधी जेव्हा ते त्यांच्या घरून निघायचे किंवा त्यांना कुठून त्यांच्या घरी परत यायचं असायचं तेव्हा त्यांना २ मैलाचा चक्कर मारून यावं लागायचं.

कारण त्यांच्या घराच्या रस्त्यामध्ये एक वेश्यांचा भाग होता आणि संन्यासी असल्या कारणाने तिथून जाणे त्यांना त्यांच्या संन्यासी धर्माच्या विरुद्ध वाटायचे.

पण त्या दिवशी राजाकडील स्वागत समारोहात त्यांना अनुभव आला की एक खरा संन्यासी तोच आहे जो वेश्यांच्या भागातून गेला तरी त्याला कुठलाही फरक पडणार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “एका वेश्येमुळे स्वामी विवेकानंदांना स्वतःच्या ‘संन्यासी’ असण्याची खात्री पटली…!

  • January 12, 2019 at 9:25 am
    Permalink

    अप्रतीम

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?