या राजाने तहाची मागणी धुडकावून लावत अवघ्या ४ तासात मुघल सैन्याची दाणादाण उडवली होती!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


हळदीघाटीची लढाई ही भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. महाराणा प्रताप यांच्या नेतृत्वाखालील राजपूत सैन्याने अकबराची तहाची मागणी धुडकावून लावत मुघल सैन्याची अवघ्या चार तासांत दाणादाण उडवली होती.

राजपूत सैन्याचा निष्ठावानपणा हा त्यांच्या मातृभुमी संरक्षणाचे प्रतिक होता.

भारतीय इतिहासाची साक्ष देणाऱ्या या लढाईची सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

हळदीघाटी हे अरवली पर्वतरांगांच्या कुषीत वसलेले लहानसे गाव. समुद्रसपाटीपासून १८९३ मीटर उंचीवर असलेल्या या गावात दक्षिण-पूर्व असा एक किमीचा असलेला अरूंद मार्ग होता ज्याला आपण घाट म्हणू शकतो.

तो घाट हळदीघाट या नावाने ओळखला जात असे. या घाटाचा भौगोलिक गुणधर्म म्हणजे त्याठिकाणी असलेली नरम पिवळी माती. या पिवळया मातीमुळेच या भागाला हळदीघाट असे नामाभिधान झाले आहे.

 

haldighati-inmarathi
navodayatimes.in

या हळदीघाटमध्ये १८ जुन १५७६ साली मेवारचे राजे महाराणा प्रतापसिंग प्रथम व दिल्लीचे सम्राट अकबर यांच्या सैन्यामध्ये चार तासांची महत्त्वपूर्ण लढाई झाली होती. ती लढाई हळदीघाटची लढाई या नावाने प्रसिध्द आहे.

१५०० च्या दशकाचा कालखंड हा मुघलांसाठी विलक्षण यशदायी ठरत होता. तर राजपूत साम्राज्यासाठी मात्र हा कालखंड तितकासा अनुकूल नव्हता.

त्यामुळे या दशकाच्या मध्यावर सम्राट अकबराने मेवार सोडून अन्य राजपूत साम्राज्यांना आपल्या साम्राज्याचा भाग होण्यास भाग पाडले होते. संपूर्ण भारतावर सत्ता गाजविण्याबरोबरच मेवार हे प्रमुख राज्य आपल्या अधिपत्याखाली आणण्यासाठी सम्राट अकबर प्रयत्नशिल होता.


त्याने त्यासाठी अनेकदा बलपूर्वक प्रयत्न केले पण तो मेवार जिंकण्यात अयशस्वी ठरला.

राजस्थानमधील चितोडगढ येथे मुघलांचा पराभव आधीच झालेला असल्यामुळे त्याठिकाणची सुपीक जमिन व डोंगराळ भाग हे मेवार साम्राज्यात समाविष्ट होते. पण मेवारमार्गे गुजरातला जाण्यासाठी स्थिर मार्ग मिळविण्याचा अकबराचा इरादा होता.

त्यामुळे १५७३ मध्ये सम्राट अकबराने आपली रणनिती बदलली व महाराणा प्रतापांकडे आपले शांतीदूत पाठविले आणि तहाची मागणी केली.

 

akbar-inmarathi
indiatoday.in

महाराणा प्रताप तह करण्यासाठी अनुकूल होते परंतु सम्राट अकबर हा अन्य कोणत्याही राजपूत साम्राज्यावर अधिराज्य प्रस्थापित केल्यानंतर ठरलेल्या अटींप्रमाणे वागलेला नव्हता. त्यामुळे त्यांनी काहीही झाले तरी मेवार आपले बलिदान देणार नाही, अशी खंबीर भुमिका घेतली.

परिणामी, सम्राट अकबर कमालीचा निराष झाला व त्याने आपले सैन्य गोळा केले व युध्द अपरिहार्य ठरले. मुगल जनरल असफ खान, मान सिंग यांना मेवार नष्ट करण्याचा आदेश अकबराने दिला.

३ मे रोजी मुघल सैन्य दक्षिणेकडे हळदीघाटकडे निघाले. त्याठिकाणी महाराणा प्रतापसिंग यांच्या कुम्भलगढची तात्पुरती राजधानी होती.

१८ जुनला सूर्याेदयापूर्वी मुघल सेना पोहचण्याच्या प्रयत्नात होती. तोपर्यंत महाराणा प्रताप हे सैन्य, घोडदल, हस्तीदलासह युध्दासाठी सज्ज
होते. प्रतापसिंह यांचे सैन्य हळदीघाटच्या गर्भात थांबून युध्दाचे आदेश मिळण्याची वाट पाहत होते.

तर स्वतः महाराणा प्रतापसिंह हे आपल्या पौराणिक योध्दयाच्या पोषाखात ज्यात चिलखत, टोप व अन्य युध्दसज्ज शस्त्रांसह त्यांचा घोडा चेतकवर बसून लढण्यासाठी तयार होते.

चेतक घोडयाला देखील विषिष्ट प्रकारचे मास्क व चिलखत घालण्यात आले होते जेणेकरून त्याने शत्रू सैन्याला घाबरवावे व  शत्रूंच्या हत्तीदलापासून स्वतःचे संरक्षण योग्य रितीने करावे.

 

maharana-army-inmarathi
ranapratap.com

बघता बघता मुघल सैन्य अत्यंत जवळ पोहचले व त्यांच्या भल्या मोठया सेनेचा गडगडाट होऊ लागला. उडत असलेल्या धुळीमुळे आभाळात पिवळे ढग दिसू लागले जे सूर्यप्रकाशाच्या छटा दर्शवित होते.

महाराणा प्रताप यांनी त्यांचा गट काझी खानच्या सैन्याला युध्द हत्तींच्या सुरक्षाकवचासह रणांगणात आणले व काही क्षणात युध्दाला सुरूवात झाली. चक्रीवादळ भूभागावर फिरावे असा तो विस्मयकारक प्रसंग होता.

तलवार, भाल्यांचे आवाज व सैन्याची कापले जाणारे देह हे चित्र अंगावर काटा आणणारे होते. पण त्यावेळी महाराणा प्रतापांच्या सैन्याचा एक गट शत्रूच्या सैन्याला जाऊन मिळाला.

परंतु महाराणा प्रतापच्या सैन्याने लढा सुरू ठेवला. शत्रूला आपल्या नुकसानाची कल्पना येताच त्यांनी पळ काढण्यास सुरुवात केली व नदीच्या पलिकडे जात १६ किलोमीटरपर्यंत ते थांबले नाही.

त्यामुळे शत्रूचा निर्विवाद विजय रोखण्यात महाराणा प्रताप यांना यश आले व त्यांनी आपल्या सैन्याना पुन्हा शत्रूपर्यंत पाठवले व युध्दाला सुरूवात झाली. महाराणा प्रताप यांच्या सैन्याने मुघलांच्या हत्तीचा वध केला.

 

pratap-inmarathi
freepressjournal.com

शत्रूच्या तोफखान्याबरोबरच मान सिंगला भिडण्याच्या प्रयत्नात असलेल्या महाराणा प्रताप व त्यांच्या सैन्याने शत्रूंवर प्रभुत्व मिळवले होते. अखेर महाराणा प्रताप हे चेतकवरून मॅनसिंगपर्यंत पोहचले व त्यांनी आपल्या तलवार आणि भाल्याव्दारे क्रोध व्यक्त केला, मान सिंगला कायमचे आडवे पाडले.

चेतक घोडा युध्दात जखमी झाला होता पण महाराणा प्रताप व सैन्य त्याला सावरण्याचा प्रयत्न करीत होते. त्याचा एक पाय जवळपास निकामा झाल्याने तीन पायांवर तो कार्यरत होता.

त्यानंतर महाराणा प्रताप यांनी आपल्या मुख्यालयाकडे जाण्याचा निर्णय घेतला तोच इंपिरीयल रांगांच्या मागील बाजूकडून केटलड्रम्सचा गोंधळ होत असल्याचे त्यांना दिसले. तो मुघलांचा आरक्षित प्रदेष होता. तरीही महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत लढा देण्याचा निर्णय घेतला व युध्द सुरूच राहिले.

अखेरीस जखमी सैन्यांवर उपचाराची व्यवस्था कोलियारी या गावात करण्यात आली. त्यानंतर थकलेले व जखमी महाराणा प्रताप हे मेवार सैन्यासह टेकडयांमध्ये अदृष्य झाले.


या लढाईत अखेरपर्यंत संघर्ष करणाऱ्या चेतक घोडयाचा अंत झाला. महाराणा प्रताप यांना देखील सात गंभीर जखमा झाल्या होत्या.

मुघलांसाठी हा तात्पुरता विजय ठरला खरा पण ते महाराणा प्रताप यांना मेवारमधून बाहेर काढण्यात असमर्थ ठरले. शिवाय शौर्याच्या खऱ्या लढाईचे प्रदर्शन महाराणा प्रताप यांच्या सैन्याने केले होते.

 

maharana-pratap-inmarathi
aajtak.com

महाराणा प्रताप यांनी शत्रूची दाणादाण उडवत दाखविलेले शौर्य व पराक्रमाचे कसब त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचसाठी देखील प्रेरणादायी ठरले.

हा संघर्ष पुढेही सुरू राहिला पण हळदीघाटची लढाई प्रत्येकाच्याच स्मरणात राहिली. या लढाईत सुमारे १० हजार पुरूष सैन्य, ४०० भिल तिरंदाज, ३ हजार घोडे व हत्ती देखील सहभागी झाले होते. 

कालांतराने गोगंडा, उदयपूर व कुम्भलगढ हे मुघलांच्या ताब्यात गेले पण १५७९ नंतर मुघल साम्राज्य आपल्या साम्राज्य क्षेत्रातील अन्य भागात स्थलांतरीत झाल्याने महाराणा प्रताप यांनी पश्चिमेकडील गमावलेला प्रदेश परत मिळवला.

हळदीघाटच्या लढाईला मुस्लिम मुघल विरूध्द हिंदू राजपूतांच्या सन्मानाचे प्रतिक मानले जाते.

हळदीघाटची लढाई आंतरीक लढाऊ प्रांतांच्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम मानली जाते. देवगडच्या चोखा यांनी या लढाईचे पारंपारिक चित्रण केले असून लढाईत वापरण्यात आलेली शस्त्रे व अन्य साहित्य हे उदयपूर येथील संग्रहालयात ठेवण्यात आले आहे.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?