भारताच्या राष्ट्रपतींना किती पगार मिळतो? त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात? वाचा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारतात राष्ट्रपती पद हे देशातील सर्वात अभिमानाचे पद असते. राष्ट्रपती हे देशाचे पहिले नागरिक असतात. आता देशाचे पहिले नागरिक आणि एवढे महत्वाचे पद, मग त्यांना तश्या सुविधा तर मिळणारच.

पण आपण नेहेमी राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती ह्यांच्या बाबत बातम्यांमध्येच ऐकले आहे. त्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि पगार ह्याबाबत आपल्याला कदाचित तेवढी माहिती नसेल.

तुम्हाला माहित आहे राष्ट्रपतींना किती पगार मिळतो?

 

ramnathkovind-inmarathi
indiatvnews.com

सध्याचे आपल्या देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आपल्या देशाचे १४ वे राष्ट्रपती आहेत. तसे तर राष्ट्रपती, पंतप्रधान हे  देशाच्या सेवेकरिता काम करत असतात. तरी त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून पगार दिला जातो.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्यांना दर महिन्याला ५ लाख रुपये पगार दिला जातो.

ह्याआधीचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी ह्यांना १.५ लाख रुपये प्रति महिना पगार दिला जायचा. पण हा पगार इतर पदाधिकाऱ्यांच्या तुलनेत खूप कमी होता.

सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर कॅबिनेट सचिवचा पाफ्गर २.५ लाख प्रति महिना आणि केंद्र सरकार सचिवचा पगार २.२५ लाख प्रति महिना झाला. पण राष्ट्रपतीचा पगार मात्र १.५ एवढाच राहिला.

 

rashtrapati-bhavan-delhi

ह्यानुसार केंद्र कर्मचाऱ्याचे वेतन हे राष्ट्रपतीच्या वेतनापेक्षा १ लाखाने अधिक झाले. राष्ट्रपती पदाच्या प्रतिष्ठेकरिता हे चुकीचे होते. एखद्या सरकारी कर्मचाऱ्याचा पगार राष्ट्र्पतीपेक्षा अधिक असणे हे चुकीचे होते.

ह्यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्राच्या सर्वोच्च व्यक्तीच्या पगारात ७ व्या वेतन आयोगानुसार २०० पटीने वाढ करण्यात आली आहे.

ज्यानंतर राष्ट्रपतीचा पगार हा १.५ लाखावरून ५ लाख प्रति महिना एवढा झाला. तर उपराष्ट्रपतीच्या पगारात देखील वाद करण्यात आली आहे. उपराष्ट्रपतीचा आधीचा पगार १.२५ लाख प्रति महिना एवढा होता तो आता ३.५ लाख प्रति महिना करण्यात आला आहे.

 

pranab-mukhrji-inmarathi
easterneye.eu

ह्याचा फायदा माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी ह्यांना देखील झाला. त्यांना सेवानिवृत्ती नंतर १.५ लाख रुपये प्रति महिना पेन्शनच्या स्वरुपात दिले जातात.

तर राष्ट्रपतीच्या बायकोला ३० हजार रुपये सेक्रेटेरियल मदत देखील दिली जाते. त्यासोबतच माजी राष्ट्रपती, मृत राष्ट्रपती तसेच माजी उपराष्ट्रपती, मृत उप राष्ट्रपती ह्यांच्या पत्नी आणि पूर्व राज्यपाल ह्यांच्या पेन्शनमध्ये देखील वाढ करण्याचा विचार सुरु आहे.

ह्याआधी २००८ साली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती, राज्यपाल ह्यांच्या पगारात तीन पट वाढ करण्यात आली होती. त्याआधी पर्यंत राष्ट्रपतीचा पगार हा ५० हजार प्रति महिना एवढा होता. तर उप राष्ट्रपतीचा ४० हजार आणि राज्यपाल ह्यांचा पगार ३६ हजार रुपये प्रति महिना एवढा होता.

 

ramnathkovind-inmarathi01
dailypost.in

राष्ट्रपतीला मिळणाऱ्या सुविधा :

राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च पद आहे. त्यामुळे त्यांना तश्या सर्वोच्च सुविधा देखील देण्यात येतात. भारताचे राष्ट्रपती पदावर असताना राष्ट्रपती भवनात राहतात. तिथे त्यांना सर्व सुख-सोयी पुरविल्या जातात.

राष्ट्रपती भवन हे भारताच्या व्हॉइसरॉय यांच्यासाठी इंग्रजांनी बनविलेले भवन आहे. १९५० पर्यंत याला व्हॉइसरॉय हाउस म्हटले जायचे.

पण त्यानंतर पासून हे देशाच्या राष्ट्रपतीचे अधिकृत निवासस्थान आहे. येथे राष्ट्रपतीला खाणे-पिणे, नोकर-चाकर, इत्यादी सर्व सुविधा पुरवल्या जातात. यावर भारत सरकार वर्षाला २२.५ कोटी रुपये खर्च करते.

देशाचा प्रथम नागरिक असणाऱ्या राष्ट्रपती पदावरील व्यक्तीला या सुविधा आणि वेतन दिले जाते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “भारताच्या राष्ट्रपतींना किती पगार मिळतो? त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात? वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?