भारतीय इंजिनियरची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या : ट्रम्प प्रणित कट्टरवादाचा परिणाम?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

आमच्या देशातून चालते व्हा!!

===

===

असे ओरडत तो त्यांच्यासमोर आला आणि त्या माथेफिरूने मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्यांच्यावर बंदुकीने गोळ्या झाडल्या.

हा कोणत्या चित्रपटातील व कादंबरीमधील प्रसंग नाही. ही गोष्ट अमेरिकेतील Kansas City सारख्या गजबजलेल्या शहरात भर लोकांसमोर घडली आहे आणि तुम्हाला ऐकून दु:ख होईल की ज्यांच्यावर गोळ्या डागल्या गेल्या ते दोघेही भारतीय होते. यापैकी श्रीनिवास कुचीभोताला या ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो इंजिनियर असून सध्या अमेरिकेमध्ये वास्तव्यास होता. दुसरा त्याचा मित्र आलोक मदासनी याला देखील गंभीर दुखापत झाली आहे.

srinivas-Amarathipizza

स्रोत

InMarathi Android App

Adam Purinton या ५१ वर्षीय इसमाने या दोघांवर गोळ्या झाडल्या. वंशद्वेषाच्या रागातून त्याने हे कृत्य केले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले कारण त्याच्या बोलण्यातून भारतीयां विरुद्धची चीड स्पष्ट दिसत होती.

डोनाल्ड ट्रम्पचा काळ सुरु झाल्यापासून अमेरिकेमध्ये वास्तव्यास असणाऱ्या इतर देशातील नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत आहे. ज्यू आणि मुस्लीम समुदायाच्या लोकांनी तर या वंशद्वेषाची चांगलीच धास्ती घेतली आहे.

Hindu American Foundation च्या म्हणण्यानुसार,

===
===

श्रीनिवास कुचीभोतालाची हत्या ही डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर येथील कट्टरवाद्यांनी केलेलं पहिले अतिहिंसक कृत्य आहे. त्यामुळे येणारा काळ स्थलांतरित लोकांसाठी नक्कीच चांगला नसणार आहे.

racisam-in-america-marathipizza

स्रोत

श्रीनिवास हा मुळचा हैदराबादचा होता. कामानिमित्त तो कायमचा अमेरिकेस वास्तव्यास होता. ज्या बार मध्ये त्यांच्यवर गोळीबार झाला त्या बार मध्ये श्रीनिवास आणि त्याचा मित्र आठवड्यातून किमान दोन वेळा तरी जायचेच, त्यामुळे त्यांच्यावर गोळी झाडणाऱ्या माथेफिरूने त्यांना आधीच हेरून ठेवले असल्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे.

अमेरिकेमध्ये वाढता वंशद्वेष हा अमेरिकेच्या येणाऱ्या भविष्यासाठी घटक असून त्यामुळे जगात अमेरिकन नागरिकांबद्दल चुकीची प्रतिमा पसरत आहे. असे कृत्य केले तर दहशतवादी आणि आपल्यात काय फरक?

असा  सवाल Kansas City मधील एका सुज्ञ नागरिकाने सोशल मिडीयावर व्यक्त केला आहे.

नवी दिल्लीमधील अमेरिकन दूतावासाकडून देखील या हीन कृत्याबद्दल सहानुभूतीपर माफीनामा जाहीर करण्यात आला. त्यांनी श्रीनिवासच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आणि त्याचा दुसरा मित्र आलोक लवकरात लवकर बरा होईल अशी आशा व्यक्त केली.

embassy-america-marathipizza

स्रोत

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी देखील या घटनेची तात्काळ दखल घेतली.

या हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांना आम्ही सर्वपरीने मदत करू

===
===

अशी ग्वाही त्यांनी दिली.

srinivas-marathipizza01

स्रोत

अमेरिकेच्या FBI तर्फे हे स्पष्ट करण्यात आले आहे की,

दोन भारतीयांवर झालेला हल्ला हा पूर्णपणे वंशद्वेषाच्या रागातून झाला आहे हे आढळून आले तर आरोपीला अतिशय कडक शासन होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू.

या घटनेमुळे अमेरिकेतील अल्पसंख्यांक समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या तीव्र धोरणांमुळे कट्टरवाद्यांना आयतेच कोलीत मिळाले आहे. त्यांना जर वेळीच रोखले गेले नाही तर येणारा काळ अमेरिकेचे सामाजिक वातावरण पूर्णपणे बिघडवू शकतो आणि त्याचे दूरगामी परिणाम जगावर होऊ शकतात.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *