भगवान शंकराचा जन्म कसा झाला- कथा, आख्यायिका आणि गुढतेचं वलय
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
त्रिमूर्ती म्हणजेच ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांनी या जगाची निर्मिती केली असे म्हटले जाते. त्यातील महेश म्हणजे भगवान शंकर हे आहेत. शंकर देवाचे महत्त्व सर्व देवतांमध्ये सर्वात जास्त आहे. महादेव म्हणजेच सर्वात महान देव म्हणून देखील शंकराला ओळखले जाते. त्यांचे केस मनाचे प्रतिक मानतात, त्यांचे त्रिशूल मनावर नियंत्रण करतो, त्यांचे ध्यान शांततेचे प्रतिक आहे आणि त्यांच्या गळ्यातील सर्प हा आपला अहंकार त्याग करण्याचे प्रतिक आहे.

त्यांच्या दैवी सामर्थ्याबद्दल काही वेगळे सांगण्याची गरज नाही. जगातील सर्व दुष्टांचा नाश करणारा देवता म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. विविध पौराणिक पुरावे आणि श्लोक आहेत, जे भगवान शिव यांच्या अस्तित्वाबद्दल विविध कथांचे वर्णन करतात. आश्चर्याची बाब म्हणजे, प्रत्येकाने काहीतरी वेगळे त्यांच्याबद्दल लिहिलेले आहे. पण आज आपण भगवान शंकरांबद्दल काही वेगळ्या बाबी जाणून घेणार आहोत, ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील.
भगवान शंकरांच्या कथा वाचताना वाचकांच्या मनात, नेहमी एक प्रश्न निर्माण होतो की, भगवान शंकरांचे वडील कोण होते ? यावर सर्वांचा एकच समज आहे की, भगवान शंकरांना पालक नव्हते. भगवान शंकरांना अनादि असे संबोधले जाते. अनादि शब्दाचा शाब्दिक अर्थ आहे की, ज्याला कोणतीही सुरुवात वा अंत नाही. भगवान शंकराला प्रारंभ नव्हता. ते जन्म आणि मृत्युच्या पलीकडे आहेत.

स्पिकिंग ट्रीच्या एका लेखानुसार, एकदा महादेवाला प्रश्न विचारण्यात आला होता की, ‘तुझे वडील कोण आहेत ?’ यावर उत्तर देताना भगवान शिव म्हणाले की, माझे वडील भगवान ब्रम्हा हे आहेत. भगवान शिवांना जेव्हा विचरण्यात आले की, तुमचे आजोबा कोण आहेत ? यावर त्यांनी उत्तर दिले की, माझे आजोबा भगवान विष्णू आहेत. त्यांना परत विचारण्यात आले की, तुमचे पणजोबा कोण आहेत ? यावर त्यांनी खूपच वेगळे उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, माझा पणजोबा मी स्वतःच आहे.
भगवान शंकर यांच्या जन्माविषयी अजून एक मनोरंजक कथा आहे, एकदा भगवान ब्रम्हा आणि भगवान विष्णू सर्वात शक्तिशाली कोण, यावर वाद घालत होते. ह्याचवेळी अचानक प्रकाशाचा एक तेजस्वी खांब दिसू लागला. हा खांब एका क्षितिजापासून दुसऱ्या क्षितिजापर्यंत लांब होता आणि या दोन्ही देवांना या खांबाची सुरुवात आणि शेवट शोधण्यात यश आले नाही. त्यामुळे ते बुचकळ्यात पडले, यामुळे त्यांचा एकच गोंधळ उडाला होता. याच खांबामधून भगवान शंकर प्रकटले होते. हे सिद्ध करते की, त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचा आणि जन्माचा संबंध त्यांच्याकडे नाही आहे.

भगवान शंकर हे सगळीकडे आहे, त्यांचे एखाद्या नेमक्या ठिकाणी अस्तित्व नाही आहे. वरील सर्व तथ्य हे पौराणिक कथांवर अवलंबून आहे. असे म्हणतात की, ते कवितेचा एखादा भाग असू शकतात किंवा कदाचित एखादि दंतकथा असू शकतात. पण अनेक लोक असेही मानतात की, भगवान शिव यांना विविध नावे देण्यात आलेली आहेत आणि आपण जेव्हा त्यांना मनापासून हाक मारतो, तेव्हा ते आपल्या भक्तांची संकटे दूर करण्यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी असतात. यावरून असे दिसून येते की, भगवान शंकर हे सर्वत्र आहेत आणि त्यांचे एखाद्या नेमक्या ठिकाणी अस्तित्व नाही.
यावरून हे दिसून येते की, भगवान शंकरांच्या जन्माचे नेमके पुरावे उपलब्ध नाहीत. कदाचित पृथ्वीवरील वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी त्यांच्या जन्म झाला असेल.
—
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.