दक्षिण कोरियाचे नागरिक दरवर्षी अयोध्येला येऊन नतमस्तक का होतात? जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

साउथ कोरिया… या देशाला जग ‘शांत प्रातःकाळची जमीन’ या नावानेदेखील ओळखते.

या देशाने पूर्व एशियामधील कोरियन द्वीपकल्पाचा दक्षिणी अर्धा भाग घेरलेला आहे. भारताबरोबरसुद्धा दक्षिण कोरियाचे व्यापारीक आणि आर्थिक संबंध पूर्वीपासून चांगले आहेत.

पण तुम्हाला हे माहितीये का की भारत आणि दक्षिण कोरिया या दोन देशांमध्ये एक अतूट पारंपरिक, सांस्कृतिक नातं आहे. ज्या नात्याने आजवर दोन्हीही देशांमधील देशवासियांना घट्ट बांधून ठेवलंय?

साउथ कोरियाचे नागरिक या परंपरेचे पालन करण्यासाठी दरवर्षी भारतात येतात.

उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या शहरात दरवर्षी साउथ कोरियाचे देशवासी आपल्या देशातील महाराणी हुर ह्वांग-ओके हिचे स्मरण करण्यास येतात.

विवाहापूर्वी ही राणी अयोध्येची राजकुमारी होती आणि तिचे नाव सुरीरत्ना असे होते. तिचा विवाह करक वंशातील राजा किम सुरो यांच्याबरोबर इसवीसनाच्या ४८व्या शतकाच्या उत्तरार्धात झाला होता.

 

ayodhya-inmarathi
reacho.in

असं म्हणतात की ती कोरियामध्ये एका जहाजातून गेली आणि गेमग्वान गया येथील सुरो राजाची महाराणी बनली. केवळ १६व्या वर्षी लग्न करून ती गया साम्राज्याची पहिली महाराणी बनली.

करक वंशाची लोकं आजही अयोध्या नगरीला आपल्या महाराणीचं माहेर समजतात आणि म्हणून दरवर्षी महाराणीच्या स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला येतात.

असे मानतात की,

महाराणी हुर ह्वांग-ओके यांच्या आईवडिलांच्या स्वप्नात त्यांच्या देवाने दर्शन देऊन त्यांना असे सांगितले की साऊथ कोरियाच्या राजाचा अजून विवाह झालेला नाही. त्यामुळे तुमच्या मुलीला तिथे पाठवून द्या.

ती त्याची राणी होईल. त्या सांगण्याप्रमाणे राजकन्येच्या आईवडिलांनी केले आणि पुढे ते खरे ठरले. ही महाराणी दीर्घायुषी होती.

असे सांगतात की वयाच्या १५७ व्या वर्षी महाराणीचा मृत्यू झाला.

राणीच्या स्मारकाचे उद्घाटन सन २००१ मध्ये झाले. या प्रसंगी इतिहासप्रेमी आणि सरकारी प्रतिनिधी उपस्थित होते. इतकेच नाही तर नोर्थ कोरियाचे राजदूत सुद्धा या कार्यक्रमासाठी खास आमंत्रितांमध्ये होते.

किम्हे किम वंश, हुर वंश आणि इंचेऑन यी या वंशाच्या ७० लाख लोकांनी आपला इतिहास शोधून अयोध्येबरोबर एक नातं जोडलं.

 

queen-inmarathi
thebetterindia.com

साउथ कोरियामध्ये महाराणीचा मकबरा गिम्हे येथे आहे आणि त्याच्या समोर शिवालायही आहे. असे मानले जाते की महाराणीने हे शिवालय अयोध्येवरून आपल्यासोबत आणले होते.

काही वर्षांपूर्वी भारताचे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी साउथ कोरियाला गेले होते. तेव्हा दोन्ही देशांनी अयोध्येत महाराणी हुर ह्वांग-ओके हिचे मोठे स्मारक बांधण्याच्या प्रस्तावावर सहमती दर्शविली.

हे स्मारक कोरीअन स्थापत्यशास्त्रानुसार बनविण्यात येईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?