करोना : लॉकडाऊनमुळे वाढलेल्या नकारात्मकतेचा दूरगामी परिणाम होऊ द्यायचा नसेल तर “हे” वाचणं आवश्यक आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या कोरोना, कोरोना, कोरोना हेच शब्द आपल्याला ऐकायला मिळत आहेत. संपूर्ण जगभरात त्याची दहशत आहे.चीनमध्ये इतके लोक गेले.आता इटलीने चीनला मागे टाकलं, कोरोना मुळे इटलीमध्ये सगळ्यात जास्त मृत्यू झालेले आहेत.

फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, स्पेन, इराण आणि अमेरिका सगळीकडे कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. आता भारतातही त्याचा परिणाम दिसून येत आहे.

भारतात आता सगळीकडे संचारबंदी लागण्याची परिस्थिती आहे. सगळ्या मीडियामध्ये न्यूज चॅनल्स, फेसबूक, ट्विटर, व्हाट्सअप, इंस्टाग्राम सगळीकडे केवळ कोरोनाच आणि त्याच्याच बातम्या आपल्याला दिसत आहेत.

 

corona virus kid inmarathi

 

लोक परदेशातले व्हिडिओज सगळीकडे शेअर करत आहेत, त्यामुळे आपल्याही मनात निगेटिव्ह विचार येत राहतात. आणि अशा काळात कसं राहावं हेच समजेनासं होतं.

परंतु हे सगळं पाहतानाही कोरोनामुळे काही काही चांगल्या गोष्टी घडत आहेत, ज्यांच्याकडे आपण डोळसपणे पाहत नाही.

जर त्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर नक्कीच आपल्या मनातील निगेटिव्हिटी निघून जाईल. आणि थोडी सकारात्मकता येईल आणि जगण्यातला आनंद परत मिळेल.

अगदी कोरोनाचा उगम जिथून झाला त्या वुहान मधील देखील काही काही चांगल्या बातम्या आल्या आहेत. त्यांच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.

आता चीनमध्ये कोरोना व्हायरसचा रुग्ण आता दिसत नाही, नवीन लागण आता तिकडे होत नाहीये. जवळजवळ ८० हजार पेक्षा जास्त लोकांना लागण होऊनही ३२०० इतके मृत्यु चीनमध्ये झाले.

 

corona dead bodies inmarathi
time

 

आता तिथली कोरोना साठी बांधलेली हॉस्पिटल्स बंद होत आहेत. एक १०३ वर्षांच्या आजीबाई कोरोनाची लागण होऊन देखील बर्‍या होऊन घरी गेल्या.

ही नक्कीच एक सकारात्मक गोष्ट आहे. कारण सगळ्यात जास्त भयानक वास्तव त्यांनी अनुभवलं पण त्यातही त्यांची जगण्याची जिद्द ही नक्कीच प्रेरणादायक गोष्ट आहे.

सध्या जमावबंदी, संचारबंदी असल्यामुळे सगळे रस्ते ओस पडले आहेत. आपल्याला वाहनांचा आवाज येत नाहीये. मात्र सकाळी उठल्यावर अगदी हल्ली तर दुपारीही आपल्याला पक्ष्यांचे आवाज येत आहेत.

थोडीशी खिडकी उघडून पाहिलं तर निरागसपणे उडणारे पक्षी आपल्याला दिसतील, थोडा अभ्यास केला तर त्यांची नावही समजतील. तुम्ही रोजच्या रामरगाड्यात कधी असे पक्षी पाहिले असते का?

 

curfew inmarathi 2
the indian express

 

जगभरातील विमान सेवा बर्‍यापैकी खंडित झाली आहे. लॉक डाऊन मुळे रस्ते ओस पडले आहेत, रस्त्यावरची वाहने कमी झाली आहेत रेल्वे बंद आहेत, वाहन विक्री देखील मंदावली आहे. गाड्या आहेत पण चालवायला मिळत नाहीये.

आपल्याला वाटू शकतं की, ‘काय वैताग आहे, जायचं कसं!’ मात्र जगभरातील प्रदूषणाची पातळी कमी होत आहे. आकाशातील काळं मळभ दूर होत आहे, स्वच्छ हवा अनुभवास येत आहे.

म्हणजे हा व्हायरस येऊन चांगलाच बदल झाला आहे म्हणायचा का?

घरामध्ये बंदिस्त बसल्यामुळे आपल्याला बोअर होऊ शकतं.

मात्र त्याचवेळेस आपण आपल्या मित्रांना मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना फोन केला आणि गप्पा मारल्या तर खूप दिवसांनी बोलल्यामुळे आपला मूड रिफ्रेश होईल. आपल्या लहानपणीच्या आठवणींना त्यामुळे उजाळा मिळेल.

 

phone call inmarathi
rebtel.com

 

तुमच्या बकेट लिस्ट मधल्या राहून गेलेल्या गोष्टी तुम्ही आता करू शकता. उदाहरणार्थ, एखादं पुस्तक वाचायचं राहिले तर ते वाचू शकता.

घरातल्यांबरोबर कॅरम, पत्ते असे विविध गेम खेळू शकता. तुमच्या आवडीचे सिनेमे डाऊनलोड करून बघू शकता. एखादी छानशी डिश बनवून सगळे मिळून त्याचा आस्वाद घेऊ शकता.

 

dancing inmarathi
persangkaraoke.com

 

त्यामुळे तुमचं एकमेकांमधलं कुटुंबातलं बॉण्डिंग वाढेल. ही नक्कीच एक चांगली गोष्ट माणसाच्या माणूसपणासाठी उपयुक्त आहे.

कोरोना व्हायरसच्या भीतीने आता मालाचा तुटवडा पडेल म्हणून लोक घरात मालाचा साठा करत आहेत.आणि ही गोष्ट फक्त भारतातलीच नसून संपूर्ण जगभरात दिसून आली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये तर मॉलमध्ये टॉयलेट पेपर घेण्यावरून भांडण झाले. तशीच परिस्थिती आता आपल्याकडे ही येऊ शकते. परंतु ह्या काळातच आपण एकमेकांना मदत केली पाहिजे.

 

kind people inmarathi
inspiremore.com

 

तुमच्या शेजारी कोण आहेत त्यांना कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे विचारलं पाहिजे आणि आपल्याकडे असल्यास ते दिले पाहिजे.

एखाद्या घरामध्ये फक्त वृद्ध जोडपे राहत असेल तर आता त्यांच्या घरी येणारी मोलकरीण किंवा सेवेकरी सध्या कदाचित येऊ शकणार नाही. मग अशा लोकांची काही मदत करता आली तर केली पाहिजे.

आपल्यालाही त्यामुळे आनंद मिळेल. त्यांना लागणाऱ्या वस्तू, भाजी, औषध आणणं किंवा जेवण पुरवणं तुम्ही करू शकता.

तुम्ही बिझनेसमन असाल किंवा छोटेसे दुकानदार, आता संचार बंदीमुळे आपल्याला आपले दुकान बंद करावे लागले असेल. मग अशा वेळेस आपला उत्पन्नाचा स्त्रोत कमी होतो.

आणि घरात बसून कंटाळा येतो यावेळेस काही ऑनलाईन सेलिंग करता येतं का किंवा बिजनेस करता येतो का हे पाहता येईल. म्हणजे ॲमेझॉन वरती असे काही ऑप्शन्स तुम्हाला मिळतील ज्यातून तुम्ही अशा प्रकारचा बिजनेस करू शकाल.

तुम्ही तुमचे छंद जोपासून त्यातून बिझनेस संकल्पना मांडू शकता.

painting inmarathi

 

कदाचित येणाऱ्या काळात हाच बिजनेस मोठा होऊ शकतो. म्हणजे कोरोना व्हायरसने एक नवीन अपॉर्च्युनिटी माणसांसाठी निर्माण केली आहे म्हणायची.

सगळ्यात जास्त मनुष्य हानी झालेल्या इटलीमध्ये. आता तिथल्या कॅनल मध्ये आता डॉल्फिन्स आणि करकोचे दिसत आहेत. रस्त्यांवर माणसं कमी असल्यामुळे पक्षी आणि प्राणी आरामात फिरत आहे, जणूकाही ही आमची देखील प्रॉपर्टी आहे हे सांगत आहेत.

आणि माणसाला सगळ्यांच्या बरोबर राहण्याचं महत्त्व पटवून देत आहेत. निसर्गानेच कदाचित ही शिकवण माणसाला देण्यासाठी कोरोना सारखा आजार आणला असेल यापासून माणसाने इतके शिकलं तरी खूप आहे.

तुम्ही प्रत्येक गोष्टीत जर सकारात्मक बघत राहिलात तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडतो. आसपास चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते.

 

happy man inmarathi
the typsy blog

 

कोरोना व्हायरसने माणसाच्या जगण्याचं बटनच रिसेट केलं आहे. पृथ्वीवर अनेक संकट आजवर आलेली आहेत मोठे आघात, दुष्काळ, अपघात, भूकंप, पूर, निराळ्या रोगांच्या साथी यांनी माणसांवर आक्रमण केलं आहे.

पण तरीही प्रत्येक वेळेस माणसाने त्यावर मात केली आहे. काळ्या ढगांना सोनेरी किनार असते, असं म्हणतात ते काही खोटं नाही.

कारण त्यामधूनच माणूस नवीन काहीतरी शिकत राहतो आजवरच्या अनेक संकटांनी माणसाला हेच शिकवले आहे.

म्हणूनच कितीही निगेटिव्हिटी आपल्या भोवती पसरली असली तरी त्यातून काहीतरी चांगलं नक्कीच निघेल यावर विश्वास ठेवला तर पुढची वाटचाल सुकर होईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “करोना : लॉकडाऊनमुळे वाढलेल्या नकारात्मकतेचा दूरगामी परिणाम होऊ द्यायचा नसेल तर “हे” वाचणं आवश्यक आहे

  • March 27, 2020 at 12:42 am
    Permalink

    sahi hai boss!!!!!!!!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?