' ग्रीन, ब्लॅक टी पिणाऱ्या विदेशी लोकांना या तरुणीने लावली भारतीय फक्कड चहाची चटक – InMarathi

ग्रीन, ब्लॅक टी पिणाऱ्या विदेशी लोकांना या तरुणीने लावली भारतीय फक्कड चहाची चटक

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चहा विकणारा एक माणूस भारताचा सर्वात हुशार पंतप्रधान होऊ शकतो यावरूनच समजून येतं की चहा ही किती महत्वाची गोष्ट आहे!

चहा म्हणजे आपल्या भारतीयांचा जीव कि प्राण! जग इकडचं तिकडे होवो पण जगाच्या कोणत्याही देशात गेलो तरी आपलं चहाचं प्रेम काही सुटणार नाही.

 

tea lovers inmarathi
times of india

 

जिथे जाऊ तिथे आपण चहाचा वारसा घेऊन जाऊ आणि तेथील लोकांना देखील चहाच वेड लावू इतकं आपलं चहा बनवण्यावर आणि त्याचा प्रसार करण्यावर प्रभुत्व आहे.

हे ही वाचा – 

===

आणि सध्या तर आपल्या इथे म्हणजेच खासकरून मुंबई आणि पुण्यात खास चहाच्या वेगळ्या हॉटेल्स चा ट्रेंड आला आहे!

तंदूर चहा, तलप चहा, येवले चहा, प्रेमाचा चहा आणि काय काय नावं आहेत विचारू नका! अगदी प्रत्येक गल्लीत ही अशी चहाची हॉटेल्स उघडली आहेत!

 

yewale inmarathi
justdial

 

पण एवढं होऊन सुद्धा चहाच्या टपरीवरच्या कटींगला तोड नाही, त्या दोघांत तीन कटींगची मजा काही औरच आहे! एकंदरच आपल्याइथे चहा म्हणजे फक्त पेय नाही तर ती एक भावना आहे इमोशन आहे!

या चहाची कीर्ती अगदी सातासमुद्रापार पोहोचलेली आहे, अगदी ऑस्ट्रेलिया मध्ये सुद्धा लोकं या चहाचे फॅन्स झालेले तुम्हाला दिसतील!

पण ह्या चहाला नेमकं इतकं फेमस बनवलं कुणी? अगदी परदेशात जाऊन ग्रीन टी किंवा ब्लॅक टी पिणाऱ्या गोऱ्या लोकांना या अस्सल भारतीय फक्कड चहाची चटक नक्की कुणी लावली?

तर ही करामत करून दाखवली आहे एका भारतीय तरुणीने, आज आपण याच विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत!

तिने संपूर्ण ऑस्ट्रेलिया मध्ये चहाची अशी काही लहर निर्माण केली आहे की ऑस्ट्रेलियन माणसं अतिशय लांबून खास तिच्या हाताचा चहा पिण्यासाठी येतात.

हे ही वाचा – 

===

 

upamma-virdi-marathipizza01
sambhaavnews.com

 

उप्पम्मा विर्दी असे या ‘चहावाली’चे नाव आहे.

मूळची चंदीगढची असलेल्या विर्दीला काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियामधील एका कार्यक्रमात २०१६ वर्षातील ‘बिझनेस वुमन ऑफ द इअर’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे २६ वर्षाच्या उप्पम्मा विर्दीची ओळख केवळ ‘चहावाली’ म्हणूनच नव्हे, तर एक कॉर्पोरेट वकील म्हणूनही आहे.

ऑस्ट्रेलियातील एका टेलिव्हीजनला चॅनेलला मुलाखतीसाठी बोलवले असताना, ती चक्क चहाच्या किटलीसोबत, ग्लास घेऊन पोहोचली. सुरुवातीला सर्वांना ती मस्करी करत असल्याचे वाटत होते.

मात्र, या माध्यमातून तिने उपस्थितांना मसाला चहाविषयी माहिती दिली आणि भारतीयांचे त्यावर असणारे अजोड प्रेम देखील समजावून सांगितले.

 

upamma-virdi-marathipizza02
pagalparrot.com

 

गेल्या दोन वर्षांपासून तिचा चहाचा व्यवसाय सुरु असून ऑस्ट्रेलियात तिचा चहा सर्वाधिक लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे, आपले कॉर्पोरेट वकीलीचे कामही तिने सुरुच ठेवले आहे.

लोकांच्या मते, मेहनत आणि सोशल मीडियावरील कॅम्पेनच्या प्रसिद्धीमुळे ती दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.

वास्तविक, विर्दीचे चहाबद्दलची आत्मियता ही पिढीजात वारशाने मिळाली आहे. विर्दीचे आजोबा आयुर्वेदीक डॉक्टर होते. ते मसाल्यांचे तज्ज्ञ असल्याचे सांगितले जाते.

तिच्या अजोबांकडून मिळालेला हा वारसा तिने जोपासला, अन् आता ती प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. विर्दीच्या मते,

चहा हे दोन लोकांमधील मतभेद मिटवून त्यांना एकत्र आणण्याचे प्रभावी माध्यम आहे.

 

verdi australia inmarathi
amar ujala

 

विर्दीने या कामाची सुरुवात केली, तेव्हा तिच्या कुटुंबियांकडूनही विरोध झाला.

कारण, भारतात ‘चहावाला’ या शब्दाला कमी दर्जाची कामे करणारा व्यक्ती म्हणून ओळखले जाते, असे ते मानत. विर्दी सांगते की,

माझ्या आई-वडिलांना याबद्दल आक्षेप होता. पण भारतातील प्रत्येक ‘चहावाला’ एखाद्या उद्योजकांप्रमाणेच आहे. कारण, त्यांच्यामध्येही एखाद्या कसलेल्या उद्योजकाचे गुण असतात.

 

upamma-virdi-marathipizza04
m.patrika.com

 

आणि याच विचाराने पुढे जात आज तिने चहाला थेट आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली आहे!

आणि हलक्या दर्जाचे काम म्हणून ज्याला हिणवले जात असे त्या चहाच्या धंद्याला थेट उद्योजकीय वलय प्राप्त करून दिले आहे, तिच्या या मेहनतीचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

हे वाचून तुम्हाल नक्कीच खात्री पटली असेल की एक छोटीशी कल्पना सुद्धा किती मोठं यश मिळवू शकते, फक्त मेहनतीची तयारी हवी, आणि बिझनेस म्हंटल की पडेल ते काम करायची तयारी हवी!

 

chai valli inmarathi
Yourstory

 

तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता, या तरुणीसारखी जिद्द तुमच्या अंगी असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता!

म्हणायला गेलं तर चहा ही अगदी सामान्य गोष्ट जी सगळेच पितात पण या तरुणीने त्या चहाला अगदी फेमस ड्रिंक्स च्या रांगेत नेऊन बसवलं!

त्या चहाला एक वेगळाच ग्लॅमरस आणि थोडा देशी अंदाज देऊन तो परदेशी लोकांना प्यायला लावला आणि त्याची चटक सुद्धा लावली हे ही नसे थोडके!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?