हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तानी आर्मी अधिकाऱ्याशी लग्न करणाऱ्या धाडसी महिलेची कथा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
नुकताच आलिया भट्टच्या येणाऱ्या ‘राझी; ह्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ह्या चित्रपटाची कहाणी ही हरिंदर सिक्का ह्यांची कादंबरी ‘कॉलिंग सहमत’ ह्यावर आधारित आहे. हरिंदर सिक्का हे स्वतः एक नेवी ऑफिसर राहिले आहेत. ही कादंबरी एका काश्मिरी मुलीवर आहे. कादंबरीतील ह्या मुलीचं नाव सहमत खान आहे. जिची भूमिका आलियाने ह्या चित्रपटात केली आहे.

जगभरातील देशातील सुरक्षा एजन्सीज इतर देशांपासून आपल्या देशाची सुरक्षा करण्यासाठी इतर देशांची हेरगिरी करतात, जसे की पाकिस्तान. हरिंदर सिक्का ह्यांची कादंबरी ‘कॉलिंग सहमत’ ह्यातील सहमत खान एक अशीच गुप्तहेर आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जरी कादंबरी असली तरी ती खोटी किंवा काल्पनिक नसून – एका खऱ्या महिलेवर आधारित आहे. ह्या महिलेची ओळखओळख ही गुप्त ठेवण्यात आली आहे. ती एक गुप्तहेर बनून पाकिस्तानात राहिली आणि भारताला काही महत्वपूर्ण माहिती दिली. सोबतच त्या अश्या काही गुप्तहेरांपैकी एक आहेत जे पाकिस्तानात गुप्तहेरी करून भारतात परतू शकले. ही माहिती स्वतः सिक्कांनी ‘द हिंदू’ ला दिलेल्या मुलाखतीत दिली.

१९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या सेनेला एका अश्या गुप्तहेराची गरज होती जो पाकिस्तानात राहून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवेल आणि त्यांची माहिती आपल्यापर्यंत पाठवेल.
पण सहमत खान ह्या एका साधारण मुली सारख्या होत्या. त्यांनी कधीही हेरगिरी करण्याचा विचार देखील केला नव्हता. ज्यादरम्यान त्या कॉलेजात शिकत होत्या तेव्हाच त्यांच्या वडिलांनी त्यांना एक गुप्तहेर होण्यासाठी विचारले होते. त्यांना तर “गुप्तहेर” म्हणजे काय, हे देखील माहित नव्हते. पण देशाकरिता त्यांनी हे करण्याचा निश्चय केला.

अश्या पार्श्वभूमीवर त्यांनी देशासाठी देशाच्या सुरक्षेसाठी एक गुप्तहेर बनण्याचा निश्चय केला, हे खरंच खूप आश्चर्यकारक आणि तेव्हढेच प्रेरणादायी देखील आहे.
ह्यानंतर सहमत ह्यांचे लग्न एका पाकिस्तानी सेनेच्या अधिकाऱ्याशी लावून दिले जाते. हे खरंच किती भीतीदायक आहे. म्हणजे ज्या देशाची गुप्तहेर म्हणून तिला पाठविण्यात येणार होते त्याचं देशाच्या आर्मी ऑफिसरशी तिला लग्न करावं लागतं. ह्याने तर तिच्यावरील धोका आणखी वाढला, तरी तिने हे ध्यैर्य दाखवलं. ती त्या आर्मी ऑफिसरशी लग्न करते आणि त्याच्याच घरी पाकिस्तानात राहून पाकिस्तानी सेनेची महत्वपूर्ण माहिती अगदी गुप्तपणे भारतीय सेनेला पुरवते.

त्यांनी देशासाठी आपले प्राण पणाला लावले, आपला जीव शोक्यात घातला. कारण शत्रुच्याच छावणीत त्याचे आप्त बनून त्याचीच जासुसी करणे हे काही सोपे नाही. तिने आपल्या जीवनात अनेक भूमिका अगदी चोख पार पडल्या त्यातील एका देशभक्ताची भूमिका ही सर्वात उत्कृष्ट ठरली. त्यांच्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचविणे शक्य झाले. जेव्हा त्या भारतात परतल्या तेव्हा त्या गर्भवती होत्या. ज्यानंतर त्यांनी एका मुलाला जन्म दिला. त्यांच्या मुलामध्ये देखील देशभक्तीचं बीज पेरलं गेलं होतं. म्हणून त्याने देखील मोठं होऊन भारतीय सेनेत रुजू होऊन देशाची सेवा केली.

ही कादंबिरी लिहिणारे हरिंदर सिक्का ह्यांना ही कादंबरी लिहिण्याची प्रेरणा तेव्हा मिळाली जेव्हा ते कारगिल युद्धाबाबत रिसर्च दरम्यान सहमत खान ह्यांच्या मुलाला भेटेले. त्यांच्याच मुलाने आपल्या आईच्या ह्या कार्यावर प्रकाश टाकला आणि त्याचं कार्य सर्वांसमोर आणलं. त्यानंतर सिक्का हे त्यांना भेटण्याकरिता पंजाब येथील मलेरकोटला येथे पोहोचले. पण त्यांना बघून सिक्का ह्यांना जरा देखील वाटले नाही की त्या एक गुप्तहेर होत्या. कदाचित म्हणूनच त्या पाकिस्तानी आर्मी ऑफिसर आणि तिथल्या इतर लोकांना देखील त्यांच्यावर कधी संशय आला नाही. कारण त्यांच्यात असं काहीच नव्हतं ज्यावरून त्या एखाद्या गुप्तहेर वाटतील. ( – हेच तर एका उत्कृष्ट गुप्तहेराचं कसब असतं, नाही का? 🙂 )
आज त्यांचे हे शौर्य चित्रपटाच्या मध्यातून संपूर्ण जगभर दाखवले जाणार आहे. सहमत खान ह्यांची ही कहाणी देखील देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती द्यायलाही न घाबरणाऱ्या त्या इतर गुप्तहेरांप्रमाणे अंधारातच राहिली असती जर हरिंदर सिक्का ह्यांनी ती
पानावर उतरविली नसती. ही कादंबरी पूर्ण करायला हरिंदर सिक्का ह्यांना ८ वर्ष लागले.
हे गुप्तहेर जे देशाच्या रक्षणासाठी सुरक्षेसाठी आपला जीव धोक्यात टाकायला जरा देखील घाबरत नाहीत, जे त्यांच्या कुटुंबापासून नेहेमी दूर असतात, जे देशासाठी आपला जीव गमावतात पण तरी त्यांना साधी ओळख देखील मिळत नाही, त्या सर्वांच्या अतुलनीय कामाची पावती म्हणजे हा चित्रपट… ज्याद्वारे भारतीय गुप्तहेरांचे जीवन आणि त्यांची देशभक्ती जगासमोर येणार आहे…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Excellent Excellent Excellent
Jai Hind.
gr8