Freedom 251 – घोटाळा की स्पर्धकांची ईर्ष्या?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

2016 च्या ऑक्टोबर महिन्यात एक सगळ्यांनाच धक्का देणारी बातमी सगळीकडे धडकली. रिंगिंग बेल्स ह्या टेलिकॉम कंपनीने एक नवीन अँड्रॉइड फोन आणला. आकर्षक वैशिष्ट्ये असलेल्या ह्या फोन ची किंमत फक्त 251 रु होती. ह्यामुळेच विकसनशील असलेल्या भारतातील लोकांनी मोठ्या संख्येने फोनची ऑर्डर दिली. काहींच्या मनात तेव्हाच पाल चुकचुकली तर काहींनी आशेने पैशे भरायची तयारी ठेवली. ही बघा त्या फोनची झलक:

InMarathi Android App

freedom 251 a marathipizza

Source

ह्या फोनचे स्पेसिफिकेशन्स खालील फोटोत बघा :

Ringing-Bells-Freedom-251 specification marathipizza

Source

होता की नाही आकर्षक? पण – हे स्वस्त स्वप्न पुर्ण नाही होऊ शकलं.

फोनच्या पहिल्या बातमीपासुनच हे काहीतरी गौडबंगाल आहे अशी चर्चा सुरु झाली. मोठमोठ्या कंपन्या हजारोंमध्ये मोबाईल विकतात मग हा नवीन उद्योजक एवढं स्वस्त कसं विकू शकतो? उत्तरादाखल कंपनीचे डायरेक्टर अशोक चड्डा ह्यांनी स्थानिक पातळीवर मोबाईल तयार केल्यामुळे किंमत कमी असल्याचं सांगितलं. ह्या उत्तराने असमाधानी असलेल्या किरीट सोमैय्यांनी ह्या कंपनीला एक घोटाळेबाज कंपनी असं नाव दिलं.

आकडेवारी सांगायची झाली तर २५१ रुपयांना मिळणाऱ्या ह्या फोनसाठी तब्बल ७.५ कोटी लोकांनी नाव नोंदवलं. पहिल्या टप्प्यात २ लाख मोबाईल ग्राहकांपर्यंत पोहोचवणार असल्याचं सांगितलं होतं. तेव्हाच्या पहिल्या बॅच मध्ये ६५००० मोबाईल कंपनीने ग्राहकांकडे पाठवले.

पण ७.५ कोटी मोबाईल पोहोचवायचं उद्दिष्ट पुर्ण करण्याबाबत शंका तेव्हा कंपनीच्या डायरेक्टर मोहित गोयल ह्यांनी व्यक्त केली होती.

FREEDOM 251 marathipizza

किरीट सोमैय्या ह्यांनी मार्च २०१६ मध्ये केलेल्या तक्रारीमुळे FIR नोंदवल्या गेली. IPC च्या कलम ४२० आणि Information Technology Act अंतर्गत गुन्हा नोंदवल्या गेला. हा गुन्हा कंपनीचे डायरेक्टर मोहित गोयल आणि अशोक चड्डा ह्यांच्या सोबतच अजून ३ जणांविरुद्ध होता. तेव्हा फक्त डायरेक्टर गोयल आणि चड्डा ह्यांचे पासपोर्ट जप्त केले होते. वाढत्या पुढे २०१६ च्या डिसेंबर मध्ये गोयल ह्यांनी कंपनीतून माघार घेतली. त्यांच्यासोबत त्यांची बायको धारणा गर्ग ज्या कंपनीच्या CEO म्हणून काम करत होत्या त्यांनी सुद्धा राजीनामा दिला.

कंपनीच्या डायरेक्टर ह्यांना Enforcement Directorate आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने बोलावून विचारपूस केली. मोहित सांगतात,

आमच्या उत्पादनाची सगळी माहिती दिल्यावर त्यांनी नंतर आम्हाला काही त्रास दिला नाही. पण कुणीतरी आहे ज्यांना आम्ही बिझनेस करू नये असं वाटतं. मोबाईलसाठी लागणारे काही भाग बाहेरील देशांमध्ये बनवले जातात ते आणण्यासाठी बाहेर जात येत नाहीये. आमचे पासपोर्ट एका वर्षांपासून जप्त केले आहेत. आम्ही पुढचं काम करू शकत नाही.

mohit goel ringing bells arrested marathipizza

Source

Freedom २५१ च्या घटनांनी काल अचानक वेग घेतला, मोहित गोयल ह्यांना पोलिसांनी अटक केली. ह्या अटकेची माहिती घेतल्यावर असं कळलं की “आयाम इंटरप्रायझेस” नावाच्या कंपनीने केलेल्या तक्रारीत कंपनीच्या चार डायरेक्टर आणि CEO ह्यांची नावं आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406, 467, 468, 471 and 120 (b) नुसार केलेल्या तक्रारीबद्दल आयाम इंटरप्रायझेस कडून माहिती मिळाली की

आम्हाला रिंगिंग बेल्स च्या गोयल ह्यांच्याकडून Freedom २५१ च्या डिस्ट्रिब्युटरशिप साठी ऑफर आली होती. आम्ही वेगवेगळ्या वेळी एकूण ३० लाख रुपये RTGS मार्गाने रिंगिंग बेल्स ला दिले होते. पण मोबदल्यात कंपनीने १३ लाखांचा माळ आम्हाला पुरवला.

ह्या प्रकारावर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मोहित गोयल ह्यांनी सध्या माझा आणि रिंगिंग बेल्स ह्या कंपनीचा काहीही संबंध नाही असं स्पष्ट केलं. आता मोहित आणि अशोक चड्डा ह्यांनी मिळून MDM Electronics Private Limited नावाची एक नवीन कंपनी उघडली असून त्याद्वारे आम्ही लोकांपर्यंत Freedom २५१ पोहोचवु. कंपनीच्या पुढील वाटचालीबद्दल मोहित सांगतात..

आता नवीन आलेल्या तंत्रज्ञानामुळे 3G फोन्स मध्ये काही सुधारणा कराव्या लागणार आहेत. आम्ही त्या सुधारणा करून नवीन 4G फोन्स आणणार आहोत. ह्यांनी मूळ किंमतीत फक्त 100 ते 125 रुपयांची वाढ होऊ शकते. ज्यांनी मला व्यवसायाच्या बाहेर काढायची योजना केली होती त्यांनी मला 10 ते 20कोटी रुपये पण देऊ केले होते पण मी ते घेतले नाही. आणि आता त्यांच्यामुळेच मला ह्या त्रासाला सामोरं जावं लागतंय.

गोयल ह्यांचा एक वाद दिल्लीच्या एका कंपनीशी सुद्धा आहे जी त्यांच्यासाठी मोबाईल बनवते. त्यांचा एकूण व्यवसाय ठप्प असल्यामुळे नुकसान भरपाईसाठी पटियाला कोर्टात त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवणार आहेत. आता मोहित असं सांगतात की ज्या एका वर्षात आमची पासपोर्ट्स पोलिसांनी जप्त केली त्या वर्षात आम्ही मोबाईलच्या काही महत्वाच्या कामासाठी बाहेर जाणार होतो. आम्हाला झालेला तोटा खूप होता. आता आम्ही किरीट सोमैय्या ह्यांना भरपाई करण्यासाठी विचारू.

ह्या व्हिडीओ मध्ये, हिंदुस्थान टाइम्सशी मोहित गोयल बोलताना दिसत आहेत.

दोन्ही कडून होणारे दावे आपल्याला अजूनच confuse करतायत. शेवटी खरं काय?

Freedom 251 – घोटाळा की प्रस्थापित दिग्गज स्पर्धकांची ईर्ष्या?

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 53 posts and counting.See all posts by abhidnya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *