NIKE च्या Just Do It ह्या टॅगलाईन मागे दडली आहे एका हत्याकांडाची कथा!

===

===

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

Nike या ब्रांडची संपूर्ण जगात एक वेगळीच ओळख आहे. हा जगातील सर्वाधिक लोकांचा आवडता ब्रांड मानला जातो. Nike हा एथलेटिक कपडे आणि स्पोर्ट शूज चा सर्वात मोठा उत्पादक आहे. तर अधिकाधिक एथलेटिक्स देखील या ब्रांडला आपली पहिली पसंती देतात.

InMarathi Android App
nike05-marathipizza
businessinsider.in

Nike ला पोर्टलंड स्टेट विद्यापीठाच्या कार्लीन डेविडसन या विद्यार्थ्याने डिझाईन केलं होत. १९७१ साली बनविण्यात आलेल हे डिझाईन त्याने केवळ ३५ डॉलर मध्ये बनवून दिल होत.

त्याचा Swoosh Logo आणि ‘Just Do It’ या घोषणेच्या जोरावर Nike ने विश्वस्तरावर आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. या ब्रांड बद्दल खूप गोष्टी तुम्हाला माहित असतील पण आज आम्ही तुम्हाला Nike बद्दल एक अशी गोष्ट सांगणार आहोत जी तुमच्यासाठी अतिशय धक्कादायक असेल.

===
===
nike01-marathipizza
thingpic

तुम्हाला हे वाचून आश्चर्य होईल की Nike या ब्रांडचं प्रसिद्ध स्लोगन म्हणजेच घोषवाक्य ‘Just Do It’ हे काही असच ठेवण्यात आलं नाही तर याची आयडिया एका हत्याकांडापासून प्रेरित आहे. बसला न धक्का, अहो पण हे खर आहे. Advertising Agency विडेन केनेडीच्या को-फाउंडर डेन विडेन यांनी एका मॅगजीनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे.

त्यांनी सांगितले की १९७७ साली गैरी गिलमोर नावाच्या हत्याऱ्याने पोर्टलँडमध्ये कितीतरी लोकांना जीवानिशी मारून टाकलं. तर, फायरिंग टीमने कित्येक लोकांना मृत्युची शिक्षा देऊन त्यांना तुरुंगात पाठवले. तोच हत्यारा खून करायच्या आधी हा स्लोगन बोलायचा, त्याच  स्लोगनला आता Nike च स्लोगन बनविण्यात आलं आहे.

nike06-marathipizza
businessinsider.in
===
===

विडेन सांगतात की ,

तुरुंगात कैद असलेल्या एका व्यक्तीला फायरिंग टीम ने विचारल की तुम्ही मरण्याआधी काही बोलू इच्छिता, तर त्या व्यक्तीच उत्तर होत ‘Let’s do this’… कंपनीला टॅग लाईन देताना मला त्या व्यक्तीचे शेवटचे शब्द आठवले, पण मला ‘Let’s do this’ आवडल नाही तर मी ते बदलून ‘Just do it’ केलं. बघता बघता या स्लोगनने कंपनीला खूप प्रसिद्ध बनवले.

nike04-marathipizza
facebook

खरंच Nike या ब्रांडच्या या स्लोगन मागील कहाणी धक्कादायक आहे,पण याच स्लोगनने Nike या ब्रांड ला एवढी प्रसिद्धी मिळवून दिली हेही तेवढेच खरे आहे.

यावरून हेच दिसून येत ही प्रेरणा ही कुठल्याही गोष्टीपासून मिळू शकते, आता हे आपल्यावर अवलंबून असते की आपण त्याचा कशाप्रकारे उपयोग करतो.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *