MDH च्या जाहिरातींमधील म्हाताऱ्या काकांचा तुम्हाला माहित नसलेला जीवन प्रवास….!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===


मसाले हा गृहिणींच्या स्वयंपाकी जीवनातील एक महत्त्वाचा घटक असतो. जेवण रुचकर आणि स्वादिष्ट बनवण्याचे काम हे मसाले करतात. चांगल्या प्रतीचा आणि योग्य मसाला हा जेवणामध्ये जणू जीवच टाकतो. आपण बाजारात नवनवीन वेगवेगळे मसाले पाहतो. पण त्या मसाल्यांची प्रत किती चांगली असेल याचा आपल्याला अंदाज नसतो, त्यामुळे आपण जास्तकरून जे जुने मसाले आपण वापरत आहोत, तेच चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो.

मसालांच्या जाहिराती सुद्धा टीव्हीवर आजकाल खूप येतात आणि त्यातील एक जाहिरात म्हणजे एमडीएचची जाहिरात! एमडीएचच्या जाहिरातीमधील एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की, त्यामध्ये नेहमी एक लाल पगडी घातलेला कानापर्यंत लांब मिश्या असलेला वृद्ध मनुष्य तुम्हाला दिसला असेल.

हा मनुष्य कोण आहे ? हा प्रश्न नेहमी तुमच्या मनात पडला असेल, तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हा मनुष्य म्हणजे महाशिआन डी हत्ती (एमडीएच) मसाल्यांचे संस्थापक सर धरमपाल गुलाटी हे आहेत.

 

 

MDH gulati.marathipizza
mdhspices.com

गुलाटी हे भारतातील सर्वात जुने उद्योजक आहेत. २०१५-१६ मध्ये सर्वाधिक वेतन दिले जाणारे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत आणि भारतातील मसाले व इतर साहित्य उद्योगातील सर्वात प्रमुख नाव आहे.

पण भारताचा अग्रगण्य मसाल्यांचा राजा बनणे काही सोपे काम नव्हते. खरे तर भारतातील लोकांना प्रेरणा देणारी ही त्यांची प्रसिद्ध गोष्ट आहे, जी आज आपण जाणून घेणार आहोत.

धरमपाल गुलाटी यांचा जन्म २७ मार्च १९२३ मध्ये पकिस्तानच्या सियालकोट येथे झाला होता. तिथे त्यांचे वडील महाशिआन डी हत्ती नावाचे छोटेसे मसाल्याचे दुकान चालवत होते, त्यांनी हे दुकान १९१९ मध्ये सुरू केले होते.

पण भारत-पाकिस्तान विभाजनानंतर गुलाटी कुटुंबियांना खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. विभाजनामुळे त्यांच्या कुटुंबियांची खूप फरफट झाली. त्याचवेळी सांप्रदायिक युद्धाला सुरुवात झाली, एकाच रात्री त्यांची लहान आतेबहीण आणि आत्या यांच्यावर या सांप्रदायिक युद्धाच्या नवाखाली बलात्कार करण्यात आले आणि त्यांना ठार मारण्यात आले आणि त्यांच्या कुटुंबियांचे जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. त्यानंतर ते दिल्लीला आले, पण या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या व्यवसायाची पूर्णपणे राखरांगोळी झाली होती.


पाकिस्तानातून आल्यामुळे येथील लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. ते लोक पाणीपुरवठा, वीज पुरवठा आणि शौचालयाची कोणतीही सुविधा नसलेल्या कच्च्या भाड्याच्या घरामध्ये राहत होते.

गुलाटी यांच्या वडिलांनी मरण्यापूर्वी गुलाटी यांना १५०० रुपये दिले होते, त्या पैशांनी त्यांनी एक टांगा (घोडागाडी) खरेदी केला आणि या टांग्याने ते प्रवाश्यांना करोल बाग ते कनॉट प्लेसपर्यंत सोडत असत. पण यामधून त्यांचा फायदा होत नसे, त्यानंतर लवकरच त्यांची आई न्युमोनियामुळे मरण पावली.


MDH gulati.marathipizza1
si.wsj.net

आता रोज लोक त्यांचा अपमान करू लागले होते, म्हणून त्यांनी आपली घोडागाडी विकली आणि जुन्या खान रस्त्यावर त्याच नावाने एक छोटे नवीन दुकान उघडले. महाशिआन डि हत्ती (एमडीएच) याचा पंजाबीमध्ये अर्थ होतो, एक उदारमतवादी माणसाचे दुकान. या उपक्रमामुळे त्यांना गरजेचा असलेला वित्तीय फरक कमी होण्यास मदत झाली.

त्यानंतर प्रारंभिक यश मिळाल्यानंतर १९५८ मध्ये त्यांनी चांदणी चौकमध्ये अजून एक दुकान भाड्याने घेतले. १९५९ मध्ये त्यांनी महाशिआन डि हत्ती प्रायव्हेट लिमिटेड आणि एमडीएच स्पाइसेस एम्पायर नावाने स्वतःचा कारखाना सुरु केला.

आज त्यांची घरगुती साहित्य विकणारी फर्म ५० पेक्षा जास्त पदार्थांचे पॅकिंग अमेरिका, कॅनडा, यूके आणि युरोप या ठिकाणांवर निर्यात करते, तसेच ते भारतातातील सर्वात फास्ट-मूविंग कन्झ्युमर गुड्स सुद्धा आहे.

 

MDH gulati.marathipizza2
img.etimg.com

गुलाटी यांनी स्वतःचे महाशयी चूनीलाल चॅरीटेबल ट्रस्ट उघडले आहे, त्यामध्ये २५० खाटांचे रुग्णालय आहे, तसेच झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी मोबाईल हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. गुलाटी हे दिल्लीमध्ये ४ शाळा चालवतात आणि गरजू लोकांना विविध फाउंडेशन व चॅरीटेबल ट्रस्टमार्फत मदत पोहचवतात.

गुलाटी यांचे आयुष्य खूप चढ -उताराने भरलेले होते, पण त्यामधूनच त्यांनी योग्यप्रकारे रस्ता काढून एक नवीन विश्व निर्माण केले. आजपर्यंत आपण त्यांना फक्त मसाल्याच्या जाहिरातीमधील एक जुने म्हातारे काका समजत होतो, पण हे वाचल्यावर नक्कीच तुम्हाला त्यांच्याविषयी आदर वाटेल.

 


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
One thought on “MDH च्या जाहिरातींमधील म्हाताऱ्या काकांचा तुम्हाला माहित नसलेला जीवन प्रवास….!

  • September 27, 2018 at 11:48 pm
    Permalink

    धन्यवाद इनमराठी

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?