' पाकिस्तानी आर्मी ऑफिसरची बायको आणि एक धाडसी ‘डिटेकटीव्ह’! – InMarathi

पाकिस्तानी आर्मी ऑफिसरची बायको आणि एक धाडसी ‘डिटेकटीव्ह’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

२०१८ साली आलेला आलीय भट आणि मेघना गुलज़ारचा ‘राज़ी’ हा सिनेमा तुम्हाला ठाऊक असेलच! ह्या चित्रपटाची कहाणी ही हरिंदर सिक्का ह्यांची कादंबरी ‘कॉलिंग सहमत’ ह्यावर आधारित होती.

हरिंदर सिक्का हे स्वतः एक नेवी ऑफिसर राहिले आहेत. ही कादंबरी एका काश्मिरी मुलीवरअसून कादंबरीतील ह्या मुलीचं नाव सहमत खान आहे. जिची भूमिका आलियाने ह्या चित्रपटात निभावली होती!

 

raazi 2 inmarathi
bookmyshow

 

जगभरातील देशातील सुरक्षा एजन्सीज इतर देशांपासून आपल्या देशाची सुरक्षा करण्यासाठी इतर देशांची हेरगिरी करतात, जसे की पाकिस्तान. हरिंदर सिक्का ह्यांची कादंबरी ‘कॉलिंग सहमत’ ह्यातील सहमत खान एक अशीच गुप्तहेर आहे.

आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जरी कादंबरी असली तरी ती खोटी किंवा काल्पनिक नसून – एका खऱ्या महिलेवर आधारित आहे.

 

indian spy inmarathu
defencelover

 

ह्या महिलेची ओळख ही गुप्त ठेवण्यात आली आहे. ती एक गुप्तहेर बनून पाकिस्तानात राहिली आणि भारताला काही महत्वपूर्ण माहिती दिली.

सोबतच त्या अश्या काही गुप्तहेरांपैकी एक आहेत जे पाकिस्तानात गुप्तहेरी करून भारतात परतू शकले. ही माहिती स्वतः सिक्कांनी ‘द हिंदू’ ला दिलेल्या मुलाखतीत दिली.

 

sehmant inmaraathi
kobo.com

 

१९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या सेनेला एका अश्या गुप्तहेराची गरज होती जो पाकिस्तानात राहून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवेल आणि त्यांची माहिती आपल्यापर्यंत पाठवेल.

पण सहमत खान ह्या एका साधारण मुली सारख्या होत्या. त्यांनी कधीही हेरगिरी करण्याचा विचार देखील केला नव्हता. ज्यादरम्यान त्या कॉलेजात शिकत होत्या तेव्हाच त्यांच्या वडिलांनी त्यांना एक गुप्तहेर होण्यासाठी विचारले होते.

त्यांना तर “गुप्तहेर” म्हणजे काय, हे देखील माहित नव्हते. पण देशाकरिता त्यांनी हे करण्याचा निश्चय केला गेला!

 

alia bhat inmarathi
nation next

 

अश्या पार्श्वभूमीवर त्यांनी देशासाठी देशाच्या सुरक्षेसाठी एक गुप्तहेर बनण्याचा निश्चय केला, हे खरंच खूप आश्चर्यकारक आणि तेव्हढेच प्रेरणादायी देखील आहे.

ह्यानंतर सहमत ह्यांचे लग्न एका पाकिस्तानी सेनेच्या अधिकाऱ्याशी लावून दिले गेले. हे खरंच किती भीतीदायक आहे. म्हणजे ज्या देशाची गुप्तहेर म्हणून तिला पाठविण्यात येणार होते त्याचं देशाच्या आर्मी ऑफिसरशी तिला लग्न करावं लागलं.

ह्याने तर तिच्यावरील धोका आणखी वाढला, तरी तिने हे ध्यैर्य दाखवलं. ती त्या आर्मी ऑफिसरशी लग्न करते आणि त्याच्याच घरी पाकिस्तानात राहून पाकिस्तानी सेनेची महत्वपूर्ण माहिती अगदी गुप्तपणे भारतीय सेनेला पुरवते.

 

alia bhatt razi inmarathi
the print

 

त्यांनी देशासाठी आपले प्राण पणाला लावले, आपला जीव धोक्यात घातला. कारण शत्रुच्याच छावणीत त्याचे आप्त बनून त्याचीच जासुसी करणे हे काही सोपे नाही.

तिने आपल्या जीवनात अनेक भूमिका अगदी चोख पार पडल्या त्यातील एका देशभक्ताची भूमिका ही सर्वात उत्कृष्ट ठरली. त्यांच्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचविणे शक्य झाले.

जेव्हा त्या भारतात परतल्या तेव्हा त्या गर्भवती होत्या. ज्यानंतर त्यांनी एका मुलाला जन्म दिला. त्यांच्या मुलामध्ये देखील देशभक्तीचं बीज पेरलं गेलं होतं. म्हणून त्याने देखील मोठं होऊन भारतीय सेनेत रुजू होऊन देशाची सेवा केली.

 

raazi couple inmarathi
film companion

 

ही कादंबिरी लिहिणारे हरिंदर सिक्का ह्यांना ही कादंबरी लिहिण्याची प्रेरणा तेव्हा मिळाली जेव्हा ते कारगिल युद्धाबाबत रिसर्च दरम्यान सहमत खान ह्यांच्या मुलाला भेटेले.

===

त्यांच्याच मुलाने आपल्या आईच्या ह्या कार्यावर प्रकाश टाकला आणि त्याचं कार्य सर्वांसमोर आणलं. त्यानंतर सिक्का हे त्यांना भेटण्याकरिता पंजाब येथील मलेरकोटला येथे पोहोचले.

पण त्यांना बघून सिक्का ह्यांना जरा देखील वाटले नाही की त्या एक गुप्तहेर होत्या. कदाचित म्हणूनच त्या पाकिस्तानी आर्मी ऑफिसर आणि तिथल्या इतर लोकांना देखील त्यांच्यावर कधी संशय आला नाही.

 

sehmat reel inmarathi
india tv

 

कारण त्यांच्यात असं काहीच नव्हतं ज्यावरून त्या एखाद्या गुप्तहेर वाटतील. ( – हेच तर एका उत्कृष्ट गुप्तहेराचं कसब असतं, नाही का? 🙂 )

आज त्यांचे हे शौर्य चित्रपटाच्या मध्यातून संपूर्ण जगभर दाखवले गेलं. सहमत खान ह्यांची ही कहाणी देखील देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती द्यायलाही न घाबरणाऱ्या त्या इतर गुप्तहेरांप्रमाणे अंधारातच राहिली असती!

जर हरिंदर सिक्का ह्यांनी ती पानावर उतरविली नसती. ही कादंबरी पूर्ण करायला हरिंदर सिक्का ह्यांना ८ वर्ष लागले.

 

harinder singh sikka inmrathi
film companion

 

हे गुप्तहेर जे देशाच्या रक्षणासाठी सुरक्षेसाठी आपला जीव धोक्यात टाकायला जरा देखील घाबरत नाहीत, जे त्यांच्या कुटुंबापासून नेहेमी दूर असतात, जे देशासाठी आपला जीव गमावतात पण तरी त्यांना साधी ओळख देखील मिळत नाही,

त्या सर्वांच्या अतुलनीय कामाची पावती म्हणजे हा चित्रपट… ज्याद्वारे भारतीय गुप्तहेरांचे जीवन आणि त्यांची देशभक्ती जगासमोर आली!

त्यामुळे अशा चित्रपटातून या अशा पडद्यामागच्या लोकांना प्रकाशझोतात आणण्याचं काम मेघना गुलजार आणि आलिया भट या दोघींनी मिळून केलंय!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?