‘ह्या’ मार्गांनी ISIS मिळवते करोडो रुपयांचे उत्पन्न आणि पसरवते आपली दहशत!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

 ===

ISIS ही जगातील सर्वात मोठी आणि क्रूर दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाते. ह्या संघटनेचा खर्च देखील करोडो रुपयांमध्ये आहे. त्यामुळे आपल्या मनात हा प्रश्न येतोच की ह्या संघटनेला पैसा कोण पुरवतं? त्यांच्या उत्पन्नाचे माध्यम काय? चला आज ह्या प्रश्नामागचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.

मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले होत असूनही ISIS ही दहशतवादी संघटना ऑइल सेक्टरमधून मोठ्या प्रमाणावर कमाई करत आहे. इराक आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते इस्लामिक स्टेट त्यांच्या ताब्यातील ऑइल फील्ड्समधून महिन्याकाठी ५ कोटी अमेरिकन डॉलर म्हणजेच सुमारे ३१६ कोटी रुपये कमावत आहे. म्हणजे केवळ ऑइलमधूनच रोजचे १० कोटी कमावत आहे.

रिपोर्टनुसार क्रूड ऑइलची विक्री हा सुन्नी दहशतवाद्यांच्या कमाईचा सर्वात मोठा स्त्रोत बनला आहे. सिरियामधून ISIS सुमारे ३०,००० बॅरल क्रूड ऑइल शेजारी अशलेल्या तुर्कस्तानातील दलालांना विकत आहे. तर इराकमध्ये दररोज सुमारे १० ते २० हजार बॅरलच्या क्रूड ऑइलचे प्रोडक्शन केले जात आहे.

ISIS-marathipizza01
abcnews.go.com

ISIS ही जगातील सर्वात श्रीमंत दहशतवादी संघटना आहे. २०१४ च्या जूनमध्येच या संघटनेकडे सुमारे दोन अब्ज अमेरिकेन डॉलर म्हणजे सुमारे १२,६३४ कोटी रुपये पेक्षा जास्त संपत्ती होती. ऑइल स्मगलिंग, ह्युमन ट्राफिकिंग, दुकानांमध्ये लुटमारी, खंडणी, बळजबरीने कर किंवा वसुली, हे त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. ही संघटना रोज त्यांच्या कमाईत वाढ करून आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक मजबूत होत आहे.

 

कर किंवा बळजबरी वसुली

ISIS-marathipizza02
independent.co.uk

२०१४ मध्ये इस्लामिक स्टेटची स्थापना केल्यानंतर संघटनेने प्रशासकीय कारभारासाठी व्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी कर वसूल करायला सुरुवात केली. टॅक्स अॅनालिसिसचे डायरेक्टर जोसेफ थॉर्नडिके यांनी दिलेल्या माहितीनुसार, ISIS च्या ताब्यात असलेल्या परिसरात नागरिकांना जीवंत राहण्यासाठी टॅक्स द्यावा लागतो. उद्योगपतींना जर संरक्षण, वीज हवे असेल तर ISIS ला टॅक्स द्यावा अशी धमकी दिली जाते. एवढेच नाही तर चेक पॉइंटवरून जाणाऱ्या प्रत्येक ड्रायव्हरला रोख रक्कमही मोजावी लागते. रिपोर्टनुसार नेहमीच्या टॅक्स सिस्टम व्यतिरिक्त इस्लामिक स्टेट येथील नागरिकांना धमकावून बळजवरी वसुली करत आहे.

 

शेतीमालावर नियंत्रण

ISIS-marathipizza03
static.independent.co.uk

सिरियन इमर्जेंसी टास्क फोर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मोउज मुस्तफा यांनी सीएनएनला दिलेल्या माहितीनुसार संघटनेच्या ताब्यात असलेल्या सिरियातील रक्का शहर ही कृषी राजधानी आहे. येथे कॉटन आणि गव्हाचे प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर होते. ज्याचा थेट फायदा आयएसआयएसला होतो.

 

अपहरण आणि खंडणी

ISIS-marathipizza04
zerocensorship.com

२०१२ मध्ये अमेरिकन ट्रेझरी डिपार्टमेंटनुसार अल-कायदा आणि इतर सहकारी संघटनांनी गेल्या आठ वर्षांमध्ये खंडणीच्या माध्यमातून १२० मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच सुमारे ७५८ कोटी रुपये जमवले होते. त्यावेळी अल-कायदा आणि ISIS यांच्यात युती होती. संघटना वेगवेगळ्या होत्या पण त्यांची विचारधारा सारखीच होती.

२०१४ मध्ये न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार २००८ पासून अल-कायदा आणि इतर सहकारी संघटनांनी १२५ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच ७८९ कोटी रुपयेची खंडणी वसूल केली. केवळ २०१३ मध्येच दहशतवाद्यांनी ४१६416 कोटी रुपयांची कमाई केली. एका स्वीडीश कंपनीच्या मते, त्यांनी ISIS च्या ताब्यातून कर्मचाऱ्यांना सोडवण्यासाठी ४४ लाखांची खंडणी दिली होती.

सीएनएन सेक्युरिटी अॅनालिसिस पीटर बर्गन यांनी सांगितले की,

खंडणीतून कमाई करणे हा संघटनेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. मात्र अमेरिकेने त्यांना खंडणी द्यायला स्पष्ट नकार दिला होता. २०१४ मध्ये अमेरिकेने खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या नागरिकांना निर्घृण हत्या करण्यात आली होती. ISIS ने अमेरिकेच्या पत्रकाराच्या सुटकेनंतर कोट्यवधी डॉलरची खंडणी मागितली होती. तसेच दोन जपानी नागरिकांच्या सुटकेसाठी देखिल १,२३६ कोटी रुपये मागितले होते. जपानने नकार दिल्यानंतर त्यांचे शीर कापण्यात आले होते.

 

शरिराच्या अवयवांची तस्करी

ISIS-marathipizza05
i.guim.co.uk

इराकच्या राजदुतांनी संयुक्त राष्ट्रात एक विधान केले होते की, ISIS मानवी अवयवांची तस्करी आणि त्याचा व्यवसाय करते. त्यांच्या ह्या विधानाने बरीच खळबळ माजली होती. जर्मनीच्या फ्रँकफर्टर अल्गेमिन वृत्तपत्रातील रिपोर्टनुसार, इस्लामिक स्टेट कुर्दीश सैन्यातील एका मृतदेहाच्या मोबदल्यात २० हजार डॉलर म्हणजेच सुमारे १२ लाख रुपये देण्याची मागणी करत होते.

 

कलाकृती आणि प्राचीन अवशेषांची चोरी आणि विक्री

ISIS-marathipizza06
i.dailymail.co.uk

संघटनेने स्थानिकांना प्राचीन ठिकाणांचे खोदकाम करण्याची परवानगी दिली आहे. काही प्राचीन अवशेष सापडल्यास त्यातील नफ्यामध्ये नागरिकांना भागीदारी दिली जाईल असे सांगितले जाते. सप्टेंबर २०१४ च्या न्यूयॉर्क टाइम्स ओपिनियनमध्ये प्रकाशित तीन जणांची मुलाखत होती. ते दक्षिण तुर्कस्तानातून परतले होते. त्यांनी सांगितले की,

याची प्रक्रिया फार किचकट आहे. यूफ्रेट्स नदीच्याजवळ दहशतवादी लोकांना कायम खोदकामात गुंतवून ठेवतात. त्यामुळे संघटनेने सिरियाच्या सांस्कृतिक वास्तुंचे मोठे नुकसान केले आहे.

ISIS ने सिरिया आणि इराकच्या अनेक प्राचीन वास्तुंचे नुकसान केले आहे. दहशतवाद्यांनी पालमीरामध्ये २००० वर्षे जुनी मंदिरे आणि जोनाह मशिदीसारखी अनेक धार्मिक स्थळे बॉम्बने उडवली आहे.

तर अश्या प्रकारे हिंसक मार्गाने ISIS पैसा कमवत आहे आणि दहशतवादाला खतपाणी घालत आहे.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?