अंतराळाबद्दल तुम्हाला माहित असलेल्या या गोष्टी म्हणजे केवळ ‘मिथके’ आहेत

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

अंतराळ, स्पेस हा असा विषय आहे, ज्याबाबत लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना रस आहे. सर्वांना ह्या आपल्या पृथ्वीच्या बाहेरच्या जगात म्हणजेच अंतराळात नेमकं काय असेल ते कसं असेल हे सर्व जाणून घेण्याची उत्सुकता असते. आणि ह्या उत्सुकतेतूनच अंतराळाबद्दल काही मिथकांनीही जन्म घेतला.

 

 space-myths-inmarathi
relativelyinteresting.com

या मिथकांना आपण आजवर खरं मनात आलो आहोत. पण ह्यात काहीही सत्य नसून ते केवळ आणि केवळ एक मिथक आहे. आज आपण अंतराळा संबंधी असेच काही मिथक आणि त्यामागचे सत्य पाहणार आहोत.

अंतराळातून चीनची भिंत दिसते…


 

space-myths-inmarathi05
scoopnest.com

अंतराळा संबंधी हे सर्वात प्रचलित मिथक आहे. भलेही चीनची भिंत ही जगातील सर्वात लांब भिंत असेल, तर ती अंतराळातून दिसते हे काही खरे नाही. चीनची भिंतच काय अंतराळातून पृथ्वीवर बनलेली कुठलाही इमारत किंवा इतर काही वस्तू दिसत नाहीत.

सूर्य पिवळ्या रंगाचा आहे…

पृथ्वीवरून जरी आपल्याला सूर्य हा पिवळा दिसत असला तरी त्याचा रंग पिवळा नाही. तो केवळ पृथ्वीवरील वातावरणामुळे आपल्याला पिवळ्या रंगाचा दिसतो. सूर्यप्रकाश हा पृथ्वी भोवती असणाऱ्या वातावरणाच्या थर पार करत येतो.

 

space-myths-inmarathi06
ctnc.org

त्यामुळे सूर्य किरणे आपल्याला लाल, केशरी किंवा पिवळ्या रंगाच्या दिसतात. पण सूर्य किरणे पिवळी दिसतात म्हणून सूर्यही पिवळा असेल असं नाही. तर आपला सूर्य हा पांढऱ्या रंगाचा आहे. जर टीमही अंतराळातून सूर्याला बघितले तर तो तुम्हाला पांढरा दिसेल.

एका दिवसात चंद्र पृथ्वीची एक परिक्रमा पूर्ण करतो…

 

space-myths-inmarathi04
businessinsider.in

चंद्र हा इतर ग्रहांच्या तुलनेत अतिशय वेगाने फिरतो. पण तो एका दिवसात पृथ्वी भोवती एक परिक्रमा पूर्ण करतो, हे साफ खोटे आहे. चंद्राला पृथ्वीभोवती एक परिक्रमा पूर्ण करायला २७ दिवस लागतात. आपल्याला रोज ज्या चंद्राच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळतात त्या ह्यामुळेच.

अंतराळात कुठल्याही वस्तूच्या धडकण्याचा मोठा आवाज येतो…

आपण चित्रपटांत तसेच कार्टून्समध्ये देखील बघितले असेल की, जेव्हा केव्हा अंतराळातील कुठली फाईट दाखविली जाते तेव्हा कुठल्याही दोन्ही गोष्टी एकमेकांवर आदळल्या की, जोरदार धमाका होतो आणि आवाज येतो असे दाखवले जाते.

 

space-myths-inmarathi03
cheatsheet.com

पण हे सर्व स्पेशल इफेक्टमुळे होत असते. पण वास्तवात असे शक्य नाही. कारण आवाजाला प्रवास करण्यासाठी एखाद्या माध्यमाची गरज असते, म्हणजेच हवा. अंतराळात हवा नसल्याने आवाजाचा प्रवास होत नाही आणि त्यामुळे आवाजही येत नाही.

जर स्पेस सूट नाही घातला तर अंतराळवीराचा विस्फोट होऊन जातो…

 

space-myths-inmarathi07
theverge.com

हे खरे आहे की, विना स्पेस सूट कुठलाही अंतराळवीर जिवंत राहू शकत नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की, त्यांच्यात विस्फोट होतो. असा स्फोट होण्याची कारणे काही वेगळी असतात. जर अंतराळ यानात कुठला विस्फोट झाला तर ठीक पण असा स्पेस सुत घातला नाही म्हणून अंतराळवीरांमध्ये विस्फोट होत नाही. फक्त स्पेस सूट न घालता अंतराळयांच्या बाहेर निघाले तर त्यांच्या शरीरातील रक्ताचा प्रवाह थांबून जाईल आणि शरीर फुगेल.

अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते…

 

space-myths-inmarathi08
mnn.com

अंतराळात हवा आणि पाणी नाही हे तर १०० टक्के खरे आहे. पण म्हणून तिथे गुरुत्वाकर्षण नाही हे खरे नाही, हे केवळ एक मिथक आहे. अंतराळात प्रत्येक ठिकाणी थोडंफार गुरुत्वाकर्षण असतं, म्हणूनच चंद्र हा पृथ्वीभोवती परिक्रमा घालतो. जर गुरुत्वाकर्षण नसते तर चंद्र कधीचाच पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेला असता.

बुध हा ग्रह सर्वात उष्ण ग्रह आहे…

बुध हा ग्रह सर्वात जास्त उष्ण ग्रह आहे हे देखील एक मिथक आहे. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळ असल्याने तो इतर ग्रहांच्या तुलनेत सर्वात उष्ण आहे असं म्हणतात. पण असे नाहीये.

 

space-myths-inmarathi09
express.co.uk

कुठलाही ग्रह हा सूर्यापासून जवळ असेल किंवा दूर त्यांच्या त्या ग्रहाच्या उष्णतेवर काहीही फरक पडत नाही. ग्रहावर ज्या प्रकारच्या वायू असतात त्यावर त्याची उष्णता अवलंबून असते. कारण बुध पेक्षा जास्त उष्ण शुक्र हा ग्रह आहे. कारण ह्या ग्रहावर कार्बनडाय ऑक्साईड हा वायू मोठ्या प्रमाणात आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “अंतराळाबद्दल तुम्हाला माहित असलेल्या या गोष्टी म्हणजे केवळ ‘मिथके’ आहेत

  • July 4, 2018 at 10:59 am
    Permalink

    Nice information in erath

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *